एक्स्प्लोर

KDCC Bank kolhapur : केडीसीसी बँकेत शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर लाभ अनुदानाचे वाटप; 13 हजार शेतकऱ्यांना मिळाले 409 कोटींचे अनुदान 

KDCC Bank : कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत शेतकऱ्यांना महाराष्ट्र शासनाच्या महात्मा जोतीराव फुले कर्जमुक्ती योजना- 2019अंतर्गत प्रोत्साहनपर लाभ अनुदानाच्या मंजुरीपत्रांचे वाटप करण्यात आले.

KDCC Bank kolhapur : कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत शेतकऱ्यांना महाराष्ट्र शासनाच्या महात्मा जोतीराव फुले कर्जमुक्ती योजना- 2019अंतर्गत प्रोत्साहनपर लाभ अनुदानाच्या मंजुरीपत्रांचे वाटप करण्यात आले. बँकेच्या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम झाला. जिल्हा बँकेशी संलग्न असलेल्या एकूण तीन लाख, एक हजार, 280 शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ होणार आहे. दरम्यान, पहिल्या टप्प्यात एक लाख, 13 हजार शेतकऱ्यांच्या खात्यांवर 409 कोटी प्रोत्साहनपर लाभ अनुदान जमा झाले आहे.      

याबाबत अधिक माहिती अशी, याआधीच्या महाविकास आघाडी सरकारने थकीत शेतकऱ्यांना दोन लाख रुपयांपर्यंतची महात्मा जोतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना-2019 आणली होती. यामध्ये जिल्हा बँकेशी संलग्न एकूण 31,138 शेतकऱ्यांना 157 कोटी रुपये कर्जमुक्ती मिळाली होती. त्याचवेळी तत्कालीन उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी नियमितपणे कर्जफेड करणा-या शेतकऱ्यांना 50 हजार रुपये प्रोत्साहनपर लाभ अनुदान देण्याचे घोषित केले होते. दरम्यान; कोरोना संसर्गाच्या महामारीमुळे ते देता आले नव्हते. 

आमदार पी. एन. पाटील म्हणाले, महाविकास आघाडी सरकारच्यावतीने शेतकऱ्यांना हे प्रोत्साहनपर लाभ अनुदान जाहीर केले होते. अर्थमंत्री म्हणून अर्थसंकल्पीय भाषण करताना अजितदादा पवार यांनी राज्याचे माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या जयंतीदिनी म्हणजेच एक जुलै 2022 रोजी कृषी दिनाच्या औचित्यावर हे अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करणार असल्याची घोषणा करून तेवढ्या रक्कमेची पुरवणी मागणीही मंजूर करून घेतली होती. दरम्यान; 30 जून 2022 रोजी राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार कोसळल्यामुळे हे अनुदान देता आले नव्हते. त्याच पुरवणी मागणीचे पैसे आता या शासनाकडून दिले जात आहेत.

संचालक प्रताप उर्फ भैय्या माने म्हणाले,  महाराष्ट्रात शिंदे- फडणवीस सरकार येऊन चार महिने झाले आहेत. हे अनुदान आज वाटप होत असल्याबद्दल या सरकारचे स्वागतच आहे. आलेले हे अनुदान 50 टक्केच शेतकऱ्यांना दिले आहे. उर्वरित 50 टक्के शेतकऱ्यांनाही तात्काळ अनुदान मिळाल्याशिवाय त्यांचीही दिवाळी गोड होणार नाही. त्यामुळे, त्यांच्या खात्यावरही दिवाळीपूर्वी तात्काळ पैसे जमा व्हावेत.

यावेळी बँकेचे संचालक आमदार पी. एन.  पाटील, माजी खासदार डॉ. श्रीमती निवेदिता माने,  ए. वाय. पाटील,  प्रताप उर्फ भैय्या माने, संतोष पाटील, रणजीतसिंह पाटील, सुधीर देसाई, रणवीरसिंग गायकवाड, सौ. श्रुतिका काटकर  आदी संचालक तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. ए. बी. माने उपस्थित होते. स्वागत व प्रास्ताविकपर भाषणात बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. ए. बी. माने यांनी योजनेविषयी सविस्तर माहिती दिली.

महत्त्वाच्या बातम्या

Hasan Mushrif : रस्त्यांची अवस्था पाहून मला आज लाज वाटली; नंदुरबारमधील रस्त्यांच्या परिस्थितीवरुन पालकमंत्री हसन मुश्रीफ नाराज
रस्त्यांची अवस्था पाहून मला आज लाज वाटली; नंदुरबारमधील रस्त्यांच्या स्थितीवरुन हसन मुश्रीफ नाराज
Bar Council : बार काऊन्सिल ऑफ इंडियाच्या अध्यक्षांनी NALSAR प्रकरणी विद्यार्थ्यांची माफी मागितली, वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न
बार काऊन्सिलच्या अध्यक्षांनी विद्यार्थ्यांची माफी मागितली,वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न 
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं होतं; पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं होतं; पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया

व्हिडीओ

Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी
Pm Modi Speech Highlites : मोदींच्या लाल किल्ल्यावरील भाषणातले टॉप 10 मुद्दे
Sanjay Raut Mumbai : १५०० रुपये देऊन मते विकत घेतली अन् ईव्हीएमचा घोटाळा केला- संजय राऊत
Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Hasan Mushrif : रस्त्यांची अवस्था पाहून मला आज लाज वाटली; नंदुरबारमधील रस्त्यांच्या परिस्थितीवरुन पालकमंत्री हसन मुश्रीफ नाराज
रस्त्यांची अवस्था पाहून मला आज लाज वाटली; नंदुरबारमधील रस्त्यांच्या स्थितीवरुन हसन मुश्रीफ नाराज
Bar Council : बार काऊन्सिल ऑफ इंडियाच्या अध्यक्षांनी NALSAR प्रकरणी विद्यार्थ्यांची माफी मागितली, वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न
बार काऊन्सिलच्या अध्यक्षांनी विद्यार्थ्यांची माफी मागितली,वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न 
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं होतं; पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं होतं; पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
बीडमध्ये धनंजय मुंडेंच्या दोन मागण्या, पंकजा मुंडेंकडून एक लगेच मान्य; सुनेत्रा पवार म्हणाल्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवते
बीडमध्ये धनंजय मुंडेंच्या दोन मागण्या, पंकजा मुंडेंकडून एक लगेच मान्य; सुनेत्रा पवार म्हणाल्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवते
Rohit Pawar : तलाठी भरतीत भ्रष्टाचार झाल्याचं सिद्ध झालंय, तत्कालीन महसूलमंत्री म्हणून जबाबदारी स्वीकारुन राजीनामा द्या, रोहित पवार यांचं राधाकृष्ण विखे पाटील यांना आव्हान
मुख्यमंत्र्यांनी मंत्रिमंडळ खातेवाटपात आपलं स्थान कुठं ठेवलं, कधीतरी आत्मपरिक्षण करा, रोहित पवार यांचा विखे पाटलांना टोला
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 ऑगस्ट 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 ऑगस्ट 2026 | शनिवार
Life Insurance : स्वातंत्र्यदिनी भारतीयांचा जीवन विम्यावर विश्वास वाढला; मोठ्या पॉलिसी घेण्याकडे ग्राहकांचा कल,सरासरी प्रीमियममध्ये 42 टक्के वाढ
स्वातंत्र्यदिनी भारतीयांचा जीवन विम्यावर विश्वास वाढला; मोठ्या पॉलिसी घेण्याकडे ग्राहकांचा कल
Embed widget