एक्स्प्लोर

Akhil Bhartiya Marathi Chitrapat Mahamandal : अखिल भारतीय चित्रपट महामंडळाची निवडणूक प्रक्रिया पुन्हा लांबणीवर

अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या मतदार यादीतून अनेक सभासदांची नावे वगळल्यानंतर उच्च न्यायालयात धाव घेण्यात आली होती. या याचिकेवर आता पुढील सुनावणी 12 फेब्रुवारीनंतर घेतली जाणार आहे.

Akhil Bhartiya Marathi Chitrapat Mahamandal : अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या मतदार यादीतून अनेक सभासदांची नावे वगळल्यानंतर उच्च न्यायालयात धाव घेण्यात आली होती. या याचिकेवर आता पुढील सुनावणी 12 फेब्रुवारीनंतर घेतली जाणार आहे, अशी माहिती ॲड. युवराज नरवणकर, राजेभोसले यांनी दिली. न्यायालयाच्या या आदेशामुळे महामंडळाची निवडणूक प्रक्रिया पुन्हा लांबणीवर पडली आहे. अध्यक्ष मेघराज राजेभोसले यांच्यासह सभासदांनी मुंबई उच्च न्यायालयात सभासदांची नावे वगळल्यानंतर याचिका दाखल केली होती. 

सभासदांनी दाखल केलेल्या याचिकेवर बुधवारी (18 जानेवारी) सुनावणी झाली. न्यायालयाच्या आदेशानुसार महामंडळाची निवडणूक प्रक्रियाही स्थगित ठेवण्यात आली आहे. माजी उपाध्यक्ष मिलिंद अष्टेकर यांच्यासह काही सभासदांनी हस्तक्षेप याचिका दाखल करताना महामंडळाच्या निवडणुकीला (Akhil Bhartiya Marathi Chitrapat Mahamandal)  स्थगिती न देता या याचिकेवर लवकर सुनावणी व्हावी, अशी विनंती केली. मात्र, त्याला न्यायालयाने नकार देत सुनावणी 12 फेब्रुवारीनंतर घेणार असल्याचे सांगितले. 

निवडणूक प्रक्रिया सुरु असताना स्थगितीचे आदेश

मराठी चित्रपट कलाकार, तंत्रज्ञ आणि चित्रपट निर्मात्यांच्या सर्वोच्च संस्था असलेल्या अखिल भारतीय चित्रपट महामंडळाची (Akhil Bhartiya Marathi Chitrapat Mahamandal) निवडणूक प्रक्रिया सुरु असतानाच मुंबई उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने 18 जानेवारीपर्यंत प्रक्रिया स्थगित केली होती. चित्रपट महामंडळाकडे गेल्या काही वर्षांमध्ये अनेक सभासदांनी ‘अ’ वर्ग सभासदत्वाचे निकष पूर्ण केले. त्यांना त्याबाबतची ओळखपत्रेही महामंडळाने दिली आहेत. त्यासाठीचे शुल्कही संबंधित सभासदांनी भरले असतानाही अंतिम मतदार यादीतून त्यांना वगळण्यात आले आहे. त्यासाठी कार्यकारिणीच्या बैठकीत हा विषय झाला नसून सभासदत्वाचा ठराव मंजूर झाला नसल्याचे कारण निवडणूक अधिकाऱ्यांनी दिले आहे. 

या पार्श्वभूमीवर या निर्णयाविरोधात राजेभोसले यांनी याचिका दाखल केली होती. त्यावर सुनावणी झाल्यानंतर स्थगिती देण्यात आली. महामंडळाच्या घटनेतील तरतुदी आणि इतर कागदपत्रांचा आधार घेत उच्च न्यायालयाने हा प्रश्न केवळ याचिकाकर्त्या सभासदांपुरता मर्यादित नसून त्याची व्याप्ती मोठी असल्याचे सांगितले. 

2 हजार 852 हून अधिक सदस्यांची नावे वगळली

दुसरीकडे, अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या 2 हजार 852 हून अधिक सदस्यांची नावे अंतिम मतदार यादीतून वगळण्यात आली आहेत. निवडणूक अधिकारी आसिफ शेख यांनी संबंधित असलेल्या आणि आवश्यक सदस्यत्व भरलेल्या 6255 मतदारांची प्रारुप यादी प्रसिद्ध केली होती. 

मतदार संपूर्ण महाराष्ट्रात विखुरले असून, पुणे आणि मुंबई येथील केंद्रांसह कोल्हापुरातील एबीएमसीएमच्या मुख्यालयात मतदान होणार आहे. मतदार यादीच्या प्रारुपावर आक्षेप घेण्यात आला. आक्षेपांपैकी एक म्हणजे 2,852 सदस्य स्वीकारण्याचा ठराव प्रशासकीय मंडळाने कधीच मंजूर केला नाही. मागील दोन-तीन वर्षांपासून माजी अध्यक्ष मेघराज भोसले आणि उपाध्यक्ष धनाजी यमकर यांच्यातील मतभेदामुळे निवडणूक प्रक्रिया विस्कळीत झाली आहे. दोघांनी एकमेकांवर गंभीर आरोप केले आहेत.

इतर महत्वाच्या बातम्या 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Gold Silver Rate : आठवड्यात सोने आणि चांदीचे दर घसरले, सोनं 4000 रुपयांनी स्वस्त, चांदीचे दर किती रुपयांवर? जाणून घ्या
आठवड्यात सोने आणि चांदीचे दर घसरले, सोनं 4000 रुपयांनी स्वस्त, चांदीचे दर किती रुपयांवर? जाणून घ्या
उद्धव ठाकरेंनी मला शिवी नाही दिली, प्रत्येक मराठी माणसाला शिवी दिली, मराठी माणसाचा अपमान केला : अमित साटम
उद्धव ठाकरेंनी मला शिवी नाही दिली, प्रत्येक मराठी माणसाला शिवी दिली, मराठी माणसाचा अपमान केला : अमित साटम
ज्ञानगंगा अभयारण्यात 4 वर्षानंतर आला वाघ, सर्वत्र आनंदी आनंद; नव्या 'टायगर'चे नाव काय?
ज्ञानगंगा अभयारण्यात 4 वर्षानंतर आला वाघ, सर्वत्र आनंदी आनंद; नव्या 'टायगर'चे नाव काय?
Raj Thackeray: इथं कसलं हिंदू मराठी करताय? आम्ही हिंदी नाही हिंदू आहोत, महापौर मराठीच होणार, विकासकामांना विरोध करून दाखवाच; राज ठाकरेंची सीएम फडणवीसांना फटकार अन् थेट आव्हान!
इथं कसलं हिंदू मराठी करताय? आम्ही हिंदी नाही हिंदू आहोत, महापौर मराठीच होणार, विकासकामांना विरोध करून दाखवाच; राज ठाकरेंची सीएम फडणवीसांना फटकार अन् थेट आव्हान!

व्हिडीओ

Sanjay Raut Full PC : शिवाजी पार्कात आमची सभा होऊ नये यासाठी विरोधकांचे प्रयत्त सुरु
Uddhav Thackeray-Raj Thackeray PC: वचनामा जाहीर,महायुतीवर निशाणा, ठाकरे बंधूंची रोखठोक पत्रकार परिषद
Dhananjay Mahadik Kolhapur : काँग्रेसची कुठेही सत्ता नाही मग शहरासाठी निधी कसे आणणार? महाडिकांचं भाषण
Rajesh Kshirsagar Kolhapur : विरोधक हे निगेटिव्ह नरेटिव्हचे किंग आहेत, राजेश क्षीरसागरांचं भाषण
Devendra Fadnavis On Mahapaur : मुंबईचा महापौर महायुतीचाच आणि मराठीचाच होणार

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Gold Silver Rate : आठवड्यात सोने आणि चांदीचे दर घसरले, सोनं 4000 रुपयांनी स्वस्त, चांदीचे दर किती रुपयांवर? जाणून घ्या
आठवड्यात सोने आणि चांदीचे दर घसरले, सोनं 4000 रुपयांनी स्वस्त, चांदीचे दर किती रुपयांवर? जाणून घ्या
उद्धव ठाकरेंनी मला शिवी नाही दिली, प्रत्येक मराठी माणसाला शिवी दिली, मराठी माणसाचा अपमान केला : अमित साटम
उद्धव ठाकरेंनी मला शिवी नाही दिली, प्रत्येक मराठी माणसाला शिवी दिली, मराठी माणसाचा अपमान केला : अमित साटम
ज्ञानगंगा अभयारण्यात 4 वर्षानंतर आला वाघ, सर्वत्र आनंदी आनंद; नव्या 'टायगर'चे नाव काय?
ज्ञानगंगा अभयारण्यात 4 वर्षानंतर आला वाघ, सर्वत्र आनंदी आनंद; नव्या 'टायगर'चे नाव काय?
Raj Thackeray: इथं कसलं हिंदू मराठी करताय? आम्ही हिंदी नाही हिंदू आहोत, महापौर मराठीच होणार, विकासकामांना विरोध करून दाखवाच; राज ठाकरेंची सीएम फडणवीसांना फटकार अन् थेट आव्हान!
इथं कसलं हिंदू मराठी करताय? आम्ही हिंदी नाही हिंदू आहोत, महापौर मराठीच होणार, विकासकामांना विरोध करून दाखवाच; राज ठाकरेंची सीएम फडणवीसांना फटकार अन् थेट आव्हान!
FPI: विदेशी गुंतवणूकदारांनी 2025 चा ट्रेंड नववर्षातही कायम ठेवला, दोन दिवसात 7608 कोटी काढून घेतले, पुढं काय घडणार? 
विदेशी गुंतवणूकदारांनी 2025 चा ट्रेंड नववर्षातही कायम ठेवला, दोन दिवसात 7608 कोटी काढून घेतले
भाजप आणि शिंदे गटाचे 69 उमेदवार बिनविरोध, आपली निवडणूक व्यवस्था संकटात, पैशाची ताकद आणि राजकीय दबावावर निकाल ठरतोय; कपिल सिब्बलांचा प्रहार
भाजप आणि शिंदे गटाचे 68 उमेदवार बिनविरोध, आपली निवडणूक व्यवस्था संकटात, पैशाची ताकद आणि राजकीय दबावावर निकाल ठरतोय; कपिल सिब्बलांचा प्रहार
एक दिवस प्रचार सोडा अन् इथे या, सोलापुरात; हत्याप्रकरणावरुन अमित ठाकरेंचा संताप, मुख्यमंत्र्यांना म्हणाले...
एक दिवस प्रचार सोडा अन् इथे या, सोलापुरात; हत्याप्रकरणावरुन अमित ठाकरेंचा संताप, मुख्यमंत्र्यांना म्हणाले...
Latur Crime: धक्कादायक! नवोदय विद्यालयात 6 वीच्या विद्यार्थीनीने संपवलं जीवन; घातपाताचा संशय
धक्कादायक! नवोदय विद्यालयात 6 वीच्या विद्यार्थीनीने संपवलं जीवन; घातपाताचा संशय
Embed widget