एक्स्प्लोर

Kolhapur Municipal Corporation: वर्षभर गुडघे फुटल्यानंतर स्पीड ब्रेकरवर पट्टे मारले अन् 12 तासांत गायब; कोल्हापूर मनपाच्या गेंड्याच्या कातडीच्या कारभाराने लाज काढली

Kolhapur Municipal Corporation : गुडघाभर खड्ड्यांनी आणि भररस्त्यात दोन-दोन फुटांवर आलेल्या चॅनेलच्या झाकणांनी कोल्हापुरातील रस्त्यांची ख्याती महापालिकेनं सर्वदूर पोहोचवली आहे.

Kolhapur Municipal Corporation : गुडघाभर खड्ड्यांनी आणि भररस्त्यात दोन-दोन फुटांवर आलेल्या चॅनेलच्या झाकणांनी कोल्हापुरातील रस्त्यांची ख्याती महापालिकेनं सर्वदूर पोहोचवली आहे. हा दगडी कारभार सुरू असतानाच आता आणखी एका महापालिकेच्या कारभाराची लक्तरं वेशीवर टांगली गेली आहेत.

कोल्हापूर शहरातील दसरा चौकातून खानविलकर पंपाकडे जाणाऱ्या मार्गावर तीन स्पीडब्रेकर आहेत. मात्र, एकाही स्पीडब्रेकरवर ओळखून येण्यासाठी पांढरे पट्टे मारलेले नाहीत. त्यामुळे याठिकाणी दररोज एक, तरी अपघात ठरलेला असतो. शुक्रवारी नेहमीप्रमाणे पुन्हा एक अपघात झाला. यानंतर रात्री कोल्हापूर महापालिकेचे कर्मचारी धावत पांढरे पट्टे मारायला आले, पण रात्री मारलेले पट्टे आज सकाळी उठून बघतात तर गायब झाले आहेत.

शहर अभियंत्याना वर्षभरांनी जाग आली, पण 12 तासांत कारभार उघड्यावर 

कोल्हापूर महापालिकेचे शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत यांना अनेकवेळा याबाबत विनंती करण्यात आली होती. गेल्या वर्षभरापासून विनंती केल्यानंतर शुक्रवारी रात्री कामाला मुहूर्त मिळाला. मुहूर्त देखील असा मिळाला की, सकाळी पांढरे पट्टेच गायब झाले आहेत. त्यामुळे पालिकेच्या या कामाचं तोंड भरून कौतूक कोल्हापूरकर करत आहेत.

कोल्हापूरचे शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत यांना अनेकवेळा माध्यमातील प्रतिनिधींनी अपघातास कारणीभूत ठरत असलेल्या स्पीड ब्रेकर पट्टे मारण्यासाठी विनंती केली होती. मात्र, त्यांनी वेळोवेळी उडवा उडवीची उत्तरे दिली. पुढील दहा मिनिटांत कर्मचारी पाठवून देतो, असे म्हणणाऱ्या नेत्रदीप सरनोबत यांनी कित्येक महिन्यांनी काल कर्मचाऱ्यांना पाठवले. मात्र त्यांनी केलेल्या कामाची देखील 12 तासांत दुर्दशा झाली आहे. 

वयस्कर लोक आणि महिलांच्या अपघाताचे प्रमाण जास्त

कोल्हापूर शहरातील शासकीय कार्यालयात जात असताना याच मार्गावरून जावं लागतं. त्यामुळे हा रस्ता खूप रहदारीचा आहे. वयस्कर नागरिक आणि महिला देखील या मार्गावरून वाहन चालवत असतात. मात्र, स्पीड ब्रेकर दिसून येत नसल्याने त्यांना गाडीवर ताबा मिळवणे अवघड जाते आणि अपघात होतात.

महत्वाच्या इतर बातम्या : 

महत्त्वाच्या बातम्या

Burger : अंधेरीतील 'जिमीज बर्गर'मध्ये धक्कादायक प्रकार; बर्गरमध्ये आढळला काचेचा तुकडा, ग्राहकाची तुकाराम मुंढेंच्या FDA कडे तक्रार
Burger : अंधेरीतील 'जिमीज बर्गर'मध्ये धक्कादायक प्रकार; बर्गरमध्ये आढळला काचेचा तुकडा, ग्राहकाची तुकाराम मुंढेंच्या FDA कडे तक्रार
मुक्ताईनगरमध्ये एकनाथ खडसेंचा सत्कार, मुख्यमंत्री फडणवीसांसह दिग्गजांची उपस्थिती; अरुणभाईंनी दिली माहिती
मुक्ताईनगरमध्ये एकनाथ खडसेंचा सत्कार, मुख्यमंत्री फडणवीसांसह दिग्गजांची उपस्थिती; अरुणभाईंनी दिली माहिती
भंगारवाल्याकडून 30 हजारांची लाच घेताना पोलीस हवालदारास बेड्या; एसीबीने रंगेहात पकडलं
भंगारवाल्याकडून 30 हजारांची लाच घेताना पोलीस हवालदारास बेड्या; एसीबीने रंगेहात पकडलं
Nashik Crime News : एकाच अपार्टमेंटमध्ये शेजारी, विवाहितांच्या प्रेमसंबंधात ठिणगी; दारू पिऊन प्रियकराने 34 वर्षीय मैत्रिणीला रिसॉर्टच्या दारातच चिरडले, नेमकं काय घडलं?
एकाच अपार्टमेंटमध्ये शेजारी, विवाहितांच्या प्रेमसंबंधात ठिणगी; दारू पिऊन प्रियकराने 34 वर्षीय मैत्रिणीला रिसॉर्टच्या दारातच चिरडले, नेमकं काय घडलं?

व्हिडीओ

PM Modi On Gen Z Special Report : जेन झींशी संवाद साधण्यासाठी सरकारची खटपट : ABP Majha
Pocket Money Scheme Special Report : उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींना पॉकेटमनी मिळणार
Vande Mataram Special Report : वंदे मातारमबाबत काँग्रेसचा ठराव, अमित शाहांचा हल्लाबोल
Sinhagad Fort 'किल्ले सिंहगड' ॲप नोंदणी द्वारेच मिळणार गडावर प्रवेश; एआय कॅमेऱ्यांची राहणार करडी नजर
Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Burger : अंधेरीतील 'जिमीज बर्गर'मध्ये धक्कादायक प्रकार; बर्गरमध्ये आढळला काचेचा तुकडा, ग्राहकाची तुकाराम मुंढेंच्या FDA कडे तक्रार
Burger : अंधेरीतील 'जिमीज बर्गर'मध्ये धक्कादायक प्रकार; बर्गरमध्ये आढळला काचेचा तुकडा, ग्राहकाची तुकाराम मुंढेंच्या FDA कडे तक्रार
मुक्ताईनगरमध्ये एकनाथ खडसेंचा सत्कार, मुख्यमंत्री फडणवीसांसह दिग्गजांची उपस्थिती; अरुणभाईंनी दिली माहिती
मुक्ताईनगरमध्ये एकनाथ खडसेंचा सत्कार, मुख्यमंत्री फडणवीसांसह दिग्गजांची उपस्थिती; अरुणभाईंनी दिली माहिती
भंगारवाल्याकडून 30 हजारांची लाच घेताना पोलीस हवालदारास बेड्या; एसीबीने रंगेहात पकडलं
भंगारवाल्याकडून 30 हजारांची लाच घेताना पोलीस हवालदारास बेड्या; एसीबीने रंगेहात पकडलं
Nashik Crime News : एकाच अपार्टमेंटमध्ये शेजारी, विवाहितांच्या प्रेमसंबंधात ठिणगी; दारू पिऊन प्रियकराने 34 वर्षीय मैत्रिणीला रिसॉर्टच्या दारातच चिरडले, नेमकं काय घडलं?
एकाच अपार्टमेंटमध्ये शेजारी, विवाहितांच्या प्रेमसंबंधात ठिणगी; दारू पिऊन प्रियकराने 34 वर्षीय मैत्रिणीला रिसॉर्टच्या दारातच चिरडले, नेमकं काय घडलं?
जंतर मंतर आंदोलनात पोलिसी बळाचा वापर, आरोपांची चौकशी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाकडून चौकशी समिती स्थापन; माजी न्यायमूर्तींची अध्यक्षपदी नियुक्ती
जंतर मंतर आंदोलनात पोलिसी बळाचा वापर, आरोपांची चौकशी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाकडून चौकशी समिती स्थापन; माजी न्यायमूर्तींची अध्यक्षपदी नियुक्ती
साखरेच्या इतिहासात आत्तापर्यंतची सर्वात मोठी दरवाढ, 65 वरुन 80 रुपयांवर उसळी, ग्राहकांच्या खिशाला मोठी झळ
साखरेच्या इतिहासात आत्तापर्यंतची सर्वात मोठी दरवाढ, 65 वरुन 80 रुपयांवर उसळी, ग्राहकांच्या खिशाला मोठी झळ
Ind vs Eng : तेच मैदान, तेच ठिकाण, तोच संघ; लंडनमधील लॉर्डमध्ये पु्न्हा एकदा टी-शर्ट काढून सेलिब्रेशन, टीम इंडियाकडून इंग्लंडचा धुव्वा
Video: तेच मैदान, तेच ठिकाण, तोच संघ; लंडनमधील लॉर्डमध्ये पु्न्हा एकदा टी-शर्ट काढून सेलिब्रेशन, टीम इंडियाकडून इंग्लंडचा धुव्वा
सुप्रीम कोर्टात वकिलांनी आज कळस चढवला; शिवसेना पक्ष अन् चिन्हाबाबत सुनावणी, अरविंद सावंतांना मोठा विश्वास
सुप्रीम कोर्टात वकिलांनी आज कळस चढवला; शिवसेना पक्ष अन् चिन्हाबाबत सुनावणी, अरविंद सावंतांना मोठा विश्वास
Embed widget