Amol Mitkari on ED: औरंगजेब जरी मेला असला, तरी ईडीच्या रूपाने तो आजही जिवंत; राष्ट्रवादीच्या नेत्यांवरील कारवाईनंतर अमोल मिटकरींचा हल्लाबोल
Amol Mitkari on ED: ईडीची कितीही आक्रमण झाली, तरी त्याला किंचितही शरण न जाणारा योद्धा म्हणून शरद पवार आणि जयंत पाटील यांच्याकडे आम्ही पाहत असल्याचे आमदार अमोल मिटकरी म्हणाले.
Amol Mitkari on ED: राष्ट्रवादीचे आमदार आणि प्रवक्ते अमोल मिटकरी यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमधील एकामागून एक नेत्याला येत असलेल्या ईडी नोटिसांबद्दल आणि होत असलेल्या चौकशीबद्दल खदखद व्यक्त करत ईडीवर हल्लाबोल केला आहे. ईडीची कितीही आक्रमणं झाली तरी त्याला किंचितही शरण न जाणारा योद्धा म्हणून शरद पवार आणि जयंत पाटील यांच्याकडे आम्ही पाहत असल्याचे अमोल मिटकरी म्हणाले.
ते काही दिवसांनी शपथ घेतील
जे शरण गेले ते आता काही दिवसांनी शपथ घेतील, पण जे शरण गेले नाहीत त्यांना काही दिवस त्रास होत राहतो, असेही मिटकरी म्हणाले. वाळवा तालुक्यातील बागणीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि आमदार जयंत पाटील यांच्या माध्यमातून ग्रामपंचायत इमारतीवर उभारलेल्या छत्रपती संभाजी महाराज यांच्या तैलचित्राच्या अनावरण सोहळ्यात अमोल मिटकरी बोलत होते. यावेळी जयंत पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.
शरण न जाणारा योद्धा म्हणून शरद पवार आणि जयंत पाटील यांच्याकडे आम्ही पाहतो
औरंगजेबाची कितीही आक्रमणं झाली तरी कधीही संभाजी महाराज डगमगले नाहीत. पोर्तुगीज, डच, इंग्रज, मोघलांची आक्रमण झाली, पण संभाजी महाराज कधीच डगमगले नाहीत. हेच रक्त आज तुमच्या-आमच्यामध्ये आहे. औरंगजेब जरी मेला असला, तरी ईडीच्या रूपाने तो आजही जिवंत आहे. त्यामुळे ईडीची कितीही आक्रमणं झाली तरी त्याला किंचितही शरण न जाणारा योद्धा म्हणून शरद पवार आणि जयंत पाटील यांच्याकडे आम्ही पाहतो. जे शरण गेलेत ते आता काही दिवसांनी शपथ घेतील पण जे शरण गेले नाहीत त्यांना काही दिवस त्रास होत राहतो असेही ते म्हणाले.
जयंत पाटील ईडीच्या रडारवर
दरम्यान, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची ईडीनं चौकशी केली आहे. IL&FS घोटाळ्याप्रकरणी ईडीनं जयंत पाटील यांचा जबाब नोंदवला आहे. महत्त्वाचं म्हणजे, ईडीनं काही कागदपत्रं देखील मागवली होती, मात्र जयंत पाटलांनी ती सोबत नेली नव्हती. त्यामुळे त्यांना चौकशीसाठी पुन्हा बोलावलं जाण्याची शक्यता आहे. दुसरीकडे, ईडीकडून चौकशी झाली. त्यांनी जे प्रश्न विचारले त्याला उत्तर दिली आहे. त्यांचं समाधान होईल अशी उत्तर दिली आहेत. माझा संबधित कंपनीशी काहीही संबंध नाही, माझा आयएलएफ कंपनीशी कोणताही संबधः नसल्याचे जयंत पाटील यांनी म्हटले आहे.
इतर महत्वाच्या बातम्या