(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Santosh Trophy in Kolhapur : कोल्हापुरात उद्यापासून संतोष ट्रॉफीचा थरार रंगणार; देशातील दिग्गज संघांचा खेळ पाहण्याची फुटबाॅलप्रेमींना सुवर्णसंधी
कोल्हापुरात उद्यापासून प्रथमच संतोष ट्रॉफीचा थरार रंगणार आहे. 76 व्या संतोष ट्रॉफीच्या ग्रुप चारमधील लीग सामने कोल्हापुरात होणार आहेत. पंधरा जानेवारीपर्यंत सामने खेळविण्यात येणार आहेत.
Santosh Trophy : कोल्हापुरात उद्यापासून प्रथमच संतोष ट्रॉफीचा थरार (Santosh Trophy) रंगणार आहे. 76 व्या संतोष ट्रॉफीच्या ग्रुप चारमधील लीग सामने कोल्हापुरात होणार आहेत. पंधरा जानेवारीपर्यंत सामने खेळविण्यात येणार आहेत. देशातील दिग्गज संघांचा खेळ पाहण्याची संधी फुटबॉलप्रेमींना मिळणार आहे. स्पर्धेचे उद्घाटन सात जानेवारी रोजी दुपारी साडेतीन वाजता श्रीमंत शाहू छत्रपती महाराज यांच्या हस्ते होईल. यावेळी पेट्रन् मेंबर संभाजीराजे छत्रपती, वेस्टर्न इंडिया फुटबॉल असोसिएशनचे उपाध्यक्ष व केएसएचे अध्यक्ष मालोजीराजे छत्रपती, मधुरिमाराजे छत्रपती यांची उपस्थिती असेल.
भारतातील राज्यांच्या संघांची एकूण 6 गटात प्रत्येकी 6 संघाचा समावेश आहे. स्पर्धेतील सर्व संघ शुक्रवारी कोल्हापुरात येणार असून अ संघांना सराव करणेसाठी पोलो ग्राऊंड उपलब्ध करून देण्यात आलं आहे. संतोष ट्रॉफी स्पर्धेच्या निमित्ताने चांगल्या खेळाडूंचा खेळ जवळून पाहण्याची संधी कोल्हापूरातील खेळाडूंना व फुटबॉल शौकिनांना मिळणार आहे. यजमान महाराष्ट्र पश्चिम बंगाल, मध्यप्रदेश, छत्तीसगड, दीव दमन व दादरा, हरियाणा या संघांचा स्पर्धेत समावेश आहे. यापूर्वी अनेक वर्षे संतोष ट्रॉफीचे सामने सर्वच राज्यांच्या सहभागाने एकाच ठिकाणी होत होते. त्याऐवजी ईस्ट झोन, नॉर्थ झोन, साऊथ झोन, वेस्ट झोन व सेंट्रल झोन या पाच विभागात सुरू केली आहे. हे सामने दिल्ली, कोझिकोड (केरळ), आसाम, भुवनेश्वर (ओडिशा) आणि कोल्हापूरचा समावेश आहे. स्पर्धेत दररोज तीन सामने होणार आहेत.
महाराष्ट्राच्या फुटबॉल संघात कोल्हापूरच्या पाच खेळाडूंची निवड
दरम्यान, संतोष ट्रॉफीसाठी महाराष्ट्राच्या संघात 5 जणांचा समावेश झाला आहे. पवन विजय माळी (दिलबहार तालीम मंडळ), इंद्रजीत दिनकर चौगुले ( शिवाजी तरूण मंडळ), यश नामदेव देवणे (पाटाकडील तालीम मंडळ), ऋषीकेश गणेश मेथे-पाटील (पाटाकडील ), ओंकार सुरेश पाटील (पाटाकडील) अशी महाराष्ट्र फुटबाॅल संघात निवड झालेल्या खेळाडूंची नावे आहेत. हे कोल्हापूर स्पोर्ट्स असोसिएशनचे (Kolhapur Sports Association) खेळाडू आहेत.
कोल्हापुरातील सामन्यांचे वेळापत्रक
7 जानेवारी
- दमण आणि दादरा विरुद्ध छत्तीसगड, कोल्हापूर
- हरियाणा विरुद्ध बंगाल, कोल्हापूर
- मध्य प्रदेश विरुद्ध महाराष्ट्र, कोल्हापूर
9 जानेवारी
- दमण आणि दादरा विरुद्ध बंगाल, कोल्हापूर
- छत्तीसगड विरुद्ध महाराष्ट्र, कोल्हापूर
- हरियाणा विरुद्ध मध्य प्रदेश, कोल्हापूर
11 जानेवारी
- दमण आणि दादरा विरुद्ध महाराष्ट्र, कोल्हापूर
- बंगाल विरुद्ध मध्य प्रदेश, कोल्हापूर
- छत्तीसगड विरुद्ध हरियाणा, कोल्हापूर
13 जानेवारी
- दमण आणि दादरा विरुद्ध मध्य प्रदेश, कोल्हापूर
- महाराष्ट्र विरुद्ध हरियाणा, कोल्हापूर
- बंगाल विरुद्ध छत्तीसगड, कोल्हापूर
15 जानेवारी
- दमण आणि दादरा विरुद्ध हरियाणा, कोल्हापूर
- मध्य प्रदेश विरुद्ध छत्तीसगड, कोल्हापूर
- महाराष्ट्र विरुद्ध बंगाल, कोल्हापूर
इतर महत्वाच्या बातम्या