एक्स्प्लोर

Amol Kolhe on Ajit Pawar : गुलाबी जॅकेट घातलं की माणूस बदलत नाही आणि पक्ष चोरला म्हणून माणसं चोरता येत नाही, अमोल कोल्हेंकडून अजितदादांना खोचक टोला

Amol Kolhe on Ajit Pawar : गडहिंग्लज तालुक्यामधील नेसरीमध्ये आज राष्ट्रवादी काँग्रेस शिवसन्मान यात्रा पोहोचली. नंदाताई बाभूळकर चंदगड या मतदारसंघातून इच्छूक आहेत.

चंदगड (जि. कोल्हापूर) : गुलाबी यात्रा पुढं गेली की मागून गळती लागते. गुलाबी जॅकेट घातलं की माणूस बदलत नाही आणि पक्ष चोरला म्हणून माणसं चोरता येत नाही, अशा शब्दात खासदार अमोल कोल्हे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना तोफ डागली. गडहिंग्लज तालुक्यामधील नेसरीमध्ये आज राष्ट्रवादी काँग्रेस शिवसन्मान यात्रा पोहोचली. नंदाताई बाभूळकर चंदगड या मतदारसंघातून इच्छूक आहेत. अमोल कोल्हे म्हणाले की, ईडी आणि सीबीआयला घाबरून अनेकांनी भूमिका बदलल्या, पण महाराष्ट्र कधी विकला जात नाही, झुकत नाही हे महाराष्ट्राने दाखवून दिलं. इतकंच नाही, तर दिल्लीच्या बापासमोर झुकत नाही हे लोकसभेला महाराष्ट्राने दाखवून दिलं.  

ते पुढे म्हणाले की, वेढ्यात मराठी वीर दौडले सात हेच याच भूमीत घडलं होतं. स्वामी निष्ठा काय असते हे याच मातीने दाखवले. त्याच मातीत दोघांनी गद्दारी केली. ज्यांनी गद्दारी केली त्यांना स्वाभिमानी जनता जागा दाखवतील. 60 ते 62 विधानसभा मतदार संघात तुतारीचा आवाज येत आहे. आज वेळ तुमची असेल तर येणारा काळ आमचाच असल्याचे ते म्हणाले. 

नंदाताई बाभूळकर काय म्हणाल्या?

नंदाताई म्हणाल्या की,  शेतकऱ्याने ऊसाच्या जमिनी पिकाच्या जमिनी गवत लावायसाठी 800 ते हजार रुपये गुंठ्यांना भाडेतत्त्वावर दिल्या. जाचक असा जीएसटी कर, शेतीमालाला हमीभाव नाही, विजेची बिल वाढली आहेत. शेतकऱ्यांच्या आत्महत्या महाराष्ट्रात वाढत आहेत. महिलांची परिस्थिती अगदी वेगळी नाही. मुलं चांगलं शिक्षण मुलं घेतात, उच्चशिक्षित व्हायला लागलेत पण आमच्या तरुणांच्या हाताला रोजगार नाही. उच्च शिक्षित मुलं नोकरीसाठी पुण्या मुंबईकडे जात आहेत. बिन लग्नाची मुलं फिरत आहेत. तुमच्या आणि माझ्या घरातील मुला मुलींच्या नोकऱ्या या आज गुजरातमध्ये गेल्या आहेत, ही सत्य परिस्थिती आहे. प्राण्यांचा फार मोठा उपद्रव्य भागामध्ये आहे, पण खूप नुकसान होऊनही भरपाई अत्यल्प मिळते. 

कुठला भाऊ पंधराशे रुपये टाकतो आणि 270 कोटींच्या जाहिराती करतो? 

त्या पुढे म्हणाल्या की, आज कुठेतरी आमच्या महिलांना एक पंधराशे रुपयांचं गुलाबी स्वप्न दाखवणारी एक गुलाबी यात्रा काढली जात आहे.ही लाडकी बहीण योजना नसून, सत्तेसाठी काही पण ही योजना आहे. कुठला भाऊ पंधराशे रुपये टाकतो आणि 270 कोटींच्या जाहिराती करतो. आज दर दोन मिनिटांनी टीव्ही असेल, पेपर असेल, बस स्टॉप असेल, पेट्रोल पंप असेल ओरडून ओरडून सांगा लागलेत की आम्ही आमच्या बहिणीला पंधराशे रुपये दिलेले आहेत. म्हणून माझ्या महिला सुज्ञ आहेत. मी एक महिला आहे मला माहिती आहे की असल्या भूलथापांना या महिला बिलकूल बळी पडणार नाहीत. शंभर रुपयाचा स्टॅम्प बंद करून थेट पाचशेचा केला. कोल्हापूर जिल्ह्यात जवळजवळ 10 हजार स्टॅम्प पेपर महिन्याला विकले जातात. अशा रीतीने फक्त कोल्हापूर जिल्ह्यात दहा कोटींचा फटका बसणार आहे. या खिशातून पैसे काढून घ्यायचे आणि अवघे पंधराशे रुपये तुम्हाला द्यायचे. आज जनतेला शेतीमालाला हमीभाव पाहिजे, जीएसटी नावाचा कर गेला पाहिजे. उद्याची पूर परिस्थिती निर्माण होते त्यासाठी कायमस्वरूपी गाळ काढणे असेल उपाययोजना पाहिजेत. जंगली जनावरांचा बंदोबस्त केला पाहिजे. आमच्या तरुण-तरुणींना रोजगार हाताला पाहिजे, असे त्या म्हणाल्या. 

इतर महत्वाच्या बातम्या 

एबीपी माझामध्ये कोल्हापूर ब्युरो म्हणून गेल्या साडे तीन वर्षांपासून कार्यरत. तसेच टीव्ही 9 मराठी कोल्हापूर ब्युरो म्हणूनही कामाचा अनुभव. 
Read More
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Kolhapur Crime News: दारुड्या मुलाला संपवलं, बापाने रचला अपघाताचा बनाव; कोल्हापूर पोलिसांच्या तीक्ष्ण नजरेने प्लॅन फसला, डाव उलगडला
दारुड्या मुलाला संपवलं, बापाने रचला अपघाताचा बनाव; कोल्हापूर पोलिसांच्या तीक्ष्ण नजरेने प्लॅन फसला, डाव उलगडला
कोल्हापुरात व्याजानं पैसे देण्याच्या बहाण्याने खासगी सावकाराचा महिलेवर अत्याचार; आरोपीच्या मोबाईलमध्ये 200 ते 300 अश्लील व्हिडिओ असल्याचा सनसनाटी दावा
कोल्हापुरात व्याजानं पैसे देण्याच्या बहाण्याने खासगी सावकाराचा महिलेवर अत्याचार; आरोपीच्या मोबाईलमध्ये 200 ते 300 अश्लील व्हिडिओ असल्याचा सनसनाटी दावा
Gokul Election: गोकुळमध्ये भाजप सोडून मित्रपक्षाच्या पॅनेलसाठी मुख्यमंत्र्यांची परवानगी घ्या, राष्ट्रवादीची मुश्रीफांकडे मागणी; भाजप, शिवसेना सोडून आणि कोणी मित्र आहेत का? भाजपचा खोचक सवाल!
गोकुळमध्ये भाजप सोडून मित्रपक्षाच्या पॅनेलसाठी मुख्यमंत्र्यांची परवानगी घ्या, राष्ट्रवादीची मुश्रीफांकडे मागणी; भाजप, शिवसेना सोडून आणि कोणी मित्र आहेत का? भाजपचा खोचक सवाल!
Devendra Fadnavis and Krishnaraaj Mahadik: फडणवीस साहेब, तुम्ही माझं नालंदा विद्यापीठ आहात, तुमच्यासोबत राहिलो तर मला कोणीही अडवू शकत नाही: कृष्णराज महाडिक
फडणवीस साहेब, तुम्ही माझं नालंदा विद्यापीठ आहात, तुमच्यासोबत राहिलो तर मला कोणीही अडवू शकत नाही: कृष्णराज महाडिक

व्हिडीओ

Amol Mitkari On Murlidhar Mohol :ब्लॅक बॉक्स कुठे? विमानाचा CCTV कुठे? मोहोळांनी माफी मागावी-मिटकरी
Nashik TCS Case : निर्लज्जपणाचा कहर नराधमांच्या हाती पदर Special Report
Sanjay Dutt Movie : काँग्रेसच्या भुमिकेमुळे संजय दत्तच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह Special Report
Vidhan Parishad Election 2026: विधानपरिषद निवडणुकीत भाजपच्या वाट्याला 6 जागा, इच्छूकांची फिल्डिंग, ही 12 नावं रेसमध्ये, कोणाला उमेदवारी मिळणार
US- Iran Ceasefire: अमेरिका आणि इराणच्या युद्धविरामात वाढ; पुन्हा पाकिस्तानची मध्यस्थी; डोनाल्ड ट्रम्प म्हणाले...

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
नेपाळचे माजी गृहमंत्री जेलमध्ये असतानाच थेट विद्यमान गृहमंत्र्यांचा राजीनामा पडला! असं नेमकं घडलं तरी काय? अवघ्या 25 दिवसांपूर्वीच नव्या सरकारमध्ये शपथविधी
नेपाळचे माजी गृहमंत्री जेलमध्ये असतानाच थेट विद्यमान गृहमंत्र्यांचा राजीनामा पडला! असं नेमकं घडलं तरी काय? अवघ्या 25 दिवसांपूर्वीच नव्या सरकारमध्ये शपथविधी
RBI : ऑटो डेबिटपूर्वी खातेदारांना माहिती देणं आवश्यक, बँकांच्या मनमानीवर आरबीआयच्या नव्या नियमानं चाप, 24 तासांअगोदर माहित द्यावी लागणार
ऑटो डेबिटपूर्वी खातेदारांना माहिती देणं आवश्यक, बँकांच्या मनमानीवर आरबीआयच्या नव्या नियमानं चाप
Chhatrapati Sambhajinagar: घरात घुसली, आतून कडी लावली; महिलेचा सासू सुनेला संपवण्याचा प्रयत्न, डोक्यावर पिस्तुल रोखलं अन्... घटनेनं संभाजीनगर हादरलं
घरात घुसली, आतून कडी लावली; महिलेचा सासू सुनेला संपवण्याचा प्रयत्न, डोक्यावर पिस्तुल रोखलं अन्... घटनेनं संभाजीनगर हादरलं
बाई नाही, तर लेकराची आई कडाडली; वाहतूक कोंडीने एवढं का संतापली महिला, मंत्र्यांनाही सुनावलं, नेमकं कारण काय?
बाई नाही, तर लेकराची आई कडाडली; वाहतूक कोंडीने एवढं का संतापली महिला, मंत्र्यांनाही सुनावलं, नेमकं कारण काय?
मामाच्या घरी भाचीकडून डल्ला, सोन्याचे दागिने पळवले; पोलिसांनी शौचालयातून काढले, असा केला उलगडा
मामाच्या घरी भाचीकडून डल्ला, सोन्याचे दागिने पळवले; पोलिसांनी शौचालयातून काढले, असा केला उलगडा
कोल्हापुरात व्याजानं पैसे देण्याच्या बहाण्याने खासगी सावकाराचा महिलेवर अत्याचार; आरोपीच्या मोबाईलमध्ये 200 ते 300 अश्लील व्हिडिओ असल्याचा सनसनाटी दावा
कोल्हापुरात व्याजानं पैसे देण्याच्या बहाण्याने खासगी सावकाराचा महिलेवर अत्याचार; आरोपीच्या मोबाईलमध्ये 200 ते 300 अश्लील व्हिडिओ असल्याचा सनसनाटी दावा
'इथून बारात नेऊन दाखवं, तुला जिवंत सोडत नाही' अन् अवघ्या काही तासांतच त्याच मांडवात दुसरं लग्न! पोलीस अधिकाऱ्यानं वधूच्या प्रियकराच्या भीतीनं बारात नेलीच नाही अन् प्रियकरानं धमकीवर डाव साधला!
'इथून बारात नेऊन दाखवं, तुला जिवंत सोडत नाही' अन् अवघ्या काही तासांतच त्याच मांडवात दुसरं लग्न! पोलीस अधिकाऱ्यानं वधूच्या प्रियकराच्या भीतीनं बारात नेलीच नाही अन् प्रियकरानं धमकीवर डाव साधला!
मुनी निलेशचंद्रांचं पुन्हा वादग्रस्त वक्तव्य; जरांगे पाटलांचं नाव घेतलं, म्हणाले, RSS नसतं तर हिंदूंच्या डोक्यावर भगवी टोपी नसती
मुनी निलेशचंद्रांचं पुन्हा वादग्रस्त वक्तव्य; जरांगे पाटलांचं नाव घेतलं, म्हणाले, RSS नसतं तर हिंदूंच्या डोक्यावर भगवी टोपी नसती
Embed widget