Kolhapur Crime : कोल्हापुरात भरदिवसा शिक्षकावर कोयत्याने हल्ला; शाळेतून बाहेर बोलवून अज्ञातांचे कृत्य
Kolhapur Crime : कोल्हापूर शहरात भरदिवसा शिक्षकाला शाळेतून बोलवून कोयत्याने हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेनंतर शहरात खळबळ उडाली. शिक्षक संजय सुतार यांची प्रकृती गंभीर असल्याचे समजते.

Kolhapur Crime : कोल्हापूर शहरात भरदिवसा शिक्षकाला शाळेतून बोलवून कोयत्याने हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेनंतर शहरात खळबळ उडाली आहे. कदमवाडी परिसरातील संस्कार शिक्षण मंडळाच्या सुसंस्कार हायस्कूलमधील शिक्षक संजय सुतार यांच्यावर शाळेच्या आवारातच अज्ञातांनी हल्ला केला. ही घटना दुपारी एकच्या सुमारास घडली. दरम्यान, मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार कदमवाडी चौकात शाळेतून बोलावून शिक्षकावर कोयत्याने हल्ला करण्यात आला. शिक्षक संजय सुतार यांची प्रकृती गंभीर असल्याचे समजते. त्यांच्यावर कदमवाडीतील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. हल्ल्याचे वृत्त समजताच शाळेच्या परिसरात विद्यार्थी, पालक आणि नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. अधिक तपास शाहूपुरी पोलिस करत आहेत.
उसणवारीचे पैसे फेडण्यासाठी बाप लेकाकडून वृद्धेचा खून!
दरम्यान, डिसेंबरच्या सुरुवातीला करवीर तालुक्यातील म्हाळूंगेत उसणवारीने कर्जबाजारी झालेल्या बाप लेकाने वृद्धेचा खून केल्याची घटना घडली होती. लक्ष्मीबाई पाटील (वय 75) असे खून झालेल्या दुर्दैवी वृद्धेचे नाव आहे. लक्ष्मीबाई पाटील यांच्या अंगावरील दागिन्यांसाठी त्यांनी गळा दाबून खून केला होता. वृद्धेचा खून केल्यानंतर पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह पोत्यात घालून निगवे खालसा दरम्यानच्या ओढ्याखाली टाकल्याची कबुली आरोपींनी दिली होती. बचाराम शंकर पाटील (वय 45) आणि त्याचे वडील शंकर पाटील (वय 70) या दोघांनी वृद्धेचा खून केला. 23 नोव्हेंबरला मयत वृद्ध महिला बेपत्ता झाल्याची तक्रार पोलीस ठाण्यामध्ये नोंद केली होती.
इतर महत्वाच्या बातम्या
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
