Prithviraj Chavan : "घड्याळाचे काटे उलटे फिरवावे लागले, तर फिरवावे लागतील, पण राज्यासह देशातील लोकशाही वाचवावी लागेल"
घड्याळाचे काटे उलटे फिरवावे लागले त फिरवावे लागतील, पण राज्यासह देशातील लोकशाही वाचावीच लागेल, असे परखड मत काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी कोल्हापूरमध्ये बोलताना व्यक्त केले आहे.
Prithviraj Chavan : महाराष्ट्रात पोरखेळ सुरु झाला आहे, अतिशय नकारात्मकपणे बातम्या येत आहेत, त्यामुळे कितीही कटू असलं, तरी न्यायपालिकेला न्याय करून लोकशाही वाचवली पाहिजे, राज्यपालांच्या अधिकारांच्या गैरवापरावर स्पष्टपणे नमूद केले पाहिजे, घड्याळाचे काटे उलटे फिरवावे लागले त फिरवावे लागतील, पण राज्यातील लोकशाही वाचावीच लागेल, असे परखड मत काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी कोल्हापूरमध्ये बोलताना व्यक्त केले.
पृथ्वीराज चव्हाण पत्रकार परिषदेत बोलताना म्हणाले की, शिवसेनेतून दोन तृतियांश फुटून बाजूला गेले, पण विलीनीकरणाचा मुद्दा विसरून गेले. त्यामुळे गुवाहाटीतून राज्यात परतल्यानंतर वकीलांशी चर्चा केल्यानंतर हा मुद्दा फुटीर गटाच्या लक्षात आला असावा.
सर्वोच्च न्यायालयाच्या व्हेकेशन खंडपीठाने शपथविधीसाठी दिलेली परवानगी चुकीची होती असे पृथ्वीराज चव्हाण म्हणाले. राज्यपालांनी दोघांचा शपथविधी करून टाकला, त्यांना कशाचेच बंधन नाही. विधिमंडळाचे अधिवेशन फक्त मुख्यमंत्री बोलवू शकतात, त्यानंतर अध्यक्षांची निवड लावली, त्यापूर्वी दीड वर्ष अध्यक्षांची निवडणूक कायदेशीर बाब आहेय म्हणून लांबणीवर लावली, न्यायपालिकेने प्रामाणिक न्याय केला, तर सगळं बेकायदेशीर असल्याचा हल्लाबोल त्यांनी केला. घटनेनुसार किमान 12 मंत्री असावे लागतात, त्यामुळे घटनेचं उल्लंघन झाल्याचे ते म्हणाले.
मोदी सरकारवर हल्लाबोल
चव्हाण कोल्हापुरात बोलताना म्हणाले की, मोदी सरकारने आतापर्यंत भरमसाठ कर्ज काढलंय. आता नवीन कर्ज मिळेल असं वाटत नाही. देशात कर वाढवले आहेत. पंडित नेहरूंच्या दूरदृष्टीतून उभा राहिलेल्या संस्था विकल्या जात आहे. नोट बंदी सुद्धा फसली आहे. अनेक अविचारी निर्णय केंद्र सरकार कडून घेतले जातं आहेत. नड्डा यांनी संकेत दिले आहेत की, त्यांच्यासोबत गेलेल्या शिवसेनेला संपवून टाकायचं आहे. या आधी काँग्रेस मुक्त भारत घोषणा केली. चुकून दुसरं सरकार आलं तर ऑपरेशन लोटस वापरायचं अशी भाजपची खेळी आहे, असं देखील चव्हाण यावेळी म्हणाले.
देशाची लोकशाही धोक्यात आली आहे
अडाणींची संपत्ती किती वाढली हे जगातील आठवं आश्चर्य आहे. केंद्र सरकारने आतापर्यंत भरमसाठ कर्ज काढलं आहे. पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढवणं हा सोप्पा पर्याय असतो. नागरिक काही झालं तरी इंधन भरत असतात. देशात आर्थिक संकट आले आहे, देशाची लोकशाही धोक्यात आली आहे. अर्थव्यवस्थेबाबत कोरोनाचे कारण दिले जाते मात्र ते खरे नाही. कोरोनाच्या आधीपासून अर्थव्यवस्था धोक्यात आली आहे. मोदी सरकारकडून एकामागून एक चुका होत गेल्या त्याचा परिणाम झाला आहे. 4.9 हा सगळ्यात निच्चांकी विकास दर आहे, हा आकडा देखील खरा आहे की खोटा हा प्रश्न आहे, असंही ते म्हणाले.