Devendra Fadnavis Banner In Kolhapur: दैनिके, विमानतळानंतर आता कोल्हापुरातही 'निनावी' फ्लेक्सवर 'देवाभाऊ' प्रकटले!
या फ्लेक्सवरही निनावी पद्धतीने देवाभाऊ यांची बॅनरबाजी करण्यात आली आहे. त्यामुळे आता कोल्हापुरातील बॅनरबाजी ही कोणाकडून करण्यात आली? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

Devendra Fadnavis Banner In Kolhapur: मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईमध्ये आझाद मैदानात ठाण मांडल्यानंतर यशस्वी तोडगा काढल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निनावी जाहिराती राज्यभरातील दैनिकांमध्ये झळकल्याने राजकीय भुवया उंचावल्या. मराठीसह इंग्रजीच्या प्रमुख दैनिकांमध्ये पान एक आणि पान दोननंबरवर देवाभाऊ जाहिराती प्रसिद्ध झाल्या होत्या. या जाहिरातींवरून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी हल्लाबोल केला असतानाच आता कोल्हापूरमध्ये सुद्धा डिजिटल फ्लेक्सवर देवाभाऊ प्रकट झाले आहेत. अर्थातच या फ्लेक्सवरही निनावी पद्धतीने देवाभाऊ यांची बॅनरबाजी करण्यात आली आहे. त्यामुळे आता कोल्हापुरातील बॅनरबाजी ही कोणाकडून करण्यात आली? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
कोल्हापुरातही देवाभाऊंची फ्लेक्सबाजी
रोहित पवार यांनी दैनिकांमधून देवाभाऊ म्हणत देण्यात आलेल्या जाहिराती या भाजपकडून नव्हे तर मित्र पक्षाच्या मंत्र्यांकडून देण्यात आल्याचा दावा करण्यात आला होता आणि लवकरच त्यांचं नाव उघड करणार असंही म्हटलं होतं. आता या सर्व पार्श्वभूमीवर कोल्हापूरमध्ये देवाभाऊ यांच्या जाहिराती कोणी लावल्या? असा सुद्धा प्रश्न उपस्थित झाला आहे. कोल्हापुरातील मध्यवर्ती भाग असलेल्या मिरजकर तिकटी, दसरा चौक परिसरामध्ये तसेच खानविलकर पेट्रोल पंपाच्या बाजूला भाजप कार्यालयापासून हाकेच्या अंतरावर देवाभाऊ यांचे फलक लावण्यात आले आहेत. त्यामुळे ही फलकबाजी आता भाजपच्या कार्यकर्त्यांकडून करण्यात आली की अन्य कोणी केली याची आता याची चर्चा सुरू झाली आहे.
मा. बावनकुळे साहेब,
— Rohit Pawar (@RRPSpeaks) September 7, 2025
तुम्ही रोज ४० कोटी ऐवजी ४०० किंवा ४००० कोटीच्या जाहिराती छापा आमचा आक्षेप नाही, पण या जाहिराती निवावी का छापल्या गेल्या? याबद्दल आमचा आक्षेप आहे. कारण निनावी जाहिरात म्हणजे उपकाराची परतफेड असते हे तुम्हाला चांगलं ठाऊक असेल.
या जाहिराती सरकारने दिल्या असतील तर…
भाजप नव्हे तर मित्रपक्षाच्या एका मंत्र्याने जाहिराती दिली
रम्यान, रोहित पवार यांनी म्हटले आहे की, हा मंत्री भाजपचा नव्हे तर मित्रपक्षाच्या एका मंत्र्याने जाहिराती दिली आहे. त्यामुळे या जाहिरातीसाठी करण्यात आलेल्या खर्चावरून त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. ते म्हणाले की या जाहिरातीसाठी कोट्यवधी रुपये कोठून आले? हा मंत्री कोण? असे असे अनेक प्रश्न निर्माण होतात. जाहिराती देणारे समोर आले तर या प्रश्नांची उत्तर नक्कीच मिळतील, असे त्यांनी ट्विट करत म्हटलं आहे. रोहित पवार यांनी ट्विट करत म्हटलं आहे की, एकीकडे राज्यात रोज ८ शेतकरी आत्महत्या होत असताना आणि अतिवृष्टीने संपूर्ण महाराष्ट्र झोडपला असताना वृत्तपत्रांच्या पहिल्या पानावर तसेच अनेक विमानतळांवर कोट्यवधी रुपये उधळून मुख्यमंत्र्यांच्या मोठमोठ्या जाहिराती देण्याची सरकारची वृत्ती बघून मोठी चीड आली, परंतु मा. देवेंद्र फडणवीस साहेबांसारखे मोठे नेते अशी चूक करणार नाहीत, हा विश्वास होता.
इतर महत्वाच्या बातम्या
























