एक्स्प्लोर

Ambabai : पुरातत्त्व विभागाकडूनच करवीर निवासिनी अंबाबाईच्या मूर्तीचे पुन्हा संवर्धन होणार; 'राज्य पुरातत्त्व'कडून पाहणी

Kolhapur News : करवीर निवासिनी श्री अंबाबाईच्या (Ambabai Mandir) मूर्तीची पुन्हा काही प्रमाणात झीज झाली आहे. राज्य पुरातत्व विभागाकडून त्याबाबत मंगळवारी (28 फेब्रवारी) पाहणी करण्यात आली.

Kolhapur News : करवीर निवासिनी श्री अंबाबाईच्या (Ambabai Mandir) मूर्तीची पुन्हा काही प्रमाणात झीज झाली आहे. राज्य पुरातत्व विभागाकडून त्याबाबत मंगळवारी (28 फेब्रवारी) पाहणी करण्यात आली. याबाबतची माहिती घेऊन केंद्रीय पुरातत्त्व विभागाला पत्र पाठवण्यात आलं आहे. केंद्रीय पुरातत्व विभागातील रासायनिक संवर्धन प्रक्रिया विभागातील अधिकारी लवकरच पाहणी करुन संवर्धनाची प्रक्रिया राबवली जाणार असल्याची माहिती आज देवस्थान समितीचे प्रशासक तथा जिल्हाधिकारी राहुल रेखावर यांनी दिली आहे. राहुल रेखावार यांनी सांगितले की, "मूर्तीच्या (Ambabai) संवर्धनासाठी पुन्हा मागणी होऊ लागल्यानंतर राज्य पुरातत्व विभागाचे सहसंचालक विलास वहाणे यांनी पाहणी केली. त्यानंतर त्यांनी सद्यस्थितीबाबत माहिती दिली. त्यानुसार आता पुढील कार्यवाहीला प्रारंभ झाला आहे. पुन्हा संवर्धनाची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर दर सहा महिन्याला मूर्तीची पाहणी करुन उपाययोजना राबवल्या जाणार आहेत. 

संवर्धनाची प्रक्रिया पारदर्शकपणे करावी

दरम्यान, मूर्तीच्या संवर्धनाबाबत अजिबात चालढलक नको. मूर्तीची झीज तात्काळ थांबवण्यासाठी संवर्धनाची प्रक्रिया पारदर्शकपणे करावी, अशा मागणीचे निवेदन शिवसेना ठाकरे गटाकडून जिल्हाधिकारी रेखावार यांना देण्यात आले. संवर्धनाबाबत तात्काळ कार्यवाही झाली नाही तर आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे. 

शासनाने अंबाबाई विकास आराखड्यासाठी ऐंशी कोटींच्या निधीची घोषणा केली; प्रत्यक्षात आठ कोटींचाच निधी आला. मंदिर परिसरातील विकासकामे आणि रासायनिक संवर्धन प्रक्रिया राबवताना या क्षेत्रातील जाणकारांना विश्वासात घेतले जावे, असेही जिल्हाप्रमुख विजय देवणे यांनी सांगितले. शहरप्रमुख रविकिरण इंगवले, सुनील मोदी, शशिकांत बिडकर, दत्ताजी टिपुगडे, गोविंद वाघमारे, कमलाकर जगदाळे, रुपेश रोडे, विनायक केसरकर, राजू जाधव, अभिजित बुकशेठ, प्रवीण पालव यांचा शिष्टमंडळात समावेश होता.

अंबाबाईच्या मूर्तीची नवरात्रोत्सवापूर्वी रासायनिक संवर्धन प्रक्रिया

नवरात्रोत्सवापूर्वी मूर्तीची रासायनिक संवर्धन प्रक्रिया झाली, त्यावेळी ती घाईगडबडीने केली गेली. याबाबत देवस्थान समितीचे सचिव शिवराज नाईकवाडे यांना भेटल्यानंतर त्यांनी समर्पक उत्तरे दिली नाहीत. प्रक्रियेबाबतची माहिती अगोदर भाविकांना दिली गेली नाही, असा आक्षेपही यावेळी व्यक्त झाला. त्यानंतर संबंधित कामावेळी तात्काळ संवर्धन करणे आवश्यक होते; मात्र ती नियमानुसारच पार पडल्याचे रेखावार यांनी स्पष्ट केले.

इतर महत्वाच्या बातम्या 

महत्त्वाच्या बातम्या

Success Story: प्रेरणादायी! नशिबानं हिरावलं, पण कष्टनं मिळावलं; वॉटर प्युरिफायरचा व्यवसाय ते लक्झरी हॉटेलचा मास्टरशेफ, कोल्हापूरच्या आकाशचा थक्क करणारा प्रवास
प्रेरणादायी! नशिबानं हिरावलं, पण कष्टनं मिळावलं; वॉटर प्युरिफायरचा व्यवसाय ते लक्झरी हॉटेलचा मास्टरशेफ, कोल्हापूरच्या आकाशचा थक्क करणारा प्रवास
Kolhapur City Boundary Expansion: कोल्हापूर शहराची हद्दवाढ होणार? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे मोठे संकेत; 'या' 18 गावांचा समावेश, वाचा A टू Z माहिती
कोल्हापूर शहराची हद्दवाढ होणार? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे मोठे संकेत; 'या' 18 गावांचा समावेश, वाचा A टू Z माहिती
Devendra Fadnavis: 'मी 100 टक्के ज्या अडचणी असतील त्या सोडवतो, पण कोल्हापूरची हद्दवाढ झालीच पाहिजे..' सीएम फडणवीसांनी व्यासपीठावरून ठणकावलं, बाॅल थेट लोकप्रतिनिधींच्या कोर्टात टाकला
'मी 100 टक्के ज्या अडचणी असतील त्या सोडवतो, पण कोल्हापूरची हद्दवाढ झालीच पाहिजे..' सीएम फडणवीसांनी व्यासपीठावरून ठणकावलं, बाॅल थेट लोकप्रतिनिधींच्या कोर्टात टाकला
'कोल्हापूरच्या हद्दवाढीसाठी चंद्रदीप नरके साहेब, अमल महाडिक सहकार्य करा..' हसन मुश्रीफांनी थेट मुख्यमंत्र्यांसमोर कान टोचले, महापौर रुपाराणी निकम अन् राजेश क्षीरसागरही बोलले
'कोल्हापूरच्या हद्दवाढीसाठी चंद्रदीप नरके साहेब, अमल महाडिक सहकार्य करा..' हसन मुश्रीफांनी थेट मुख्यमंत्र्यांसमोर कान टोचले, महापौर रुपाराणी निकम अन् राजेश क्षीरसागरही बोलले

व्हिडीओ

Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?
Buldhana Khamgaon Ajji on FDA : तुकाराम मुंढेंना विनंती करणाऱ्या खामगावातील व्हायरल आजी 'माझा'वर
Sanjay Raut on Amit Shah: अमित शाहांना तातडीने उपपंतप्रधान व्हायचंय, पण मोदींनी नकार दिलाय
Manoj Jarange Patil: आआथातू अरअरअर...अ‍ॅक्शन केली, डायलॉग बोलले; जरांगेंनी बावनकुळेंची बाहुबलीमधील कालकेयशी केली तुलना

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Share Market: निफ्टी 50 सलग तिसऱ्या सत्रात घसरला; सेन्सेक्स 0.15 टक्के वाढीसह बंद
Share Market: निफ्टी 50 सलग तिसऱ्या सत्रात घसरला; सेन्सेक्स 0.15 टक्के वाढीसह बंद
Solapur Crime News : झोपेतून उठवल्याचा राग, बिहारी साथिदाराला हातोड्याने वार करुन संपवलं, करमाळ्यातील धक्कादायक घटना
झोपेतून उठवल्याचा राग, बिहारी साथिदाराला हातोड्याने वार करुन संपवलं, करमाळ्यातील धक्कादायक घटना
BAN vs AUS : बांगलादेशचा बलाढ्य ऑस्ट्रेलियाला दणका,  पहिल्या डावात 200 धावांच्या आत गुंडाळलं, कसोटीचा पहिला दिवस गाजवला 
बांगलादेशचा बलाढ्य ऑस्ट्रेलियाला दणका, पहिल्या डावात 200 धावांच्या आत गुंडाळलं, कसोटीचा पहिला दिवस गाजवला
Bar Council : बार काऊन्सिलनं निर्णय फिरवला, सरन्यायाधीशांना विरोध करणाऱ्या हैदराबाद येथील कायदा पदवीधर विद्यार्थ्यांच्या नोंदणीवरील स्थगिती मागे
बार काऊन्सिलनं निर्णय बदलला, सरन्यायाधीशांना विरोध विद्यार्थ्यांना दिलासा, कायदा पदवीधरांच्या वकील म्हणून नोंदणीचा मार्ग मोकळा 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 ऑगस्ट 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 ऑगस्ट 2026 | गुरुवार
Shiv Sena Symbol Case : चंद्रचूड यांच्या घटनापीठाने दिलेल्या शिवसेनेच्या निकालाचा फेरविचार व्हावा, ठाकरेंच्या वकिलांची मोठी मागणी
चंद्रचूड यांच्या घटनापीठाने दिलेल्या शिवसेनेच्या निकालाचा फेरविचार व्हावा, ठाकरेंच्या वकिलांची मोठी मागणी
Sukhbir Badal News:मोठी बातमी, पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री सुखबीर सिंह बादल यांच्यावर नांदेडमध्ये हल्ला, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे चौकशीचे आदेश 
सुखबीर सिंह बादल यांच्यावर नांदेडमध्ये हल्ला, आरोपीला अटक; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे चौकशीचे आदेश 
IND Vs SL Galle Test: त्रिमूर्ती रिंगणात उतरवत श्रीलंकेला फिरकीच्या जाळ्यात अडकवण्याची तयारी; गोलंदाज प्रशिक्षकांकडून स्पष्ट संकेत
त्रिमूर्ती रिंगणात उतरवत श्रीलंकेला फिरकीच्या जाळ्यात अडकवण्याची तयारी; गोलंदाज प्रशिक्षकांकडून स्पष्ट संकेत
Embed widget