एक्स्प्लोर

Chandrakant Patil on Amit Shah : म्हणून अमित शाहांना आपण रोज नमस्कार केला पाहिजे; चंद्रकांत पाटलांनी सांगितलं कारण!

Chandrakant Patil on Amit Shah : परमेश्वरावर महापुरुषावर आणि महान नेत्यांवर बोलण्याचे धाडस आणि उपमर्द फक्त संजय राऊत करू शकतात, अशी टीका चंद्रकांत पाटील यांनी केली.

कोल्हापूर : परमेश्वरावर महापुरुषावर आणि महान नेत्यांवर बोलण्याचे धाडस आणि उपमर्द फक्त संजय राऊत करू शकतात. कलम 370 रद्द केलं म्हणून अमित शाह यांना आपण रोज नमस्कार केला पाहिजे. अस काम असणाऱ्यांना टोकणं हे संजय राऊतच करू शकतात, अशी खोचक टीका उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केली आहे.

तर 2019 लाच युतीचे सरकार आलं असतं

चंद्रकांत पाटील म्हणाले की, 2024 मध्ये तिन्ही पक्षांच्या मिळून 170 च्या पुढे जागा येतील. लाडकी बहीण योजना त्याचबरोबर अन्य चांगल्या योजना या सरकारने लोकांना दिल्या आहेत. या योजना देऊनही लोक उपकाराची भावना मनात न ठेवण्यासारखे महाराष्ट्र ची जनता नाही. उपकाराची भावना काहींनी ठेवली असती, तर 2019 मध्ये युतीचे सरकार आलं असतं. आता त्यांचं जे नुकसान झाले ते झालं नसतं, अशी टीका त्यांनी शिवसेनेवर नाव न घेता केली. पाटील यांनी सांगितले की, अमित शाह दूरदृष्टी असणारे नेते आहेत. त्यामुळेच ते 2029 बाबत बोलले असतील. राज्यामध्ये 2029 सालच्या निवडणुकीत एकट्या भाजपच्या जीवावर सत्ता आणायची, असं वक्तव्य केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी केलं आहे. या वक्तव्यावरून  संजय राऊत यांच्यासह विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनीही कडाडून टीका केली आहे.

राधानगरीची सीट अबिटकरांनाच मिळेल

दरम्यान, कोल्हापूरमधील जागावाटपावरून चंद्रकांत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले की, कितीही मारामाऱ्या झाल्या, तरी विद्यमान आमदाराची जागा ही त्याच पक्षाला मिळेल. त्यामुळे राधानगरीची जागा प्रकाश अबिटकरांनाच मिळेल. अडचणीच्या काळात जे सोबत आले त्यांना एकनाथ शिंदे कधीही अंतर देत नाहीत. त्यामुळे राधानगरीचे आमदार प्रकाश आबिटकरच असतील, असा दावा चंद्रकांत पाटील यांनी केला. 

तर मी त्यांना महाराष्ट्रातील महिलांची माफी मागायला सांगेन.

दरम्यान, आमदार देवेंद्र भुयार यांनी मुलीवरून केलेल्या वक्तव्यावरून प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले की, देवेंद्र भुयार हे माझे चांगले मित्र आहेत. ते काय बोलले आहेत माहित नाही. मात्र, त्यांच्या बोलण्याचा अर्थ महिलांचा अवमान करणारा असेल, तर मी त्यांना महाराष्ट्रातील महिलांची माफी मागायला सांगेन. 

इतर महत्वाच्या बातम्या 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Prakash Ambedkar : नथुराम गोडसेने महात्मा गांधींवर गोळ्या का झाडल्या? प्रकाश आंबेडकरांनी सांगितलं कारण
नथुराम गोडसेने महात्मा गांधींवर गोळ्या का झाडल्या? प्रकाश आंबेडकरांनी सांगितलं कारण
Chandrakant Patil on Prakash Abitkar : चंद्रकांतदादांकडून राधानगरीमधून प्रकाश आबिटकरांच्या उमेदवारीची घोषणा; मंत्रिपदावर काय म्हणाले?
चंद्रकांतदादांकडून राधानगरीमधून प्रकाश आबिटकरांच्या उमेदवारीची घोषणा; मंत्रिपदावर काय म्हणाले?
Gold Rate : जगात सर्वात स्वस्त सोनं कोणत्या देशात मिळतं?
जगात सर्वात स्वस्त सोनं कोणत्या देशात मिळतं?
अमावस्या जीवावर बेतली, तापी नदीपात्रात बुडून बहिण-भावांचा मृत्यू; गावावर शोककळा
अमावस्या जीवावर बेतली, तापी नदीपात्रात बुडून बहिण-भावांचा मृत्यू; गावावर शोककळा
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Special Report Mahatma Gandhi:महात्मा गांधींचं पुण्याशी काय आहे कनेक्शन?'एबीपी माझा'चा विशेष रिपोर्टABP Majha Headlines : 3 PM : 2 ऑक्टोबर 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सGovinda's Misfire Incident : रिव्हॉल्वरचा ट्रिगर गोविंदाने दाबल्याचा पोलिसांना संशय #abpमाझाAjit Pawar on Ladki Bahin : लाडक्या बहि‍णींना बोनस नोव्हेंबरचे पैसे ऑक्टोबरमध्येच!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Prakash Ambedkar : नथुराम गोडसेने महात्मा गांधींवर गोळ्या का झाडल्या? प्रकाश आंबेडकरांनी सांगितलं कारण
नथुराम गोडसेने महात्मा गांधींवर गोळ्या का झाडल्या? प्रकाश आंबेडकरांनी सांगितलं कारण
Chandrakant Patil on Prakash Abitkar : चंद्रकांतदादांकडून राधानगरीमधून प्रकाश आबिटकरांच्या उमेदवारीची घोषणा; मंत्रिपदावर काय म्हणाले?
चंद्रकांतदादांकडून राधानगरीमधून प्रकाश आबिटकरांच्या उमेदवारीची घोषणा; मंत्रिपदावर काय म्हणाले?
Gold Rate : जगात सर्वात स्वस्त सोनं कोणत्या देशात मिळतं?
जगात सर्वात स्वस्त सोनं कोणत्या देशात मिळतं?
अमावस्या जीवावर बेतली, तापी नदीपात्रात बुडून बहिण-भावांचा मृत्यू; गावावर शोककळा
अमावस्या जीवावर बेतली, तापी नदीपात्रात बुडून बहिण-भावांचा मृत्यू; गावावर शोककळा
राज्यसभा खासदार सुनेत्रा पवार अन् युवा नेते युगेंद्र पवार बारामतीत आले आमनेसामने अन्....
राज्यसभा खासदार सुनेत्रा पवार अन् युवा नेते युगेंद्र पवार बारामतीत आले आमनेसामने अन्....
महायुतीने 40 जागा द्याव्यात, अन्यथा 288 जागी उमेदवार उभे करणार; घटक पक्षाच्या मागणीमुळे महायुतीची अडचण वाढणार? 
महायुतीने 40 जागा द्याव्यात, अन्यथा 288 जागी उमेदवार उभे करणार; घटक पक्षाच्या मागणीमुळे महायुतीची अडचण वाढणार? 
छगन भुजबळांविरुद्ध शरद पवारांचा उमेदवार ठरला?, जयंत पाटलांसोबत कुणाल दराडेंची 20 मिनिटं चर्चा
छगन भुजबळांविरुद्ध शरद पवारांचा उमेदवार ठरला?, जयंत पाटलांसोबत कुणाल दराडेंची 20 मिनिटं चर्चा
Chandrakant Patil on Amit Shah : म्हणून अमित शाहांना आपण रोज नमस्कार केला पाहिजे; चंद्रकांत पाटलांनी सांगितलं कारण!
म्हणून अमित शाहांना आपण रोज नमस्कार केला पाहिजे; चंद्रकांत पाटलांनी सांगितलं कारण!
Embed widget