एक्स्प्लोर

Kolhapur News : हसन मुश्रीफ पालकमंत्री होताच दुसऱ्याच दिवशी कोल्हापूरसाठी उपमुख्यमंत्री अजित पवारांची मोठी घोषणा!

उपमुख्यमंत्री अजित पवार पुन्हा एकदा सक्रिय झाले आहेत. कोल्हापूरचं पालकमंत्रीपद वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या पारड्यात टाकल्यानंतर मोठा निर्णय दुसऱ्याच दिवशी घेतला आहे.

मुंबई : पालकमंत्री बाजी मारल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार पुन्हा एकदा सक्रिय झाले आहेत. कोल्हापूरचं पालकमंत्रीपद वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या पारड्यात टाकल्यानंतर मोठा निर्णय दुसऱ्याच दिवशी घेतला आहे. कोल्हापुरात संगणक, माहिती तंत्रज्ञान उद्योगांची वाढ व्हावी, स्थानिक युवकांना रोजगार मिळावा, यासाठी शेंडापार्क परिसरात आयटी पार्क उभारण्यात यावे. त्यासाठी शेंडापार्क येथील आयटी पार्कसाठी महात्मा फुले कृषी विद्यापीठाची 30 हेक्टर जागा उपलब्ध करून द्यावी. या जागेच्या बदल्यात कृषी विद्यापीठास त्यांच्या विविध प्रकल्पांसाठी शहरालगतची 50 हेक्टर जागा द्यावी, असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज मंत्रालयात आयोजित बैठकीत दिले.

कृषी विद्यापीठाची 30 हेक्टर जागा आयटी पार्कसाठी उपलब्ध करुन द्यावी

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली आज मंत्रालयात कोल्हापूरच्या शेंडापार्क परिसरात आयटी पार्क उभारण्यासाठी जागा उपलब्ध करून देण्याबाबत बैठक झाली. यावेळी बोलताना अजित पवार म्हणाले की, कोल्हापूरची वाढती लोकसंख्या आणि शहरीकरणाचा वेग लक्षात घेता येथील विद्यार्थी, युवकांना स्थानिक परिसरात रोजगार उपलब्ध होणे गरजेचे आहे. त्यासाठी शहरातील शेंडा पार्क येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठाची 30 हेक्टर जागा आयटीपार्क साठी उपलब्ध करुन द्यावी. यामुळे विद्यार्थ्यांना प्रशिक्षणाच्या आणि तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील. 

शासकीय आयटीपार्क पूर्ण क्षमतेने सुरू करण्याच्या प्रक्रियेस गती द्यावी

त्यांनी पुढे सांगितले की, आयटी पार्कसाठी कृषी विद्यापीठाची मोकळी 30 हेक्टर जागा देताना, विद्यापीठाला पर्यायी 50 हेक्टर जागा उपलब्ध करून द्यावी. शहरातील या क्षेत्रापासून विमानतळ आणि पुरेशा नागरी सुविधा उपलब्ध असल्याने आंतरराष्ट्रीय कंपन्यांची गुंतवणूक वाढण्यास मदत होणार आहे. आंतरराष्ट्रीय कंपन्यांना पुण्यानंनंतर कोल्हापूर हा चांगला पर्याय आहे. आयटी पार्कची उभारणी निश्चित कालमर्यादेत करण्याचे निर्देशही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले. कोल्हापूर शहरात असलेले शासकीय आयटीपार्क पूर्ण क्षमतेने सुरू करण्याच्या प्रक्रियेस गती द्यावी, असेही उपमुख्यमंत्र्यांनी सांगितले.

या बैठकीस पालकमंत्री हसन मुश्रीफ, कृषीमंत्री धनंजय मुंडे, शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर, आमदार ऋतुराज पाटील, आमदार श्रीमती जयश्री जाधव, महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. पी.जी. पाटील, वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव नितिन करीर, महसूल विभागाचे अपर मुख्य सचिव राजगोपाल देवरा, कृषी विभागाचे अपर मुख्य सचिव अनुपकुमार, नियोजन विभागाचे प्रधान सचिव सौरभ विजय, उद्योग विभागाचे प्रधान सचिव हर्षदीप कांबळे, कोल्हापूरचे जिल्हाधिकारी राहूल रेखावार (व्हीसीद्वारे), एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी बिपीन शर्मा (व्हीसीद्वारे) आदी मान्यवर उपस्थित होते.

इतर महत्वाच्या बातम्या 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Rolta India : अंधेरीतील 'रोल्टा इंडिया' कंपनीने कर्मचाऱ्यांचे कोट्यवधींचे वेतन थकवले, PF देखील भरला नाही; कर्मचाऱ्यांचा आरोप
अंधेरीतील 'रोल्टा इंडिया' कंपनीने कर्मचाऱ्यांचे कोट्यवधींचे वेतन थकवले, PF देखील भरला नाही; कर्मचाऱ्यांचा आरोप
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावरच; खासदार अशोक चव्हाणांनी दिले स्पष्ट संकेत, म्हणाले.. 
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावरच; खासदार अशोक चव्हाणांनी दिले स्पष्ट संकेत, म्हणाले.. 
Pune Crime News: पुण्यात अवैध पिस्तुलांचे मध्यप्रदेशात कनेक्शन समोर; पुणे पोलिसांच्या पुणे शाखेकडून 9 आरोपींसह 7 पिस्टल जप्त
पुण्यात अवैध पिस्तुलांचे मध्यप्रदेशात कनेक्शन समोर; पुणे पोलिसांच्या पुणे शाखेकडून 9 आरोपींसह 7 पिस्टल जप्त
Israel-Hamas ceasefire in Gaza : इस्रायल आणि हमासमध्ये तब्बल 14 महिन्यांनी युद्धविराम; हमासने 3 इस्रायली ओलीसांची नावे पाठवली, आज मुक्तता केली जाणार
इस्रायल आणि हमासमध्ये तब्बल 14 महिन्यांनी युद्धविराम; हमासने 3 इस्रायली ओलीसांची नावे पाठवली, आज मुक्तता केली जाणार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 09PM TOP Headlines 09 PM 19 January 2024Special Report Saif Ali Khan Attacker :र्जी, G-पे आणि बेड्या;सैफच्या 'जानी दुश्मन'च्या अटकेची कहाणीWankhede Stadium Turns 50 Documentry : वानखेडे झालं 50 वर्षांचं! कहाणी वानखेडे स्टेडियमच्या निर्मितीचीABP Majha Marathi News Headlines 08PM TOP Headlines 08 PM 19 January 2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rolta India : अंधेरीतील 'रोल्टा इंडिया' कंपनीने कर्मचाऱ्यांचे कोट्यवधींचे वेतन थकवले, PF देखील भरला नाही; कर्मचाऱ्यांचा आरोप
अंधेरीतील 'रोल्टा इंडिया' कंपनीने कर्मचाऱ्यांचे कोट्यवधींचे वेतन थकवले, PF देखील भरला नाही; कर्मचाऱ्यांचा आरोप
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावरच; खासदार अशोक चव्हाणांनी दिले स्पष्ट संकेत, म्हणाले.. 
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावरच; खासदार अशोक चव्हाणांनी दिले स्पष्ट संकेत, म्हणाले.. 
Pune Crime News: पुण्यात अवैध पिस्तुलांचे मध्यप्रदेशात कनेक्शन समोर; पुणे पोलिसांच्या पुणे शाखेकडून 9 आरोपींसह 7 पिस्टल जप्त
पुण्यात अवैध पिस्तुलांचे मध्यप्रदेशात कनेक्शन समोर; पुणे पोलिसांच्या पुणे शाखेकडून 9 आरोपींसह 7 पिस्टल जप्त
Israel-Hamas ceasefire in Gaza : इस्रायल आणि हमासमध्ये तब्बल 14 महिन्यांनी युद्धविराम; हमासने 3 इस्रायली ओलीसांची नावे पाठवली, आज मुक्तता केली जाणार
इस्रायल आणि हमासमध्ये तब्बल 14 महिन्यांनी युद्धविराम; हमासने 3 इस्रायली ओलीसांची नावे पाठवली, आज मुक्तता केली जाणार
Deepak Kedar : सैफ अली खानसाठी दया नायक कमरेला बंदूक लावून गेला, मग आम्हाला न्याय का नाही? पँथर सेनेच्या अध्यक्षांचा सवाल, धनंजय मुंडेंनाही डिवचलं!
सैफ अली खानसाठी दया नायक कमरेला बंदूक लावून गेला, मग आम्हाला न्याय का नाही? पँथर सेनेच्या अध्यक्षांचा सवाल, धनंजय मुंडेंनाही डिवचलं!
Manoj Jarange Patil : तर मुख्यमंत्र्यांचा सामना आमच्याशी, राज्य बंद करू; मनोज जरांगे पाटलांचा जनआक्रोश मोर्चातून इशारा
तर मुख्यमंत्र्यांचा सामना आमच्याशी, राज्य बंद करू; मनोज जरांगे पाटलांचा जनआक्रोश मोर्चातून इशारा
Beed Accident News: पोलीस भरतीचं स्वप्न भंगलं, सराव करणाऱ्या तीन तरुणांचा दुर्दैवी अंत; मृतांच्या नातेवाईकांना एसटीतर्फे 10 लाखाची मदत
पोलीस भरतीचं स्वप्न भंगलं, सराव करणाऱ्या तीन तरुणांचा दुर्दैवी अंत; मृतांच्या नातेवाईकांना एसटीतर्फे 10 लाखांची मदत
Dada Bhuse : नाशिकच्या पालकमंत्रिपदावरून पत्ता कट, मंत्री दादा भुसेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
नाशिकच्या पालकमंत्रिपदावरून पत्ता कट, मंत्री दादा भुसेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
Embed widget