एक्स्प्लोर

Hasan Mushrif on Kirit Somaiya : हसन मुश्रीफ म्हणाले, "तर... मी राजीनामा देण्यास तयार; विनय कोरे आणि शिंदे गटाच्या संचालकांना किरीट सोमय्यांकडे पाठवणार"

किरीट सोमय्या आणि आमदार हसन मुश्रीफ यांच्यामध्ये आरोप प्रत्यारोपांच्या फैरी सुरुच आहेत. सोमय्यांनी केलेल्या आरोपानंतर आता हसन मुश्रीफ यांनी (Hasan Mushrif ED Raid) पलटवार करत आरोप खोडून काढले आहेत.

Hasan Mushrif on Kirit Somaiya : भाजप नेते किरीट सोमय्या आणि आमदार हसन मुश्रीफ यांच्यामध्ये (Hasan Mushrif on Kirit Somaiya) आरोप प्रत्यारोपांच्या फैरी सुरुच आहेत. किरीट सोमय्यांनी केलेल्या आरोपानंतर आता हसन मुश्रीफ यांनी (Hasan Mushrif ED Raid) पलटवार करत आरोप खोडून काढले आहेत. किरीट सोमय्या यांचा एक जरी आरोप खरा ठरला, तर आमदारकीचा राजीनामा देईन, अशी  प्रतिक्रिया आमदार हसन मुश्रीफ यांनी दिली आहे. माझ्या बदनामीसाठी षड्यंत्र रचलं जात असून यामागचा बोलवता धनी लवकरच उघड करू, अशा इशाराही त्यांनी दिला. सोमय्यांचे गैरसमज दूर करण्यासाठी आमदार विनय कोरे आणि शिंदे गटाचे संचालक यांना किरीट सोमय्या यांच्याकडे पाठवणार असल्याचेही ते म्हणाले. 

दरम्यान, किरीट सोमय्या यांनी कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी (केडीसीसी) बँकेत (KDCC ED Raid) राज्य सरकारकडून 39 हजार शेतकऱ्यांना मिळालेल्या अनुदानाची रक्कम ठेव म्हणून ठेवली. त्या रकमेवर आमदार मुश्रीफ यांनी त्यांच्या कुटुंबीयांना आणि सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्याला 40 कोटींचे कर्ज दिल्याचा आरोप केला आहे. कर्जासाठी दिलेल्या रकमेचा एकही कागद नाही. ठेवीच्या बदल्यात कर्ज दिल्याचे म्हटलेलं नाही. शेतकऱ्यांच्या नावाने शेतकऱ्यांचे शोषण केले जात आहे. ताबडतोब विशेष लेखापरीक्षण करून संचालक मंडळ बरखास्त करावे व सहकार आयुक्तांनी या संचालकांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी सोमय्या यांनी केली आहे.

कोणत्याही संकटाला पार करण्यास तयार  

किरीट सोमय्या यांनी केलेले सर्व आरोप मुश्रीफ यांनी फेटाळून लावले आहेत. ते म्हणाले की, सोमय्यांकडून बेताल वक्तव्य केली जात आहेत त्याचा मी निषेध करतो. त्यांनी केलेले आरोप आरोप निराधार आहेत. शेअर, तारणावर कर्ज घेतलं, नातेवाईकांना कर्ज दिलं हे आरोप खोटे आहे. आम्ही आवाहन केल्यानंतर पैसे गोळा झाले. त्यावर महिन्याला पाच किलो साखर आणि अन्य सोयी देत असतो. मी ठरवल्यास 100 कोटी जमवू शकतो. मी कोणत्याही संकटाला पार करण्यास तयार आहे. शेतकऱ्यांकडून 10 हजार आणि 5 राष्ट्रीयीकृत बँक कर्ज घेऊन माझ्या तीन मुलांनी कारखाना उभा केला. 

केवळ आरोपापोटी छापे घालण्याचे हे जागतिक रेकॉर्ड होईल

कोल्हापूर जिल्हा बँकेत कोणताही गैरव्यवहार झाला नसून बदनामीसाठी षडयंत्र सुरु असल्याचेही मुश्रीफ म्हणाले.  व्यक्तिगत आरोप करा, शेतकऱ्यांच्या मालकीच्या कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला बदनाम करण्याचे पाप करू नका. किरीट सोमय्या यांचा एक जरी आरोप खरा ठरला तर आमदारकीचा राजीनामा देईन. हे निव्वळ माझ्या बदनामीचे षडयंत्र सुरू आहे. त्यांचे गैरसमज दूर करण्यासाठी आमदार विनय कोरे आणि शिंदे गटाचे संचालक यांना किरीट सोमय्या यांच्याकडे पाठवणार आहे. केवळ आरोपापोटी छापे घालण्याचे हे जागतिक रेकॉर्ड होईल. 

इतर महत्वाच्या बातम्या 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Dharmveer 2 : काय दाढी, काय टक्कल, काय तो टिळा; धर्मवीर २ सिनेमात शहाजी बापूंची भूमिका एकदम ओक्के
काय दाढी, काय टक्कल, काय तो टिळा; धर्मवीर २ सिनेमात शहाजी बापूंची भूमिका एकदम ओक्के
चार आण्याची कोंबडी, बारा आण्याचा मसाला! पुणे मेट्रोचं तिकीट अवघं 15 रुपये, पण पार्किंगसाठी तासाला 35 रुपये
चार आण्याची कोंबडी, बारा आण्याचा मसाला! पुणे मेट्रोचं तिकीट अवघं 15 रुपये, पण पार्किंगसाठी तासाला 35 रुपये
Ahmednagar News : अहमदनगरमध्ये भाजपमधील इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती सुरु असतानाच गोंधळ, दोन गटातील वाद चव्हाट्यावर
अहमदनगरमध्ये भाजपमधील इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती सुरु असतानाच गोंधळ, दोन गटातील वाद चव्हाट्यावर
मोठी बातमी! अजित पवारांना दे धक्का; विलास लांडे तुतारी फुंकणार, शरद पवारांच्या भेटीनंतर फिक्स
मोठी बातमी! अजित पवारांना दे धक्का; विलास लांडे तुतारी फुंकणार, शरद पवारांच्या भेटीनंतर फिक्स
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Amit Shah : यंदा महायुतीचं सरकार येईल, 2029 ला एकट्या भाजपच्या जीवावर सरकार करायचंBadlapur Case : फरार आरोपींना जामीन मिळण्याची पोलीस वाट पाहतायत का?Maharashtra Superfast News : सुपरफास्ट बातम्या एका क्लिकवर : 10 October 2024 : 04 PM : ABP MajhaABP Majha Headlines : 4 PM : 1 ऑक्टोबर 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Dharmveer 2 : काय दाढी, काय टक्कल, काय तो टिळा; धर्मवीर २ सिनेमात शहाजी बापूंची भूमिका एकदम ओक्के
काय दाढी, काय टक्कल, काय तो टिळा; धर्मवीर २ सिनेमात शहाजी बापूंची भूमिका एकदम ओक्के
चार आण्याची कोंबडी, बारा आण्याचा मसाला! पुणे मेट्रोचं तिकीट अवघं 15 रुपये, पण पार्किंगसाठी तासाला 35 रुपये
चार आण्याची कोंबडी, बारा आण्याचा मसाला! पुणे मेट्रोचं तिकीट अवघं 15 रुपये, पण पार्किंगसाठी तासाला 35 रुपये
Ahmednagar News : अहमदनगरमध्ये भाजपमधील इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती सुरु असतानाच गोंधळ, दोन गटातील वाद चव्हाट्यावर
अहमदनगरमध्ये भाजपमधील इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती सुरु असतानाच गोंधळ, दोन गटातील वाद चव्हाट्यावर
मोठी बातमी! अजित पवारांना दे धक्का; विलास लांडे तुतारी फुंकणार, शरद पवारांच्या भेटीनंतर फिक्स
मोठी बातमी! अजित पवारांना दे धक्का; विलास लांडे तुतारी फुंकणार, शरद पवारांच्या भेटीनंतर फिक्स
Gold Rate: भारतात सोनं चांगलंच महागलंय; पण इराणमध्ये 1 तोळ्याची किंमत किती?
भारतात सोनं चांगलंच महागलंय; पण इराणमध्ये 1 तोळ्याची किंमत किती?
Devendra Fadnavis: उद्धव ठाकरेंचा जनाधार संपलाय, पण ओव्हर कॉन्फिडन्समुळे विकेट पडू देऊ नका: देवेंद्र फडणवीस
उद्धव ठाकरेंचा जनाधार संपलाय, पण ओव्हर कॉन्फिडन्समुळे विकेट पडू देऊ नका: देवेंद्र फडणवीस
लाडक्या बहि‍णींची दिवाळी दणक्यात, रक्षाबंधनला 3000, आता भाऊबीजेलाही; अजित दादांचा वादा
लाडक्या बहि‍णींची दिवाळी दणक्यात, रक्षाबंधनला 3000, आता भाऊबीजेलाही; अजित दादांचा वादा
Prakash Ambedkar : फडणवीस-ठाकरे गुप्त भेटीच्या दाव्यानंतर प्रकाश आंबेडकरांचं मोठं वक्तव्य; म्हणाले..
फडणवीस-ठाकरे गुप्त भेटीच्या दाव्यानंतर प्रकाश आंबेडकरांचं मोठं वक्तव्य; म्हणाले..
Embed widget