Kolhapur News: कोल्हापुरात भोंदूगिरीचा कहर; चुटकी वाजवून भूतबाधा, करणी करणाऱ्या भुरट्या तांत्रिक मांत्रिकांचा व्हिडिओ व्हायरल
Kolhapur News: तांत्रिक मांत्रिक आणि भोंदू बाबा परिसरातील नागरिकांना अशा गोष्टींची भुरळ घालत असतानाच पोलीस प्रशासन अशा गोष्टींकडे दुर्लक्ष करत असल्याचा प्रकार समोर आला आहे.

Kolhapur News: भोंदू बाबा मांत्रिकांची (kolhapur aghori puja and black magic) जिल्हासह कोल्हापूर शहरावरही वचक असल्याचं निदर्शनास आलं आहे. स्मशानभूमीत चुटकी वाजून अघोरी पूजा करणे, भूत काढणे, करणी करणे यासह अनेक आघोरी प्रकार कोल्हापुरात होत असल्याचे उघड झाले आहे. लहान मुले, स्त्रिया आणि नागरिकांवर जादूटोणासह करणी केली जात आहे. मांत्रिकाद्वारे अघोरी पूजा करत स्मशानात (kolhapur aghori puja and black magic) जाऊन भूत काढणे, करणी करण्याचे प्रकार उघड झाले आहेत. तांत्रिक मांत्रिक आणि भोंदू बाबा परिसरातील नागरिकांना अशा गोष्टींची भुरळ घालत असतानाच पोलीस प्रशासन अशा गोष्टींकडे दुर्लक्ष करत असल्याचा प्रकार समोर आला आहे.(kolhapur aghori puja and black magic)
Kolhapur News: निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रतिस्पर्धी लिंबू कापून करणी प्रकारात वाढ होण्याची शक्यता
पुरोगामी जिल्हा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोल्हापूर जिल्ह्यात अनेक ठिकाणी भोंदूगिरी आणि करणीचे प्रकार सुरू आहेत. अनेक लोक मांत्रिक आणि भोंदू बाबाच्या जाळ्यात अडकले आहेत. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उमेदवारांमध्ये प्रतिस्पर्धी उमेदवारांच्या फोटोंमध्ये खिळे मारून लिंबू कापून करणी करण्याचे प्रकारात वाढ होण्याची शक्यता आहे.
स्मशानभूमीत चुटकी वाजून अघोरी पूजा करणे, भूत काढणे, करणी करणे यासह अनेक आघोरी प्रकार कोल्हापुरात होत असल्याचे उघड झाले आहे. लहान मुले, स्त्रिया आणि नागरिकांवर जादूटोणासह करणी केली जात होती. मांत्रिकाद्वारे अघोरी पूजा करत स्मशानात जाऊन भूत काढणे, करणी करण्याचे प्रकार उघड झाले आहे. कोल्हापुरात वारंवार अशा घटना घडत असूनही पोलिस मात्र बघ्याची भूमिका घेत असल्याचा संपात व्यक्त केला जात आहे. यांच्यावर कारवाई कधी होणार असा सवाल उपस्थित केला जात आहे.
Kolhapur News: फोटोंमध्ये खिळे मारून लिंबू कापून करणी
पुरोगामी जिल्हा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोल्हापूर जिल्ह्यात अनेक ठिकाणी असे अघोरी प्रकार सुरू आहेत. भोंदूगिरी आणि करणीचे प्रकार अनेक लोक मांत्रिक आणि भोंदू बाबाच्या जाळ्यात अडकत आहेत. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उमेदवारांमध्ये प्रतिस्पर्धी उमेदवारांच्या फोटोंमध्ये खिळे मारून लिंबू कापून करणी करण्याचे प्रकार वाढले आहेत. यामुळे जिल्ह्यात आगामी काळात हे पोलिसांसमोर आव्हान असणार आहे. शिरोली पुलाची येथील स्मशानभूमीत रात्रीच्या वेळी घडलेला कथित भानामतीचा आणि आघोरी विधीचा प्रकार सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला असून, ग्रामस्थांमध्ये खळबळ उडाली आहे. या घटनेचे व्हिडीओ देखील मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाले आहेत.
कोल्हापुरात भोंदूगिरीचा कहर; चुटकी वाजवून भूतबाधा, करणी करणाऱ्या भुरट्या तांत्रिक मांत्रिकांचा व्हिडिओ व्हायरल#kolhapurnews #Videoviral pic.twitter.com/Ej8XlWh2Bh
— Ankita Shantinath Khane (@KhaneAnkita) November 12, 2025
























