एक्स्प्लोर

Accident : अर्ध्यावरती डाव मोडला, अधुरी एक कहाणी; अवघ्या 15 दिवसांपूर्वी लग्न झालेल्या सांगलीतील जोडप्याचा कार अपघातात जागीच अंत; देवदर्शन करून येताना काळाचा घाला

अवघ्या 15 दिवसांपूर्वी विवाहबद्ध होऊन सुखी संसाराची स्वप्ने पाहणाऱ्या जोडप्याचा देवदर्शन करून येत असताना झालेल्या भीषण कार अपघातात जागीच अंत झाला. मुलाचे आई वडिल गंभीर जखमी झाले आहेत.

Accident : नियतीचा डाव कधी किती क्रूर आणि भयावह अंत करणारा असतो याची प्रचिती पुन्हा एकदा आली आहे. अवघ्या 15 दिवसांपूर्वी विवाहबद्ध होऊन सुखी संसाराची स्वप्ने पाहणाऱ्या जोडप्याचा देवदर्शन करुन येत असताना झालेल्या भीषण कार अपघातात जागीच अंत झाला. दुर्दैवाचा फेरा इतक्यावरच न थांबता मुलाचे आई-वडील गंभीर जखमी झाले आहेत. इंद्रजित मोहन ढमणगे (वय 29 वर्षे) आणि कल्याणी इंद्रजित ढमणगे (वय 24 वर्षे दोघे रा. किसाननगर, इस्लामपूर, जि. सांगली) अशी मृत झालेल्या दाम्पत्याचे नाव आहे. कल्याणी यांचे माहेर कोल्हापूर जिल्ह्यातील इचलकरंजी आहे, तर इंद्रजित हा मुंबईमध्ये टीसीएस कंपनीत कार्यरत होता. रविवारी (2 एप्रिल) पहाटे त्यांच्यावर अत्यंसंस्कार करण्यात आले. जखमी असलेल्या वडील मोहन आणि आई मिनाक्षी यांच्यावर इस्लामपुरातील खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

कर्नाटकमधील हलूरजवळील जत-जांबोटी महामार्गावर ट्रक आणि कार अपघात झाला. यामध्ये देवदर्शनाला गेलेले कारमधील नवदाम्पत्याचा जागीच मृत्यू झाला आणि दोघेजण जखमी झाले आहेत. हा अपघात शनिवारी (1 एप्रिल) दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास घडला. मृत इंद्रजीत यांचे वडील मोहन (वय 65 वर्षे) आणि आई मिनाक्षी (वय 59 वर्षे) हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर इस्लामपूर येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

देवदर्शन करुन येताना काळाचा घाला 

नवदाम्पत्य इंद्रजित आणि कल्याणी कर्नाटक राज्यातील शाकांभरी देवीच्या दर्शनाला गेले होते. सोबत इंद्रजितचे आई-वडीलही होते. इंद्रजित आणि कल्याणी यांचा विवाह 18 मार्च रोजी झाला होता. विवाहानंतर ते कर्नाटक राज्यातील शाकांभरी देवीच्या दर्शनाला गेले होते. देवदर्शन झाल्यानंतर परत येत असताना (गुर्लापूर ता. मुडलंगी) जवळ हलूर येथे आले असताना समोरुन येणाऱ्या ट्रकला त्यांच्या कारची भीषण धडक झाली. या धडकेमध्ये इंद्रजित आणि कल्याणी यांच्या डोक्याला गंभीर मार लागल्याने जागीच मरण पावले. कारमध्ये सोबत असलेल्या इंद्रजितचे वडील मोहन आणि आई मिनाक्षी हे गंभीर जखमी झाले. मोहन यांचा हाताला दुखापत झाली असून डोक्याला गंभीर जखम झाली आहे. त्यांची पत्नी मिनाक्षी यांच्याही डोक्याला गंभीर जखम झाली आहे. 

बहिणीचा आक्रोश  

मोहन ढमणगे यांना मयत इंद्रजित हा एकुलता एक मुलगा होता. त्यामुळे अवघ्या 15 दिवसांपूर्वी लग्न झालेल्या भावाचे पार्थिव पाहून बहिणीने हृदय पिळवटून टाकणारा आक्रोश केला. वयाची तिशीही पार न केलेल्या मुलाचा अपघातात अंत झाल्याने ढमणगे कुटुंबाला प्रचंड मानसिक धक्का बसला आहे. 

इतर महत्वाच्या बातम्या 

महत्त्वाच्या बातम्या

सातबारा कोरा करणार असं सांगून मुख्यमंत्री शेतकऱ्यांना अजून किती दिवस गंडवणार, कर्जमाफीच्या मुद्यावरुन राजू शेट्टींचा हल्लाबोल
सातबारा कोरा करणार असं सांगून मुख्यमंत्री शेतकऱ्यांना अजून किती दिवस गंडवणार, कर्जमाफीच्या मुद्यावरुन राजू शेट्टींचा हल्लाबोल
शक्तीपीठ महामार्गाविरोधात राजू शेट्टींचा एल्गार, 13 जिल्ह्यातील शेतकरी पंढरपुरात एकत्र येणार, आषाढीपूर्वी भव्य पायी सदबुध्दी यात्रा
शक्तीपीठ महामार्गाविरोधात राजू शेट्टींचा एल्गार, 13 जिल्ह्यातील शेतकरी पंढरपुरात एकत्र येणार, आषाढीपूर्वी भव्य पायी सदबुध्दी यात्रा
Kolhapur Crime: 'आज माझा तरी शेवट नाहीतर...पुढच्याचा'; कोल्हापूरमध्ये नवऱ्याने मोबाईलवर स्टेटस ठेवून बायकोला संपवलं
'आज माझा तरी शेवट नाहीतर...पुढच्याचा'; कोल्हापूरमध्ये नवऱ्याने मोबाईलवर स्टेटस ठेवून बायकोला संपवलं
Gokul : गोकुळच्या राजकारणात उलथापालथी, निवडणुकीआधीच प्रशासकीय मंडळाच्या अध्यक्षांचा राजीनामा, राजकीय दबावाची चर्चा
गोकुळच्या राजकारणात उलथापालथी, निवडणुकीआधीच प्रशासकीय मंडळाच्या अध्यक्षांचा राजीनामा, राजकीय दबावाची चर्चा

व्हिडीओ

Nashik Operation Tiger Special Report : ठाकरेंच्या नगरसेवकांना ऑफर? नाशिकमध्ये एकीची वज्रमूठ
Devendra Fadnavis on Karjmafi : 50 हजार रुपयांऐवजी 2 लाखांपर्यंत कर्जमाफी मिळणार
SIR Form Maharashtra : SIR चा फॉर्म कसा भरायचा? संपूर्ण माहिती
ABP Majha Headlines Today 7 AM : 10 July 2026: एबीपी माझा हेडलाईन्स : Marathi News Maharashtra
Raj Thackeray Vs Fadnavis Special Report : ठाकरेंची टीका, फडणवीस ते गडकरी, रायकीय फैरीRaj

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Devendra Fadnavis on Missing Link: मी पुण्याला येताना मिसिंग लिंकवरून आलो हेच सगळ्यांना उत्तर; सीएम देवेंद्र फडणवीसांचा विरोधकांना टोला
मी पुण्याला येताना मिसिंग लिंकवरून आलो हेच सगळ्यांना उत्तर; सीएम देवेंद्र फडणवीसांचा विरोधकांना टोला
Sheikh Hasina: 'मी माझ्या देशाच्या भूमीवर मरण पत्करण्यास तयार..' भारतात शरणागती पत्करलेल्या बांगलादेशच्या माजी पीएम शेख हसीनांचा अखेर मायदेशात परतण्याचा तगडा निर्णय
'मी माझ्या देशाच्या भूमीवर मरण पत्करण्यास तयार..' भारतात शरणागती पत्करलेल्या बांगलादेशच्या माजी पीएम शेख हसीनांचा अखेर मायदेशात परतण्याचा तगडा निर्णय
Vande Mataram: आधी वंदे मातरम, मग जन-गण-मन! केंद्र सरकारचे 5 महिन्यात दुसऱ्यांदा राज्यांना कठोर अंमलबजावणी करण्याचे निर्देश
आधी वंदे मातरम, मग जन-गण-मन! केंद्र सरकारचे 5 महिन्यात दुसऱ्यांदा राज्यांना कठोर अंमलबजावणी करण्याचे निर्देश
England vs India T20I: विश्वविजेते सपशेल गार होताच टी-20 मधील सिंहासन सुद्धा डळमळीत! इंग्लंडला सुवर्णसंधी चालून आली
विश्वविजेते सपशेल गार होताच टी-20 मधील सिंहासन सुद्धा डळमळीत! इंग्लंडला सुवर्णसंधी चालून आली
जळगाव पोलिसांची सिनेस्टाईल कारवाई, 56.29 ग्रॅम मेफेड्रोनसह दोघांना बेड्या; इंदापुरात 2 गावठी कट्टे, 4 काडतुसं जप्त
जळगाव पोलिसांची सिनेस्टाईल कारवाई, 56.29 ग्रॅम मेफेड्रोनसह दोघांना बेड्या; इंदापुरात 2 गावठी कट्टे, 4 काडतुसं जप्त
अभिनेता प्रशांत दामलेंना मुंबई महापालिकेकडून मोठी जबाबदारी; महापौर रितू तावडेंकडून नियुक्तीपत्र प्रदान
अभिनेता प्रशांत दामलेंना मुंबई महापालिकेकडून मोठी जबाबदारी; महापौर रितू तावडेंकडून नियुक्तीपत्र प्रदान
मुंबई–पुणे रेल्वे प्रवाशांना मोठा दिलासा; उद्यापासून धावणार 200 अतिरिक्त बसफेऱ्या, 30 रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्याने निर्णय
मुंबई–पुणे रेल्वे प्रवाशांना मोठा दिलासा; उद्यापासून धावणार 200 अतिरिक्त बसफेऱ्या, 30 रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्याने निर्णय
Kailas Patil : राज्यासमोर अनेक प्रश्न, महायुतीच्या 237 आमदारांना न्याय द्या, कैलास पाटील यांची ऑपरेशन टायगर 3.0 च्या चर्चांवर रोखठोक प्रतिक्रिया
राज्यासमोर अनेक प्रश्न, महायुतीच्या 237 आमदारांना न्याय द्या, कैलास पाटील यांची ऑपरेशन टायगरवर प्रतिक्रिया
Embed widget