(Source: ECI/ABP News/ABP Majha)
CM Eknath Shinde : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा कोल्हापूर दौरा अचानक रद्द
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा कोल्हापूर दौरा (Chief Minister Eknath Shinde visit to Kolhapur) अचानक रद्द झाला आहे. अचानक दौरा रद्द करण्यामागे उद्याप कारण स्पष्ट झालेलं नाही.
CM Eknath Shinde : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा कोल्हापूर दौरा (Chief Minister Eknath Shinde visit to Kolhapur) अचानक रद्द झाला आहे. अचानक दौरा रद्द करण्यामागे उद्याप कारण स्पष्ट झालेलं नाही. मात्र, मिळालेल्या माहितीनुसार मुंबईमध्ये अचानक महत्त्वाचं काम आल्याने दौरा रद्द करण्यात आला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज कोल्हापूर दौऱ्यामध्ये करवीर निवासिनी श्री अंबाबाईचे दर्शन घेतल्यानंतर शासकीय विश्रामगृहावर पदाधिकाऱ्यांच्या भेटीगाठी करणार होते. यानंतर दुपारी साडे तीन वाजता शासकीय हेलिकॉप्टरने दरे, (ता. महाबळेश्वर, जि. सातारा) या त्यांच्या मुळगावी प्रयाण करणार होते.
खेळाडूंना राज्यात काही कमी पडू देणार नाही
राज्यात गुणवत्तेला कमी नसून खेळाडूंना राज्यात काही कमी पडू देणार नाही. राज्यातील क्रीडा संकुलांची संख्या वाढवण्यात येईल, तसेच खेळाडूंसाठी आंतरराष्ट्रीय प्रशिक्षकांची नियुक्ती करण्यात येईल आणि सुरू असलेल्या क्रीडा योजना चालू ठेवून त्यात आणखी नव्या योजनांची भर घालण्यात येईल, असे प्रतिपादन गुरुवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. म्हाळुंगे बालेवाडी येथील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलातील बॅडमिंटन सभागृहात महाराष्ट्र ऑलिम्पिक स्पर्धेचा औपचारिक उद्घाटन सोहळा पार पडला. यावेळी बोलताना मुख्यमंत्री शिंदे यांनी उपस्थित खेळाडूंना सरकार खेळाडूंबरोबर असल्याचा विश्वास दिला. इंटरनेटच्या युगात खेळाडूंनी मैदानावर उतरायला हवे. मैदानावरील उपस्थिती हा तंदुरुस्त- आरोग्याचा मंत्र असतो. मैदानावर दिवसातला एक तास घालवला तरी आव्हानाचा सामना करण्याची जबरदस्त ऊर्जा तयार होते, असेही शिंदे म्हणाले.
खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी सरकारने यापूर्वीच रोख पारितोषिकात पाचपट वाढ केली आहे. सरकार खेळाडूंबरोबर कायम असेल. राज्यात नव्याने 122 क्रीडा संकुले सुरू करण्यात येतील. राज्यातील खेळाडूंना चांगले प्रशिक्षित करण्यासाठी त्यांच्यासाठी आंतरराष्ट्रीय प्रशिक्षकांची नियुक्तीही करण्यात येईल, राज्यातून ऑलिम्पिक पदकविजेता खेळाडू घडण्यासाठी महाराष्ट्र सरकार कुठेही कमी पडणार नाही, असेही त्यांनी नमूद केले.
इतर महत्वाच्या बातम्या