एक्स्प्लोर

गोविंदगिरींकडून मोदींची छत्रपती शिवाजी महाराजांशी तुलना, संभाजीराजे छत्रपतींची पहिली प्रतिक्रिया

निवडणुका समोर आहेत म्हणून कसही सर्व्हेक्षण करू नका आठ दिवसांपेक्षा चार महिने घ्या पण मराठा समाजाची पुन्हा फसवणूक नको, असे देखील संभाजीराजे  म्हणाले. 

कोल्हापूर : अयोध्येत (Ayodhya) प्रभू श्रीरामांच्या मंदिराचा (Ram Mandir) लोकार्पणाचा भव्य कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमात स्वामी गोविंदगिरी महाराज (Govinda Dev Giri) यांनी व्यासपीठावर भाषण करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं तोंडभरुन कौतुक केलं. यावेळी त्यांनी आपल्या भाषणात पंतप्रधान मोदींची छत्रपती शिवाजी महाराजांशी तुलना केली. त्यानंतर त्यांनी वक्तव्य मागे घेण्याची मागणी होऊ लागली आहे. गोविंद देव गिरी महाराजांच्या वक्तव्यानंतर  संभाजी राजे छत्रपती यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. ते कोल्हापुरात माध्यमांशी बोलत होते.  

 संभाजी राजे छत्रपती यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. गोविंद गिरी महाराज काय म्हणालेत हे मी ऐकलं नाही. त्यामुळं यावर ठोस बोलणं उचित होणार नाही, असे  संभाजी राजे छत्रपती म्हणाले. तसेच लोकसभा निवडणुकीसाठी माझ्यासोबत महाविकास आघाडीतील काँग्रेसचे नेते चर्चा करत आहेत. लोकसभेसाठी माझं पाहिले प्रेम कोल्हापूरच आहे, असे संभाजीराजे छत्रपती म्हणाले. 

सर्व्हेक्षण करताना कोणत्याही त्रुटी राहू नये याची काळजी घ्या : संभाजीराजे

संभाजीराजे छत्रपती म्हणाले, मराठा समाजाचे सर्व्हेक्षण करण्याचे ठरवले आहे हे आनंदाचे आहे. आरक्षण मिळवायचे असेल तर सर्व्हेक्षण करावे लागणार ही मागणी मी करत होतो. मात्र आता इतक्या वर्षांनी सरकारने सुरू केलं हे आनंदाचे आहे. आता सर्व्हेक्षण करताना कोणत्याही त्रुटी राहू नये याची काळजी घ्यायला पाहिजे. मराठा समाजाचे सर्व्हेक्षण करण्याचे ठरवले आहे हे आनंदाचे आहे. आरक्षण मिळवायचे असेल तर सर्व्हेक्षण करावे लागणार ही मागणी मी करत होतो. मात्र आता इतक्या वर्षांनी सरकारने सुरू केलं हे आनंदाचे आहे. आता सर्व्हेक्षण करताना कोणत्याही त्रुटी राहू नये याची काळजी घ्यायला पाहिजे.

मराठा समाजातील सर्वांना आरक्षण मिळावं यासाठी व्यवस्था केली पाहिजे : संभाजीराजे 

कुणालाही खुश करण्यासाठी शॉर्टकट वापरू नका, नाहीतर पुन्हा कोर्टात हे टिकणार नाही. आठ दिवसात करतो, 10 दिवसात करतो यापेक्षा परिपूर्ण सर्व्हेक्षण व्हावं. मनोज जरांगे पाटील हे प्रामाणिकपणे आरक्षणासाठी लढत आहेत. कुणबी प्रमाणपत्र सर्वांनाच मिळणार नाही, त्यामुळे मराठा समाजातील सर्वांना आरक्षण मिळावं यासाठी व्यवस्था केली पाहिजे, असे संभाजीराजे छत्रपती म्हणाले. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लक्ष घातलं तर हा प्रश्न तातडीने सुटेल : संभाजीराजे

मनोज जरांगे पाटील यांना मुंबईत येण्याची गरज का तयार करत आहे.  सरकार तातडीने घोषित का करत नाही की आम्हाला कशा पद्धतीने आरक्षण देणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लक्ष घातलं तर हा प्रश्न तातडीने सुटेल.  क्युरेटिव्ह पिटीशनवर सुनावणी होईल आणि मराठा समाजाची बाजू ऐकून घेतली जाईल, असे देखील संभाजीराजे छत्रपती म्हणाले. 

मराठा समाजाची पुन्हा फसवणूक नको : संभाजीराजे

छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेतली हे मुख्यमंत्र्यांनी धाडस केलंपण आरक्षण कसं देणार हे सांगावं. देवेंद्र फडणवीस असताना आरक्षण टिकलं नाही. निवडणुका समोर आहेत म्हणून कसही सर्व्हेक्षण करू नका आठ दिवसांपेक्षा चार महिने घ्या पण मराठा समाजाची पुन्हा फसवणूक नको, असे देखील संभाजीराजे  म्हणाले. 

हे ही वाचा :

गोविंदगिरींकडून मोदींची छत्रपती शिवाजी महाराजांशी तुलना, उद्धव ठाकरे म्हणाले,"कधीच नाही"

महत्त्वाच्या बातम्या

Kolhapur News: सत्ताधारी नगरसेविकेच्या विनयभंग तक्रारीमुळे कोल्हापुरात खळबळ; वारंवार अश्लील शिवीगाळ करून धमकी दिल्याचा आरोप
सत्ताधारी नगरसेविकेच्या विनयभंग तक्रारीमुळे कोल्हापुरात खळबळ; वारंवार अश्लील शिवीगाळ करून धमकी दिल्याचा आरोप
Raju Shetti on Sugar Price: साखरेची अचानक झालेली दरवाढ संशयास्पद; राजू शेट्टींनी व्यक्त केली वेगळीच शंका, म्हणाले 'ती' साखर आता विक्रीसाठी काढली जाईल
साखरेची अचानक झालेली दरवाढ संशयास्पद; राजू शेट्टींनी व्यक्त केली वेगळीच शंका, म्हणाले 'ती' साखर आता विक्रीसाठी काढली जाईल
Hasan Mushrif: 'मोदी साहेबांना, अमित शाहांना एकेरी भाषेत बोलत आहेत हे राहुल गांधींना शोभत नाही, विरोधी पक्षनेते असतील, पण..' हसन मुश्रीफांचा संताप
'मोदी साहेबांना, अमित शाहांना एकेरी भाषेत बोलत आहेत हे राहुल गांधींना शोभत नाही, विरोधी पक्षनेते असतील, पण..' हसन मुश्रीफांचा संताप
कोल्हापूर : पन्हाळा तालुक्यातील बाजारभोगाव प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचाऱ्यांच्या अंथरुणात साप; रुग्णांच्या नातेवाईकांना साप पकडण्याची वेळ आली
कोल्हापूर : पन्हाळा तालुक्यातील बाजारभोगाव प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचाऱ्यांच्या अंथरुणात साप; रुग्णांच्या नातेवाईकांना साप पकडण्याची वेळ आली

व्हिडीओ

Chhatrapati Sambhajinagar News: मुलगा आणि वडिलांमध्ये नेमका वाद काय होता, तपासातून कारण काय समोर आलं?; DCP नवले यांनी A टू Z सांगितलं!
Rahul Gandhi Pune : राहुल गांधींच्या कार्यक्रमासाठी जोरदार तयारी, बाराशे पोलिस तैनात
Mahabaleshwar Tourist News: धुक्यात हरवलं महाबळेश्वर; सह्याद्रीच्या हिरवाईने पर्यटकांना घातली भुरळ
Abhijeet Dipke On School : शाळेत धडक, नियम किती कडक? | Special Report ABP Majha
Prithviraj Chavan On NCP : पृथ्वीराज चव्हाणांचा दावा, तापली राजकीय हवा | Special Report ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
पाकिस्तानाने पाकव्याप्त काश्मीरात रिपोर्टिंग करणाऱ्या पत्रकाराला थेट दहशतवादी यादीत टाकलं! कोणत्याही खटल्याशिवाय कारवाई, बँक खाती सील अन् प्रवासावर सुद्धा बंदी
पाकिस्तानाने पाकव्याप्त काश्मीरात रिपोर्टिंग करणाऱ्या पत्रकाराला थेट दहशतवादी यादीत टाकलं! कोणत्याही खटल्याशिवाय कारवाई, बँक खाती सील अन् प्रवासावर सुद्धा बंदी
तुम्हाला धमकावलं जाईल, घाबरवल जाईल, पण...; काँग्रेस नेत्यांसोबत बैठक, पुण्यात राहुल गांधींकडून कानमंत्र
तुम्हाला धमकावलं जाईल, घाबरवल जाईल, पण...; काँग्रेस नेत्यांसोबत बैठक, पुण्यात राहुल गांधींकडून कानमंत्र
Nitin Nabin : सार्वजनिक जीवनात संयम आणि शिस्त पाळा, भाजप अध्यक्ष नितीन नवीन यांचा नव्या टीमला थेट संदेश 
सार्वजनिक जीवनात संयम आणि शिस्त पाळा,नितीन नवीन यांचा नव्या टीमला थेट संदेश
Rahul Gandhi In Pune : राहुल गांधी पुण्यात; प्रदेशाध्यक्षांसह बडे नेते स्वागताला, सतेज पाटील, प्रणिती शिंदेंसह विद्यार्थ्यांकडूनही 'वेलकम'
राहुल गांधी पुण्यात; प्रदेशाध्यक्षांसह बडे नेते स्वागताला, सतेज पाटील, प्रणिती शिंदेंसह विद्यार्थ्यांकडूनही 'वेलकम'
TikTok : अमेरिकेचा टिकटॉकला दणका, तब्बल 3300 कोटींचा दंड ठोठावला, नेमकं काय घडलं?
अमेरिकेचा टिकटॉकला दणका, तब्बल 3300 कोटींचा दंड ठोठावला, नेमकं काय घडलं?
मला मंत्रिमंडळात संधी मिळण्याचे चान्सेस 100 टक्के; खासदार बंडू जाधव काय म्हणाले, ओमराजेंबद्दलही बोलले
मला मंत्रिमंडळात संधी मिळण्याचे चान्सेस 100 टक्के; खासदार बंडू जाधव काय म्हणाले, ओमराजेंबद्दलही बोलले
BJP Team for Generation G: जेन-जी सोबत कनेक्ट होण्यासाठी भाजपच्या विशेष टीमची घोषणा; विनोद तावडेंना पुन्हा मोठी जबाबदारी, टीममध्ये कोणाकोणाचा समावेश?
जेन-जी सोबत कनेक्ट होण्यासाठी भाजपच्या विशेष टीमची घोषणा; विनोद तावडेंना पुन्हा मोठी जबाबदारी, टीममध्ये कोणाकोणाचा समावेश?
Subodh Savji on Sugar Price Hike : साखरेचे भाव निम्म्यावर आणून दारूचे भाव दहा पटीने वाढवा; माजी मंत्र्यांची मागणी, साखरेच्या दरवाढीवर मुख्यमंत्र्यांना पाठवलं पत्र
साखरेचे भाव निम्म्यावर आणून दारूचे भाव दहा पटीने वाढवा; माजी मंत्र्यांची मागणी, साखरेच्या दरवाढीवर मुख्यमंत्र्यांना पाठवलं पत्र
Embed widget