एक्स्प्लोर
Advertisement
Kolhapur News : मरणानंतरही मुंबई ते कोल्हापूर 'मरणयातना'; मुंबईतील रुग्णालयाकडून चक्क मृतदेहाची अदलाबदल, स्मशानभूमीत प्रकार उघडकीस
हा सर्व प्रकार मुंबईतील एका मोठ्या रुग्णालयाकडून झाल्याने मुंबई ते कोल्हापूर कुटुंबीयांना आणि नातेवाईकांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागला.
कोल्हापूर : मेल्यानंतरही मरणयातनेतून सुटका नाही, असाच धक्कादायक अनुभव कोल्हापूर जिल्ह्यातील करवीर तालुक्यातील वरणगे पाडळीमधील कुटुंबीयांना आला. मुंबईमध्ये उपचारासाठी गेलेल्या वरणगे पाडळी येथील कृष्णात पाटील यांचा रुग्णालयामध्ये उपचार सुरू असताना मृत्यू झाला. यानंतर त्यांचा मृतदेह मुंबईहून कोल्हापूरकडे आणताना चक्क मृतदेहाची अदलाबदली झाल्याचे समोर आले. हा सर्व प्रकार मुंबईतील एका मोठ्या रुग्णालयाकडून झाल्याने मुंबई ते कोल्हापूर कुटुंबीयांना आणि नातेवाईकांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागला. मुंबईवरून कोल्हापूरमध्ये प्रवास करून आल्यानंतर मृतदेह चक्क दुसऱ्याच व्यक्तीचा असल्याचे समोर आले. यानंतर पुन्हा तो मृतदेह घेऊन जाण्याची वेळ संबंधित कुटुंबीयांवर आली.
इतर महत्वाच्या बातम्या
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
क्रिकेट
Advertisement