एक्स्प्लोर

Kolhapur News: कोल्हापुरातील पूरबाधित तालुक्यातील तहसिलदारांना पूरस्थितीच्या सूक्ष्म नियोजनाचे जिल्हाधिकाऱ्यांकडून निर्देश

आपत्ती व टंचाईमध्ये सर्व अधिकाऱ्यांनी समन्वय ठेवावा. हलगर्जीपणा केल्यास त्यांच्यावर आपत्ती व्यवस्थापन कायद्यांतर्गत कडक कारवाई करण्यात येईल, असा इशारा जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी या बैठकीत दिला.

Kolhapur News: कोल्हापूर जिल्ह्यातील (Kolhapur News) संभाव्य पूरस्थितीचा मुकाबला करण्यासाठी पूरबाधित तालुक्यातील तहसिलदारांना येत्या शुक्रवारपर्यंत सूक्ष्म नियोजन करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी दिले आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयात राजर्षी शाहू सभागृहात संभाव्य पूरस्थिती पूर्वतयारी आढावा बैठकीत रेखावार यांनी निर्देश दिले. आपत्ती व टंचाईमध्ये सर्व अधिकाऱ्यांनी समन्वय ठेवावा. कोणीही हलगर्जीपणा करु नये. हलगर्जीपणा केल्यास त्यांच्यावर आपत्ती व्यवस्थापन कायद्यांतर्गत कडक कारवाई करण्यात येईल, असा इशाराही त्यांनी या बैठकीत दिला.

रेखावार म्हणाले की, "येत्या 1 जूनपासून जिल्हाधिकारी कार्यालयात आपत्ती नियंत्रण कक्ष सुरु करण्यात येणार आहे. त्यासाठी 1077 हा टोल फ्री क्रमांक असेल." पूरबाधित तालुक्यातील नागरिकांसाठी काही अतिरिक्त साहित्य लागणार असेल, तर येत्या शुक्रवारी होणाऱ्यात बैठकीत तहसिलदारांनी त्याची मागणी करावी, असे आवाहन त्यांनी केले. डोंगरी तालुक्यात भागामध्ये वीज कोसळण्याचे प्रमाण लक्षात घेता 'दामिनी ॲपद्वारे' संबंधित यंत्रणा व नागरिकांनी कार्यरत रहावे, असेही त्यांनी सांगितले. 

जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक संजयसिंह चव्हाण म्हणाले, "पूरबाधित नागरिकांसाठी आरोग्य यंत्रणा सज्ज आहे. जिल्ह्यातील हातकणंगले, शिरोळ या पंचायत समितीमध्ये, गोसरवाड उपकेंद्र, कवठे बुलंद व सर्व तालुका कार्यालयामध्ये पूरबाधित नागरिकांसाठी बफर स्टॉक स्वरुपात औषधसाठा असून बाधित ग्रामपंचायतींनी नागरिकांसाठी रेशन, औषधसाठा हे पुरेशा प्रमाणात साठवून ठेवावे. नागरिक व पशुधन सुरक्षित राहण्यासाठी नियोजन करावे."

लाईफ जॅकेट, जनरेटर्स, मशिन्स, बोटची पूर्व चाचणी करावी

"पूरबाधित गावांमध्ये यापूर्वी नागरिकांसाठी देण्यात आलेले लाईफ जॅकेट, जनरेटर्स, मशिन्स, बोट आदींची पूर्व चाचणी घेण्यात यावी, जेणेकरुन आपत्ती कालखंडामध्ये अडचण येणार नाही. तसेच आपत्ती संदर्भातील व्हॉटस्ॲप किंवा ई-मेलवरुन जिल्हा प्रशासनाला पाठवलेल्या पत्राची एक कॉपी आपत्ती व्यवस्थापन कार्यालयाला देण्यात यावी," अशी सूचना आपत्ती व्यवस्थापन अधिकारी प्रसाद संकपाळ यांनी केली.

या आढावा बैठकीसाठी अपर पोलीस अधीक्षक जयश्री देसाई, राधानगरी-कागलचे उपविभागीय अधिकारी सुशांत बनसोडे, प्रांताधिकारी श्रीमती वसुंधरा बारवे, मौसमी बर्डे-चौगुले, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. योगेश साळे, कार्यकारी अभियंता (पाटबंधारे) रोहित बांदिवडेकर, एमएसईबीचे कोळी, माध्यमिक शिक्षणाधिकारी डॉ. आंबोकर, पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. वाय.ए.पठाण यांच्यासह आरोग्य, शिक्षण, सार्वजनिक बांधकाम, उपप्रादेशिक परिवहन, महावितरणसह इतर विभागाचे अधिकारी-कर्मचारी प्रत्यक्ष तर पूरबाधित तालुक्यातील तहसिलदार, मुख्याधिकारी, गट विकास अधिकारी हे व्हिडिओ काॅन्फरन्स माध्यमातून या बैठकीसाठी उपस्थित होते.

इतर महत्वाच्या बातम्या

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sanjay Raut : देवेंद्र फडणवीस गोंधळलेलं व्यक्तिमत्व, अडीच वर्षांपूर्वीच्या फौजदाराचा शिपाई झालाय; संजय राऊत कडाडले
देवेंद्र फडणवीस गोंधळलेलं व्यक्तिमत्व, अडीच वर्षांपूर्वीच्या फौजदाराचा शिपाई झालाय; संजय राऊत कडाडले
सोयाबीनला 6 हजारांचा हमीभाव देणार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं आश्वासन!
सोयाबीनला 6 हजारांचा हमीभाव देणार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं आश्वासन!
राहुल गांधींनी सुजयला राष्ट्रवादीतून निवडणूक लढण्याचा सल्ला दिला, म्हणून...; राधाकृष्ण विखेंचा 'माझा कट्टा'वर दावा, नेमकं काय म्हणाले?
राहुल गांधींनी सुजयला राष्ट्रवादीतून निवडणूक लढण्याचा सल्ला दिला, म्हणून...; राधाकृष्ण विखेंचा 'माझा कट्टा'वर दावा, नेमकं काय म्हणाले?
Pune Crime: क्षुल्लक कारणावरून मारहाण! गार वडापाव दिला म्हणून चिडला, बरणी उचचली अन्..; बाणेर परिसरात गुन्हा दाखल
क्षुल्लक कारणावरून मारहाण! गार वडापाव दिला म्हणून चिडला, बरणी उचचली अन्..; बाणेर परिसरात गुन्हा दाखल
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Sanjay Raut Full PC : मोदींच्या सभेत फक्त पाच हजार लोकं होती; त्यातील निम्मे भाड्याची माणसंABP Majha Headlines :  9 AM : 15 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सDevendra Fadnavis  : मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही - देवेंद्र फडणवीसRohit Pawar on Kangana Ranaut : रोहित पवारांचा कंगना रणावत यांच्यावर हल्लाबोल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sanjay Raut : देवेंद्र फडणवीस गोंधळलेलं व्यक्तिमत्व, अडीच वर्षांपूर्वीच्या फौजदाराचा शिपाई झालाय; संजय राऊत कडाडले
देवेंद्र फडणवीस गोंधळलेलं व्यक्तिमत्व, अडीच वर्षांपूर्वीच्या फौजदाराचा शिपाई झालाय; संजय राऊत कडाडले
सोयाबीनला 6 हजारांचा हमीभाव देणार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं आश्वासन!
सोयाबीनला 6 हजारांचा हमीभाव देणार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं आश्वासन!
राहुल गांधींनी सुजयला राष्ट्रवादीतून निवडणूक लढण्याचा सल्ला दिला, म्हणून...; राधाकृष्ण विखेंचा 'माझा कट्टा'वर दावा, नेमकं काय म्हणाले?
राहुल गांधींनी सुजयला राष्ट्रवादीतून निवडणूक लढण्याचा सल्ला दिला, म्हणून...; राधाकृष्ण विखेंचा 'माझा कट्टा'वर दावा, नेमकं काय म्हणाले?
Pune Crime: क्षुल्लक कारणावरून मारहाण! गार वडापाव दिला म्हणून चिडला, बरणी उचचली अन्..; बाणेर परिसरात गुन्हा दाखल
क्षुल्लक कारणावरून मारहाण! गार वडापाव दिला म्हणून चिडला, बरणी उचचली अन्..; बाणेर परिसरात गुन्हा दाखल
Devendra Fadnavis: देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक गौप्यस्फोट, म्हणाले, 'शरद पवारांच्या पत्रामुळेच महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागली'
त्यावेळी आम्ही शरद पवारांच्या सूचनेनुसार वागत होतो; देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक गौप्यस्फोट
Ramdas Kadam: आदित्य ठाकरेंची औकाद काय? पुन्हा सत्ता आल्यावर दिशा सालियन प्रकरणाची चौकशी लावणारच: रामदास कदम
आदित्य ठाकरे तुमची औकाद काय? रामदास कदम संतापाने लालबुंद होत म्हणाले, तुझी चौकशी....
मंचावर बसले अन् मध्येच एक लेटर आलं, भर सभेतच म्हणाले 'आय लव्ह यू'; ओवैसींच्या विराट सभेत नेमकं काय घडलं?
मंचावर बसले अन् मध्येच एक लेटर आलं, भर सभेतच म्हणाले 'आय लव्ह यू'; ओवैसींच्या विराट सभेत नेमकं काय घडलं?
Raj Thackeray: रमेश वांजळेंचा मुलगा माझा पुतण्या; मित्राच्या आठवणीने राज ठाकरे भर जाहीर सभेत भावूक, Video
रमेश वांजळेंचा मुलगा माझा पुतण्या; मित्राच्या आठवणीने राज ठाकरे भर जाहीर सभेत भावूक, Video
Embed widget