एक्स्प्लोर

Kolhapur Municipal Corporation : 'माझा'ची बातमी, इम्पॅक्टची हमी! सातारवरून मशीन आणून अवघ्या 12 तासांत कोल्हापुरातील 'त्या' स्पीड ब्रेकरवर मारले पांढरे पट्टे

स्पीड ब्रेकरवर वर्षभर सांगून झाल्यानंतर पांढरे पट्टे मारण्यात आल्यानंतर अवघ्या 12 तासांत गायब झाले होते. यानंतर एबीपी माझाने दणका दिल्यानंतर 12 तासांत सातारहून मशिन आणून स्पीड ब्रेकरवर पट्टे मारले.

Kolhapur Municipal Corporation : कोल्हापूर (Kolhapur News) शहरातील दसरा चौकातून खानविलकर पेट्रोल पंपाकडे जाणाऱ्या मार्गावर असणाऱ्या तीन जीवघेण्या स्पीड ब्रेकरवर तब्बल वर्षभर सांगून झाल्यानंतर कोल्हापूर महानगरपालिकेकडून पांढरे पट्टे मारण्यात आल्यानंतर अवघ्या 12 तासांत गायब झाले होते. यानंतर एबीपी माझाने महापालिकेच्या कारभारावरून दणका दिल्यानंतर अवघ्या 12 तासांमध्ये सातारहून मशिन आणून त्या स्पीड ब्रेकरवर पांढरे पट्टे मारण्यात आले. त्यामुळे पुन्हा एकदा 'माझा'ची बातमी, इम्पॅक्टची हमी! याची प्रचिती समस्त कोल्हापूरकरांना आली आहे. एबीपी माझाने यापूर्वी कोल्हापुरातील नागरी समस्या, तसेच रस्त्यांच्या दुर्दशेवरून सातत्याने आवाज उठवत झोपी गेलेल्या महापालिकेला जागं करण्याचं काम केलं आहे. कोल्हापुरातील रस्ते खड्ड्यात गेल्यानंतर माझाने सातत्याने यासंदर्भात आवाज उठवला आहे.  

अनेकाचे गुडघे फुटल्यानंतर मनपा शहर अभियंत्यांना जाग आली 

कोल्हापूर शहरातील दसरा चौकातून खानविलकर पंपाकडे जाणाऱ्या मार्गावर तीन स्पीडब्रेकर आहेत. मात्र, एकाही स्पीडब्रेकरवर ओळखून येण्यासाठी पांढरे पट्टे मारलेले नाहीत. त्यामुळे याठिकाणी दररोज एक, तरी अपघात ठरलेला होता. शुक्रवारी पुन्हा एक अपघात झाला. यानंतर रात्री कोल्हापूर महापालिकेचे कर्मचारी धावत पांढरे पट्टे मारायला आले, पण रात्री मारलेले पट्टे शनिवारी सकाळी गायब झाले होते. त्यामुळे एबीपी माझाने वृत्त प्रकाशित केले होते. 

या स्पीड ब्रेकरवर पट्टे मारण्यासाठी कोल्हापूर महापालिकेचे मुख्य शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत यांना अनेकवेळा विनंती करण्यात आली होती. दरम्यान, गेल्या वर्षभरापासून विनंती केल्यानंतर शुक्रवारी रात्री कामाला मुहूर्त मिळाला. मात्र, केलेलं काम दिवस सोडा, अवघे 12 तासही राहिलं नव्हते. नेत्रदीप सरनोबत यांना अनेकवेळा माध्यमातील प्रतिनिधींनी अपघातास कारणीभूत ठरत असलेल्या स्पीड ब्रेकरवर पट्टे मारण्यासाठी सातत्याने विनंती केली होती. मात्र, त्यांनी वेळोवेळी उडवा उडवीची उत्तरे दिली होती. 

कोल्हापूर शहरातील शासकीय कार्यालयात जात असताना याच मार्गावरून अनेकांना जावं लागतं. त्यामुळे हा मार्गखूप रहदारीचा आहे. ज्येष्ठ नागरिक आणि महिला देखील या मार्गावरून वाहन चालवत असतात. मात्र, स्पीड ब्रेकर दिसून येत नसल्याने त्यांना गाडीवर ताबा मिळवणे अवघड होऊन सातत्याने अपघात घडत होते. 

महत्वाच्या इतर बातम्या : 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Pankaja Munde : पालकमंत्री झाल्यानंतर पंकजा मुंडे पहिल्यांदाच पोहोचल्या जालन्यात; प्रजासत्ताक दिनाचा मुहूर्त साधत जिल्हावासियांना मोठा शब्द; म्हणाल्या...
पालकमंत्री झाल्यानंतर पंकजा मुंडे पहिल्यांदाच पोहोचल्या जालन्यात; प्रजासत्ताक दिनाचा मुहूर्त साधत जिल्हावासियांना मोठा शब्द; म्हणाल्या...
Aditi Tatkare: रायगडमध्ये झेंडा फडकवताच आदिती तटकरेंकडून लाडकी बहीण योजनेतील निकषांबाबत स्पष्ट भूमिका
रायगडमध्ये झेंडा फडकवताच आदिती तटकरेंकडून लाडकी बहीण योजनेतील निकषांबाबत स्पष्ट भूमिका
Dhananjay Munde Resignation: ...तर देवेंद्र फडणवीस धनंजय मुंडेंना राजीनामा द्यायला लावतील; चंद्रकांत पाटलांचं सूचक वक्तव्य
...तर देवेंद्र फडणवीस धनंजय मुंडेंना राजीनामा द्यायला लावतील; चंद्रकांत पाटलांचं सूचक वक्तव्य
Tilak Varma : 'मेरा टाइम आएगा ते टाइम आ गया' सूर्यकुमार यादवच्या 'या' निर्णयाने 22 वर्षीय तिलक वर्माचं नशीब बदललं!
'मेरा टाइम आएगा ते टाइम आ गया' सूर्यकुमार यादवच्या 'या' निर्णयाने 22 वर्षीय तिलक वर्माचं नशीब बदललं!
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Republic Day 2025 Special Superfast News | Jay Ho| 25 January 2025ABP Majha Marathi News Headlines 01 PM TOP Headlines 01 PM 26 January 2024Mumbai Central Line Mega Block Over : मध्य रेल्वेवरील ब्लॉक उशिराने संपल्यानं प्रवाशांना फटका, कर्नाक ब्रिजचं काम 5 तास उशिरानं संपलंABP Majha Marathi News Headlines 12 PM TOP Headlines 12 PM 26 January 2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pankaja Munde : पालकमंत्री झाल्यानंतर पंकजा मुंडे पहिल्यांदाच पोहोचल्या जालन्यात; प्रजासत्ताक दिनाचा मुहूर्त साधत जिल्हावासियांना मोठा शब्द; म्हणाल्या...
पालकमंत्री झाल्यानंतर पंकजा मुंडे पहिल्यांदाच पोहोचल्या जालन्यात; प्रजासत्ताक दिनाचा मुहूर्त साधत जिल्हावासियांना मोठा शब्द; म्हणाल्या...
Aditi Tatkare: रायगडमध्ये झेंडा फडकवताच आदिती तटकरेंकडून लाडकी बहीण योजनेतील निकषांबाबत स्पष्ट भूमिका
रायगडमध्ये झेंडा फडकवताच आदिती तटकरेंकडून लाडकी बहीण योजनेतील निकषांबाबत स्पष्ट भूमिका
Dhananjay Munde Resignation: ...तर देवेंद्र फडणवीस धनंजय मुंडेंना राजीनामा द्यायला लावतील; चंद्रकांत पाटलांचं सूचक वक्तव्य
...तर देवेंद्र फडणवीस धनंजय मुंडेंना राजीनामा द्यायला लावतील; चंद्रकांत पाटलांचं सूचक वक्तव्य
Tilak Varma : 'मेरा टाइम आएगा ते टाइम आ गया' सूर्यकुमार यादवच्या 'या' निर्णयाने 22 वर्षीय तिलक वर्माचं नशीब बदललं!
'मेरा टाइम आएगा ते टाइम आ गया' सूर्यकुमार यादवच्या 'या' निर्णयाने 22 वर्षीय तिलक वर्माचं नशीब बदललं!
Manikrao Kokate : राज्यात पिक विमा योजना बंद होणार नाही, शेतकऱ्यांच्या भल्यासाठी...; कृषिमंत्री माणिकराव कोकाटेंचं मोठं वक्तव्य
राज्यात पिक विमा योजना बंद होणार नाही, शेतकऱ्यांच्या भल्यासाठी...; कृषिमंत्री माणिकराव कोकाटेंचं मोठं वक्तव्य
Prakash Abitkar : पालकमंत्री प्रकाश आबिटकरांकडून कोल्हापुरात ध्वजारोहण; म्हणाले, बहुमान मिळाल्याचा सार्थ अभिमान
पालकमंत्री प्रकाश आबिटकरांकडून कोल्हापुरात ध्वजारोहण; म्हणाले, बहुमान मिळाल्याचा सार्थ अभिमान
हिंगोलीतून माहूरला दिंडीत आले, भगर शेंगदाण्याची आमटी खाल्ल्याने 50 हून अधिक भाविकांना विषबाधा, 4 गंभीर
हिंगोलीतून माहूरला दिंडीत आले, भगर शेंगदाण्याची आमटी खाल्ल्याने 50 हून अधिक भाविकांना विषबाधा, 4 गंभीर
Hasan Mushrif : कोल्हापूरपासून 623 किमी अंतरावर हसन मुश्रीफांचा वाशिमला जीव काही केल्या रमेना! बैठका नाहीच, ध्वजारोहण करताच तत्काळ कोल्हापूरला रवाना!
कोल्हापूरपासून 623 किमी अंतरावर हसन मुश्रीफांचा वाशिमला जीव काही केल्या रमेना! बैठका नाहीच, ध्वजारोहण करताच तत्काळ कोल्हापूरला रवाना!
Embed widget