![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
Jyotiraditya Shinde in Kolhapur: मोठमोठे प्रकल्प देशात येत आहेत, मात्र विरोधकांना हे दिसत नाही, त्यांना चष्मा बदलण्याची गरज; ज्योतिरादित्य शिंदे यांचा टोला
मोठमोठे प्रकल्प देशात येत आहेत, मात्र ते विरोधकांना दिसत नाही त्यांना चष्मा बदलण्याची गरज आहे. भाजपचं काम तळागाळापर्यंत पोहोचवणं हे सध्या माझं काम आहे, अशी प्रतिक्रिया ज्योतिरादित्य शिंदे यांनी दिली.
![Jyotiraditya Shinde in Kolhapur: मोठमोठे प्रकल्प देशात येत आहेत, मात्र विरोधकांना हे दिसत नाही, त्यांना चष्मा बदलण्याची गरज; ज्योतिरादित्य शिंदे यांचा टोला Jyotiraditya Shinde in Kolhapur take jibe on opposition says Big projects are coming to the country but the opposition does not see it Jyotiraditya Shinde in Kolhapur: मोठमोठे प्रकल्प देशात येत आहेत, मात्र विरोधकांना हे दिसत नाही, त्यांना चष्मा बदलण्याची गरज; ज्योतिरादित्य शिंदे यांचा टोला](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/06/04/f2d99b189cea98987e3b77a2a72a6b791685874074470736_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Jyotiraditya Shinde in Kolhapur: जनधन योजनेच्या माध्यमातून सामान्यांचा विकास केला जात आहे, भाजपची नवी विचारधारा आहे, सामाजिक आणि व्यक्तीगत विकास केला जात असल्याची प्रतिक्रिया केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी आज कोल्हापूरमध्ये दिली. लोकसभा प्रवास योजनेंतर्गत शिंदे कोल्हापूर दौऱ्यावर आहेत. त्यांच्या दौऱ्याचा आज आजचा दुसरा दिवस आहे. शिंदे यांनी माध्यमांशी संवाद साधत मोदी सरकारला झालेल्या नऊ वर्षांच्या पार्श्वभूमीवर पत्रकार परिषदेच्या कामगिरीचा आढावा घेतला.
यावेळी बोलताना ज्योतिरादित्य शिंदे यांनी (Jyotiraditya Shinde in Kolhapur) सांगितले की, कोरोना महामारीमध्ये 220 कोटी मोफत लसीकरण करण्यात आलं होतं. असा कुठल्याही देशांमध्ये घडलं नाही. आमची विचारधारा वसुदैव कुटुंबकम आहे. ते पुढे म्हणाले की, तीन कोटी आवास योजना राबवण्यात आल्या. गेल्या 75 वर्षात पहिल्यांदाच शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्षाला 12 हजार जमा केले.आरोग्यासाठी आयुष्यमान पाच लाख रुपयांचा विमा दिला. महिलांसाठी 9 कोटी 60 लाख महिलांना उज्वला गॅस दिला. 64 वर्षात 74 विमानतळ होती. मात्र, या 9 वर्षांमध्ये आणखी 74 विमानतळ बांधली. रोड ट्रान्सपोर्टमध्ये 300 टक्क्यांनी वाढ झाली आहे. शैक्षणिक प्रणालीमध्ये परिवर्तन झाले आहे. प्रधानमंत्री योजनेत 1 कोटी 37 लाख लोकांना रोजगार संधी उपलब्ध करून दिली.
भाजपचं काम तळागाळापर्यंत पोहोचवणं हे सध्या माझं काम
शिंदे यांनी बेरोजगारीवर भाष्य केले. ते म्हणाले की, जर्मनीसारख्या देशांमध्येही मंदीचे सावट आहे. असे असतानाही देशात मोठी रोजगार निर्मिती होत आहे. मोठमोठे प्रकल्प देशात येत आहेत, मात्र ते विरोधकांना दिसत नाही त्यांना त्यांचा चष्मा बदलण्याची गरज आहे. भाजपचं काम तळागाळापर्यंत पोहोचवणं हे सध्या माझं काम आहे, निवडणुकीबाबत ज्या त्यावेळी निर्णय घेतले जातील, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
कोल्हापूर विमानतळाबाबत काय म्हणाले?
कोल्हापूरच्या विमानतळाबद्दल माहिती देताना ते म्हणाले की, विमानतळ क्षेत्र आणखी विकसित केलं जाणार आहे. विमानतळ विस्तारीकरण कामाचे उद्घाटन ऑक्टोबर ते नोव्हेंबर महिन्यात मोठा कार्यक्रम घेऊन केलं जाईल. शिंदे यांनी यावेळी बोलताना बृजभूषण यांच्यावरही प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले की, या प्रकरणी तक्रार झाली दाखल झाली असून चौकशी सुरू आहे. न्यायपालिका निर्णय देईल तो सर्वांना मान्य करावे लागेल.
इतर महत्वाच्या बातम्या
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)