Kolhapur News : सणासुदीच्या काळात प्रवाशांची लूट करणाऱ्या खासगी वाहनांवर कारवाई; तक्रारीसाठी व्हॉट्सॲप क्रमांकही जारी
सणासुदीच्या काळामध्ये प्रवाशांची अक्षरश: लूट करणाऱ्या खासगी वाहनांना चाप लावण्यासाठी प्रादेशिक परिवहन कार्यालय, कोल्हापूर यांनी आदेश काढला आहे. तक्रारीसाठी व्हॉटस्ॲप क्रमांक जारी करण्यात आला आहे.
Kolhapur News : सणासुदीच्या काळामध्ये प्रवाशांची अक्षरश: लूट करणाऱ्या खासगी वाहनांना चाप लावण्यासाठी प्रादेशिक परिवहन कार्यालय, कोल्हापूर यांनी आदेश काढला आहे. अव्वाच्या सव्वा दर आकारून लूट करत असल्यास तक्रार नोंदवण्यासाठी प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून व्हॉटस्ॲप क्रमांकही जारी करण्यात आला आहे. शासनाने निश्चित केलेल्या दरापेक्षा जास्त तिकीट दर घेता येणार नाही, असे परिपत्रकात म्हटले आहे.
विशेष करून गणपती, दसरा तसेच दिवाळीमध्ये सुट्टीला गावी जाणाऱ्यांची लाखांमध्ये असते. नेमकी हीच संधी साधून खासगी वाहन धारकांकडून तिकीट दर मुद्दाम भडकावले जातात. त्यामुळे सामान्यांची त्यामधूच चांगलीच लूट होत असते. यंदा दिवाळी निर्बंधमुक्त असल्याने प्रवाशांची गर्दी चांगलीच होण्याची शक्यता आहे. त्यामुळे गर्दीच्या हंगामात प्रवाशांना तक्रार नोंदवण्यासाठी व्हॉटस्ॲप क्रमांक जारी करण्यात आला आहे.
गर्दीच्या हंगामात प्रवास करताना प्रवाशांना अडचण आल्यास याबाबत महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या 8999803595 या व्हॉट्सॲप क्रमांकावर व rto.09-mh@mah.gov.in या ई-मेल आयडीवर तसेच परिवहन आयुक्त महाराष्ट्र राज्य मुंबई कार्यालयाच्या dycomment@gmail.com या ई-मेल आयडीवर आपली तक्रार नोंदवावी, असे आवाहन प्रादेशिक परिवहन अधिकारी दीपक पाटील यांनी केलं आहे.
राज्यात सुरु होणाऱ्या दिवाळी, ख्रिसमस सणांच्या कालावधी दरम्यान प्रवाशांच्या सोयीसाठी गर्दीच्या हंगामात खासगी बस मालक शासनाने निश्चित केलेल्या प्रती किलोमीटर भाडे दरापेक्षा अधिक भाडे आकारत नसल्याची वेळोवेळी खातरजमा करावी, खासगी वाहतुकदारांनी निर्धारित केलेल्या दरापेक्षा अधिक दर आकारल्यास वाहतुकदारावर मोटार वाहन कायद्यान्वये कडक कारवाई करावी. तसेच वेळोवेळी दिलेल्या आदेशाची अंमलबजावणी करण्याचे निर्देश परिवहन आयुक्तांनी राज्यातील सर्व प्रादेशिक परिवहन अधिकारी व उप प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांना दिले आहेत.
इतर महत्वाच्या बातम्या