Jayant Patil : समरजितसिंहानी मेसेज पाठवला, जयंत पाटील म्हणाले, आम्ही टप्यात आलं की लगेच कार्यक्रम करतो
Jayant Patil on Samarjit Ghatge, कोल्हापूर : "गेल्या वर्षभरापासून माझ्या मनात असलेली चिंता आज मिटली, याचा आनंद मी व्यक्त करतो. शाहू, फुले, आंबेडकर यांचा विचार सोडल्यानंतर बहुजन समाज कसा एकवटतो हे लोकसभेला तुम्ही दाखवून दिलं."
Jayant Patil on Samarjit Ghatge, कोल्हापूर : "गेल्या वर्षभरापासून माझ्या मनात असलेली चिंता आज मिटली, याचा आनंद मी व्यक्त करतो. शाहू, फुले, आंबेडकर यांचा विचार सोडल्यानंतर बहुजन समाज कसा एकवटतो हे लोकसभेला तुम्ही दाखवून दिलं. आता विधानसभेला देखील दाखवून द्यायचे आहे. महाराष्ट्रात महाविकास आघाडी एकसंघ आहे म्हणून आपण निर्णय घ्यावा, असं मी समरजित घाटगे यांच्याशी बोललो. समरजित घाटगे यांचे म्हणणे होते की, आपण जेव्हा कोल्हापुरात येणार त्यावेळी माझ्या कार्यकर्त्यांशी बोला. आम्ही टप्यात आला की लगेच कार्यक्रम करतो", असं शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील (Jayant Patil) म्हणाले. ते कोल्हापुरात (Kolhapur) बोलत होते.
जयंत पाटील म्हणाले, गेल्या 9 ते 10 वर्षांच्या कालखंडात तुम्ही समरजित घाटगेंना पूर्ण ताकदीने उभा केलं. प्रतिकूल परिस्थिती असताना आणि सत्ता नसताना कागलच्या मातीने उभा करुन ताकद दिली. मी आजच येतो आणि कार्यकर्त्यांशी बोलतो असं म्हटलं आणि आता आलो. कागलमध्ये मी पूर्वी विक्रमसिंह राजे साहेब यांच्यासाठी आलो होतो. त्यावेळी शरद पवार साहेब यांची त्यावेळी विक्रमसिंह राजे यांनी लोकसभेला उभा राहावं असं म्हटलं होतं.
येत्या 3 तारखेला कागलमध्ये समरजित राजे यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश होईल
विक्रमसिंह राजे यांनी काँग्रेसचा विचार कायम जपला आहे. विक्रमसिंह राजे गेल्यानंतर तुम्ही समरजित यांना जपल आहे. महाविकास आघाडीत उमेदवारी जाहीर करायची नाही असं सांगितलं आहे. त्यामुळे पुढच्या सभेत याबाबत बोलतो. मी स्वतः राजे समरजित घाटगे यांचा प्रवेश करायला येणार, असं शरद पवार यांनी सांगितलं आहे. येत्या 3 तारखेला कागलमध्ये समरजित राजे यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश होईल. कागलच्या गैबी चौकात हा प्रवेश होईल. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात समरजित घाटगे यांचा प्रवेश राज्याचा निकाल बदलणारा आहे.
राजर्षी शाहू महाराजांचा विचार टिकवण्यासाठी समरजित घाटगे यांना निवडून आणायचं
राजर्षी शाहू महाराज यांचा वारसा या भूमीला आहे. राजर्षी शाहूंचा विचार वाचवला पाहिजे यासाठी लोकसभेला शाहू महाराज उभा राहिले. आता विधानसभेला देखील राजर्षी शाहू महाराजांचा विचार टिकवण्यासाठी समरजित घाटगे यांना निवडून आणायचं आहे. 3 सप्टेंबरच्या कार्यक्रमाला मोठ्या संख्येनं हजर राहा. पवार साहेब कायम समरजित घाटगे यांच्या पाठीशी राहणार आहेत. त्यामुळं आता तुम्ही समरजित घाटगे यांचं लीड किती असणार ते मोजा. दोन महिन्यात सरकार आपलंच येणार आहे, तुम्ही काळजी करू नका. मी समरजित घाटगे यांनी जो निर्णय घेतला त्यामुळे त्यांचे आभार मानतो.
इतर महत्वाच्या बातम्या