एक्स्प्लोर

Hasan Mushrif : महायुतीचा पहिला उमेदवार जाहीर, कागलमधून हसन मुश्रीफांच्या नावाची घोषणा

Hasan Mushrif Candidate From Kagal : हसन मुश्रीफ हे अजित पवार गटाचे मंत्री असून राष्ट्रवादीच्या फुटीनंतर दादांसोबत जाणाऱ्या पहिल्या फळीतील नेत्यांमध्ये ते होते. 

कोल्हापूर : राज्यातील महायुतीकडून पहिला उमेदवार जाहीर करण्यात आला असून कागलमधून राष्ट्रवादीचे हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) हे विधानसभेच्या रिंगणात उतरणार आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी हसन मुश्रीफांच्या नावाची घोषणा केली. मुश्रीफ यांना इतक्या उचांकी मतांनी निवडून द्या की समोरच्या उमेदवाराला धडकी भरली पाहिजे असं आवाहन त्यांनी कागलच्या जनतेला केलं आहे. 

अजित पवार हे रविवारी कोल्हापूर दौऱ्यावर होते. त्यावेळी त्यांनी हसन मुश्रीफांच्या नावाची घोषणा केली. महायुतीच्या कोणत्याही घटक पक्षाने जाहीर केलेली ही पहिलीच उमेदवारी आहे. राष्ट्रवादीमध्ये फूट पडल्यानंतर हसन मुश्रीफांनी अजित पवारांची साथ दिली. 

यंदाही सिक्स मारणार फिक्स

महायुतीत आल्यापासूनच आपल्यालाच उमेदवारी मिळणार अशा विश्वास हसन मुश्रीफांना होता. त्यामुळे 'यंदाही सिक्स मारणार फिक्स' असं म्हणत त्यांच्या कार्यकर्त्यांनी मुश्रीफांना सहाव्यांदा आमदार करण्याचा निश्चय केला आहे. 

हसन मुश्रीफांची ही सातवी विधानसभा निवडणूक असणार आहे. या आधीच्या सहापैकी पाच वेळा ते विजयी झाले आहेत. युती सरकारच्या वेळी पोटनिवडणुकीत त्यांचा पराभव झाला होता. त्या पोटनिवडणुकीत शिवसेनेच्या तिकिटावर लढणाऱ्या संजयबाबा घाटगे यांनी त्यांचा पराभव केला होता. 

हसन मुश्रीफ हे पवार कुटुंबीयांच्या अत्यंत निकटवर्तीय नेते मानले जायचे. शरद पवारांचीही त्यांच्यावर विशेष मर्जी होती. पण राष्ट्रवादीच्या फुटीनंतर मुश्रीफांनी अजितदादांची साथ दिली. मुश्रीफ आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या मागे असलेला ईडीचा ससेमिरा चुकवण्यासाठी त्यांनी महायुतीत जाण्याचा निर्णय घेतल्याची चर्चा होती. 

भाजपचे समरजीत घाटगे काय करणार?

अजित पवार गट महायुतीत सामील झाल्यापासून कागलमधील भाजपचे नेते समरजीत घाटगे अस्वस्थ होते. गेल्या निवडणुकीत अपक्ष लढूनही समरजीत घाटगेंनी जवळपास 90 हजार मतदान घेतलं होतं. त्यानंतर त्यांनी भाजपमध्ये प्रवेश करून कागलमधून निवडणुकीची तयारी सुरू केली. 

कागलची जागा राष्ट्रवादीला जाणार की भाजपला यावरून सातत्याने चर्चा सुरू होत्या. विद्यमान आमदार असल्याने हसन मुश्रीफ यांनाच संधी मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत असतानाही समरजीत घाटगेंनी आपली तयारी कायम ठेवली. त्यांच्यामागे देवेंद्र फडणवीसांची ताकद आहे.

पण आता अजित पवारांनी हसन मुश्रीफांची उमेदवारी जाहीर केल्यानंतर समरजीत घाटगे काय करणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. 

ही बातमी वाचा: 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

लोकसभेत हातावर लिहिले 3 'वाजे'ला मतदान करा, माझ्या पाठीत खंजीर खुपसला, हेमंत गोडसेंचा भुजबळांवर गंभीर आरोप
लोकसभेत हातावर लिहिले 3 'वाजे'ला मतदान करा, माझ्या पाठीत खंजीर खुपसला, हेमंत गोडसेंचा भुजबळांवर गंभीर आरोप
नालासोपाऱ्यात हिंदी भाषिक टीसीची दादागिरी, दाम्पत्याकडून लिहून घेतलं
नालासोपाऱ्यात हिंदी भाषिक टीसीची दादागिरी, दाम्पत्याकडून लिहून घेतलं "मराठी बोलणार नाही"
मोठी बातमी! उत्तर प्रदेशच्या मदरसा कायद्याला सर्वोच्च न्यालयाची मान्यता, मदरशांना मोठा दिलासा 
मोठी बातमी! उत्तर प्रदेशच्या मदरसा कायद्याला सर्वोच्च न्यालयाची मान्यता, मदरशांना मोठा दिलासा 
Uddhav Thackeray Kolhapur : उद्धव ठाकरे कोल्हापुरात अंबाबाईच्या दर्शनाला
Uddhav Thackeray Kolhapur : उद्धव ठाकरे कोल्हापुरात अंबाबाईच्या दर्शनाला
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

नालासोपाऱ्यात दादागिरी करणाऱ्या टीसीचं निलंबन, 'माझा'च्या बातमीचा इम्पॅक्टABP Majha Marathi News Headlines 1PM TOP Headlines 1 PM 05 November 2024Uddhav Thackeray Kolhapur : उद्धव ठाकरे कोल्हापुरात अंबाबाईच्या दर्शनालाSharad pawar On Yugendra Pawar : ..म्हणून मी युगेंद्र पवारांची निवड केली, शरद पवारांनी कारण सांगितलं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
लोकसभेत हातावर लिहिले 3 'वाजे'ला मतदान करा, माझ्या पाठीत खंजीर खुपसला, हेमंत गोडसेंचा भुजबळांवर गंभीर आरोप
लोकसभेत हातावर लिहिले 3 'वाजे'ला मतदान करा, माझ्या पाठीत खंजीर खुपसला, हेमंत गोडसेंचा भुजबळांवर गंभीर आरोप
नालासोपाऱ्यात हिंदी भाषिक टीसीची दादागिरी, दाम्पत्याकडून लिहून घेतलं
नालासोपाऱ्यात हिंदी भाषिक टीसीची दादागिरी, दाम्पत्याकडून लिहून घेतलं "मराठी बोलणार नाही"
मोठी बातमी! उत्तर प्रदेशच्या मदरसा कायद्याला सर्वोच्च न्यालयाची मान्यता, मदरशांना मोठा दिलासा 
मोठी बातमी! उत्तर प्रदेशच्या मदरसा कायद्याला सर्वोच्च न्यालयाची मान्यता, मदरशांना मोठा दिलासा 
Uddhav Thackeray Kolhapur : उद्धव ठाकरे कोल्हापुरात अंबाबाईच्या दर्शनाला
Uddhav Thackeray Kolhapur : उद्धव ठाकरे कोल्हापुरात अंबाबाईच्या दर्शनाला
कॉमेडी किंग अजितदादांचा प्रचार करणार, सयाजी शिंदेंनंतर भाऊ कदमांची राष्ट्रवादीच्या घड्याळाला साथ
कॉमेडी किंग अजितदादांचा प्रचार करणार, सयाजी शिंदेंनंतर भाऊ कदमांची राष्ट्रवादीच्या घड्याळाला साथ
Sharad Pawar: संसदीय राजकारणातून निवृत्ती घेण्याचे शरद पवारांचे संकेत; बारामतीत बोलताना केलं मोठं वक्तव्य, नेमकं काय म्हणालेत?
संसदीय राजकारणातून निवृत्ती घेण्याचे शरद पवारांचे संकेत; बारामतीत बोलताना केलं मोठं वक्तव्य, नेमकं काय म्हणालेत?
Balasaheb Thorat : 'आम्ही इकडे आलो म्हणून चांगले वागतात, नाहीतर तुमचा कार्यक्रमच होता'; बाळासाहेब थोरातांचा विखे पिता-पुत्रांवर जोरदार हल्लाबोल
'आम्ही इकडे आलो म्हणून चांगले वागतात, नाहीतर तुमचा कार्यक्रमच होता'; बाळासाहेब थोरातांचा विखे पिता-पुत्रांवर जोरदार हल्लाबोल
Rajshree Ahirrao : दोन दिवसांपासून नॉट रीचेबल असणाऱ्या राजश्री अहिररावांचा 'एबीपी माझा'वर अजब दावा, म्हणाल्या...
दोन दिवसांपासून नॉट रीचेबल असणाऱ्या राजश्री अहिररावांचा 'एबीपी माझा'वर अजब दावा, म्हणाल्या...
Embed widget