(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Kolhapur District Gram Panchayat Election : कोल्हापूर जिल्ह्यातील 475 ग्रामपंचायतींची निवडणूक भाजप, ताराराणी आघाडी, जनसुराज्य एकत्रित लढवणार
कोल्हापूर जिल्ह्यात 475 ग्रामपंचायतींची निवडणूक भाजप, ताराराणी आघाडी, ताराराणी पक्ष, जनसुराज्य पक्ष आणि प्रकाश आवाडे एकत्र लढवणार असल्याची घोषणा उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केली.
Kolhapur District Gram Panchayat Election : कोल्हापूर जिल्ह्यातील 475 ग्रामपंचायतींची निवडणूक भाजप, ताराराणी आघाडी, ताराराणी पक्ष, जनसुराज्य पक्ष आणि प्रकाश आवाडे एकत्रित लढवणार असल्याची घोषणा उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केली आहे. आज झालेल्या बैठकीत 300 पेक्षा जास्त गावांमध्ये थेट सरपंच व्हावा या दृष्टीने बैठक झाल्याचे पाटील यांनी पत्रकार परिषदेत बोलताना सांगितले. यावेळी खासदार धनंजय महाडिक, सुरेश हाळवणकर उपस्थित होते.
चंद्रकांत पाटील यांनी राज्यपालांच्या वक्तव्यांवरून सुरु असलेल्या वादावर सावध प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले की, राज्यपालांच्या मनात तशा भावना नसतील. म्हणून मी सकारात्मकपणे या विषयावर पडदा टाकण्याबाबत हात जोडून विनंती उदयनराजे भोसले यांना केली होती. उदयनराजे काही बोलले असतील, तर त्यावर मी बोलणार नाही. राज्यपालांच्या कारवाई संदर्भात केंद्राच्या निर्णयाबद्दल बोलण्याइतपतही मी मोठा नसल्याचे सांगत पाटील यांनी अधिक प्रतिक्रिया देणे टाळले.
सीमाप्रश्न समन्वयाने सोडवला पाहिजे
दरम्यान, सीमावादावर बोलताना ते म्हणाले की, मी आणि शंभूराजे यांनी काल तासभर दिल्लीतील वकिलांची व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे चर्चा केली. ही केस ताकतीने लढण्याचा निर्णय घेतला आहे. कोणत्याही स्तराला जाऊन, बोलून सीमावाद संपणार नाही. हा लढा न्यायालयातच लढावा लागेल. मराठी भाषिक महाराष्ट्रात आले तर त्यांना सुविधा देता येईल का?याबाबत कायदेशीर बाबीवर चर्चा सुरू आहे. 800 हून अधिक गावे न्यायालयाच्या निर्णयानंतर जे देणार ते आधीच देता येईल का? यावर विचार सुरू आहे.
हा दोन राष्ट्रांच्या संघर्षाचा विषय नसून कर्नाटक आणि महाराष्ट्र दोघांनी समन्वयांना हा प्रश्न सोडवला पाहिजे. या विषयात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री पंतप्रधान आणि अमित शहांशी बोलत असल्याचे ते म्हणाले. दुसरीकडे भाजपचे माजी आमदार विलासराव जगताप यांनी म्हैसाळ योजनेसंदर्भात मुख्यमंत्र्यांची घोषणा दिशाभूल करणारी असल्याची टीका केली आहे. याबाबत ते बोलताना म्हणाले, विलासराव जगताप ज्येष्ठ नेते असून त्यांच्याशी बोलणार आहे. तांत्रिक मंजुरी शिवाय दोन हजार कोटीचा निधी मंजूर होत नाही. म्हैसाळ योजनेच्या विस्तारीकरणाच्या मंजुरीची कागदपत्रे मी तुम्हाला देईन.
474 ग्रामपंचायतींमध्ये सरपंचपदांसाठी 2702 अर्ज दाखल
दरम्यान, कोल्हापूर जिल्ह्यातील 474 ग्रामपंचायतींसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी शुक्रवारी सर्वच तालुक्यातून मोठी गर्दी झाली. ऑनलाईन खोळंबा झाल्यानंतर ऑफलाईन परवानगी देण्यात आल्यानंतर शुक्रवारी अर्ज भरण्यासाठी तोबा गर्दी दिसून आली. सरपंच तसेच सदस्य पदासाठी कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले आणि करवीर तालुक्यात सर्वाधिक अर्ज भरण्यासाठी चुरस दिसून आली.
जिल्ह्यात 474 ग्रामपंचायतींमध्ये 2677 सरपंचपदासाठी, 16 हजार 691 अर्ज सदस्यपदासाठी दाखल झाले आहेत. दरम्यान, दाखल अर्जांची सोमवारी 5 तारखेला छाननी होणार आहे. बुधवारी अर्ज माघार घेण्याचा अखेरचा दिवस आहे. 7 डिसेंबर रोजी दुपारी तीननंतर चिन्हे वाटप केली जातील. मतदान 18 डिसेंबर, तर मतमोजणी 20 डिसेंबरला होईल. दरम्यान, ग्रामपंचायतींमध्ये 50 टक्के महिलाराज असल्याने अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी महिला वर्गही मोठ्या प्रमाणात दिसून आला.
जिल्ह्यात 474 ग्रामपंचायतींमध्ये 2677 सरपंचपदासाठी, 16 हजार 691 अर्ज सदस्यपदासाठी दाखल झाले आहेत. दरम्यान, दाखल अर्जांची सोमवारी 5 तारखेला छाननी होणार आहे. बुधवारी अर्ज माघार घेण्याचा अखेरचा दिवस आहे. 7 डिसेंबर रोजी दुपारी तीननंतर चिन्हे वाटप केली जातील. मतदान 18 डिसेंबर, तर मतमोजणी 20 डिसेंबरला होईल. दरम्यान, ग्रामपंचायतींमध्ये 50 टक्के महिलाराज असल्याने अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी महिला वर्गही मोठ्या प्रमाणात दिसून आला.
इतर महत्वाच्या बातम्या