Kolhapur News : कोल्हापुरात बुडण्याची मालिका सुरुच; आता राधानगरी बॅक वॉटरमध्ये तिघांचा बुडून मृत्यू
दाजीपूर अभयारण्याच्या पायथ्याला भटवाडी परिसरात या तिघांचा बुडून मृत्यू झाला. मृतांमध्ये एक पुरुष आणि एक महिला तसेच 13 वर्षाच्या मुलगीचा समावेश आहे.

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून बुडून मृत्यू होणाऱ्यांची मालिका सुरूच आहे. आता राधानगरी बॅक वाॅटरमध्ये तिघांचा बुडून मृत्यू झाल्याची धक्कादाय घटना घडली आहे. दाजीपूर अभयारण्याच्या पायथ्याला भटवाडी परिसरात या तिघांचा बुडून मृत्यू झाला. मृतांमध्ये एक पुरुष आणि एक महिला तसेच 13 वर्षाच्या मुलगीचा समावेश आहे. दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार राधानगरीपैकी भैरीबांबर येथील सतीश टिपूगडे असे या मृत व्यक्तीचे नाव आहे. अन्य दोन महिलांची ओळख पटलेली नाही. पोहायला गेल्यानंतर गाळामध्ये रुतल्यानंतर गुदमरून मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
वेदगंगा नदीत पाण्याचा अंदाज न आल्याने चौघे बुडाले
दरम्यान, अवघ्या 13 दिवसांपूर्वीच आणूर ता. कागल गावाच्या यात्रेसाठी जितेंद्र विलास लोकरे (वय 36, मुरगूड), सौ. रेश्मा दिलीप येळमल्ले (वय 34, अथणी, कर्नाटक), सौ. सविता अमर कांबळे (वय 27 रुकडी), यश दिलीप येळमल्ले (वय 17, अथणी, कर्नाटक) यांचा वेदगंगा नदीवर कपडे धुण्यासाठी गेले असताना बुडून मृत्यू झाला होता. पाण्याचा अंदाज न आल्याने सविता कांबळे आणि रेश्मा दिलीप येळमल्ले या पाण्यात बुडू लागल्या. त्यांना वाचवण्यासाठी जितेंद्र लोकरे आणि यश येळमल्ले पाण्यात उतरले. मात्र, पाण्याचा प्रवाह जोरदार असल्याने चौघेही पाण्यात बुडाल्याची दुर्दैवी घटना घडली होती.
आठवड्यापूर्वीच बस्तवडे ता.कागल येथे वेदगंगा नदीत बुडून चौघांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. या घटनेवेळी बुडणाऱ्या एका महिलेसह बालिकेला म्हणजेच मायलेकींना वाचविल्याबद्दल बस्तवडे येथील अवधूत नागेश वांगळे आणि प्रमोद विश्वास पाटील यांचा सत्कार माझ्या हस्ते झाला. नामदार हसन मुश्रीफ
— Hasan Mushrif (@mrhasanmushrif) May 30, 2024
इतर महत्वाच्या बातम्या
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
