एक्स्प्लोर

केशवराव भोसले नाट्यगृहासाठी काँग्रेसच्या खासदार, आमदारांकडून 5 कोटींचा निधी; शाहू ग्रुपकडूनही 10 लाखांची मदत

नाट्यगृहाच्या पुर्नबांधणीसाठी सहकार्य व प्रयत्न केले जातील, अशी ग्वाही काँग्रेसचे विधान परिषदेचे गटनेते आमदार सतेज पाटील यांनी दिली. शाहू ग्रुपच्या वतीने 10 लाख रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे.

कोल्हापूर : संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृह व खासबाग मैदानाच्या पुर्नबांधणीसाठी कोल्हापुरातील काँग्रेसच्या खासदार, आमदार यांच्याकडून 5 कोटी रुपयांचा निधी देण्यात आला आहे. नाट्यगृहाच्या पुर्नबांधणीसाठी काँग्रेसकडून सर्वतोपरी सहकार्य व प्रयत्न केले जातील, अशी ग्वाही काँग्रेसचे विधान परिषदेचे गटनेते आमदार सतेज पाटील यांनी दिली. दरम्यान, संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृहाच्या पुर्नबांधणीसाठी शाहू ग्रुपच्या वतीने सुद्धा दहा लाख रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे.

आमदार सतेज पाटील म्हणाले, संगीतसुर्य केशवराव भोसले नाट्यगृह हे कोल्हापूर नगरीचे भूषण असून सांस्कृतिक चळवळीचे महत्वाचे केंद्र आहे. त्यामुळे ही वास्तू पुन्हा नव्याने उभारण्यासाठी सर्वांनी एकत्र येण्याची गरज आहे. नाट्यगृहाच्या पुर्नबांधणीसाठी आपल्या आमदार निधीतून दीड कोटी, खासदार शाहू महाराज आणि आमदार जयंत आसगावकर यांनी प्रत्येकी 1 कोटी, आमदार ऋतुराज पाटील व आमदार जयश्री जाधव यांनी प्रत्येकी 75 लाख रुपये असा एकूण 5 कोटींचा निधी उपलब्ध करून देण्याचे जिल्हा नियोजन समितीला पत्र दिले आहे.

राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांनी 1915 रोजी उभारलेला हा ऐतिहासिक ठेवा पुन्हा नव्या दिमाखात उभा राहावा यासाठी आमचे सर्वतोपरी सहकार्य राहील. मराठी चित्रपट, संगीत आणि नाट्य सृष्टीत योगदान देणारे अनेक ख्यातनाम कलाकार या नाट्यगृहातून घडले आहेत. कलाकारांचे हक्काचे व्यासपीठ पुन्हा उभे करण्यासाठी आम्ही सर्वजण कटिबद्ध असल्याचे आमदार सतेज पाटील यांनी सांगितले.

शाहू ग्रुपतर्फे दहा लाख रुपयांची मदत

दरम्यान, संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृहाच्या पुर्नबांधणीसाठी शाहू ग्रुपच्या वतीने दहा लाख रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे. पुन्हा एकदा या नाट्यगृहात कलावंतांचा आवाज घुमावा, म्हणून आमचा हा खारीचा वाटा असेल, असे शाहू ग्रूपचे समरजितसिंह घाटगे यांनी म्हटले आहे. समरजित घाटगे यांनी आपल्या फेसबुक पोस्टमध्ये म्हटले आहे की, काल संगीतसूर्य केशवराव भोसले यांच्या जयंतीच्या पूर्वसंध्येला या नाट्यगृहाला लागलेली आग मनाला चटके देणारी आणि अनेक आठवणी आणि भावनांना होरपळून टाकणारी होती. राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचे जनक घराण्याचे वंशज म्हणून या नाट्यगृहाच्या पुनरउभारणीसाठी आम्ही शाहू ग्रुपच्या वतीने दहा लाख रुपयांची मदत जाहीर करत असून पुन्हा एकदा या नाट्यगृहात कलावंतांचा आवाज घुमावा, म्हणून आमचा हा खारीचा वाटा असेल.

109 वर्षांपूर्वी आपल्या कोल्हापूर शहरातील मंगळवार पेठेत राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांनी थिएटर पॅलेस उभारले आणि स्वातंत्र्यानंतर याच थिएटरचे नामकरण संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृह असे करण्यात आले. रोममध्ये पाहिलेल्या थिएटर आणि ऑलिम्पिक मैदानाची प्रेरणा घेऊन असेच मैदान आणि नाट्यगृह आपल्याही जिल्ह्यात असावे, असा मानस ठेवून महाराजांनी खासबाग मैदान आणि नाट्यगृहाचे काम सुरू केले. श्रीमंत पिराजीराव घाटगे उर्फ बापूसाहेब महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली या दोन्ही ऐतिहासिक वास्तूंचे काम सुरू झाले आणि दि. 14 ऑक्टोबर 1915 रोजी पूर्ण झाले. 

काल या आगीच्या भक्षस्थानी अनेक कलावंत, कलाप्रेमी आणि खेळाडूंच्या भावना पडल्या असल्या तरी राजर्षी शाहू महाराजांचे वंशज म्हणून आपण याही परिस्थितीवर नक्कीच मात करू. आपल्या जिल्ह्यातील अनेक सेवाभावी संस्था आणि तरुण मंडळांनी आपला मदतीचा हात पुढे करावा, ही विनंती! शून्यातून सुरवात करत आपले ऐतिहासिक नाट्यगृह आणि खासबाग पुन्हा एकदा उठेल आणि साऱ्या जगात आपली मान अभिमानाने उंचावेल, यात शंकाच नाही.

इतर महत्वाच्या बातम्या 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 नोव्हेंबर 2024 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 नोव्हेंबर 2024 | सोमवार
Manda Mhatre Cried : एकनाथ शिंदेंचं 'ते' वाक्य...मंदा म्हात्रेंच्या डोळ्यात पाणी!Belapur VidhanSabha
Manda Mhatre Cried : एकनाथ शिंदेंचं 'ते' वाक्य...मंदा म्हात्रेंच्या डोळ्यात पाणी!Belapur VidhanSabha
Jayant Patil : हसन मुश्रीफांनी शरद पवारांशी गद्दारी केली, आता त्यांना जागा दाखवण्याची वेळ; जयंत पाटलांचा कागलमधून हल्लाबोल
हसन मुश्रीफांनी शरद पवारांशी गद्दारी केली, आता त्यांना जागा दाखवण्याची वेळ; जयंत पाटलांचा कागलमधून हल्लाबोल
Sujay Vikhe : आली रे आली...आता तुमची बारी आली; सुजय विखेंचा संगमनेरमधून बाळासाहेब थोरातांना थेट इशारा, म्हणाले...
आली रे आली...आता तुमची बारी आली; सुजय विखेंचा संगमनेरमधून बाळासाहेब थोरातांना थेट इशारा, म्हणाले...
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Maharashtra Assembly Update :विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या तोफा थंडावल्याBig Fight Vidarbh : प्रचारानंतरचा विचार काय? पश्चिम विदर्भात अनेक दिग्गजांची प्रतिष्ठा पणालाBig Fight Vidarbh : विजय वडेट्टीवार, नाना पटोले यांच्या मतदारसंघात बिग फाईटBig Fight Vidarabh Vidhansabha : नंदुरबार, नवापूर, सिंदखेडा विदर्भाच्या बिग फाईट

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 नोव्हेंबर 2024 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 नोव्हेंबर 2024 | सोमवार
Manda Mhatre Cried : एकनाथ शिंदेंचं 'ते' वाक्य...मंदा म्हात्रेंच्या डोळ्यात पाणी!Belapur VidhanSabha
Manda Mhatre Cried : एकनाथ शिंदेंचं 'ते' वाक्य...मंदा म्हात्रेंच्या डोळ्यात पाणी!Belapur VidhanSabha
Jayant Patil : हसन मुश्रीफांनी शरद पवारांशी गद्दारी केली, आता त्यांना जागा दाखवण्याची वेळ; जयंत पाटलांचा कागलमधून हल्लाबोल
हसन मुश्रीफांनी शरद पवारांशी गद्दारी केली, आता त्यांना जागा दाखवण्याची वेळ; जयंत पाटलांचा कागलमधून हल्लाबोल
Sujay Vikhe : आली रे आली...आता तुमची बारी आली; सुजय विखेंचा संगमनेरमधून बाळासाहेब थोरातांना थेट इशारा, म्हणाले...
आली रे आली...आता तुमची बारी आली; सुजय विखेंचा संगमनेरमधून बाळासाहेब थोरातांना थेट इशारा, म्हणाले...
मनोज जरांगेंबद्दल अपशब्द, कथित ऑडिओ व्हायरल; भाजप अन् राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये सोशल मीडिया वॉर
मनोज जरांगेंबद्दल अपशब्द, कथित ऑडिओ व्हायरल; भाजप अन् राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये सोशल मीडिया वॉर
सभेला डोळ्यासमोर आई, बारामतीत अजित पवारांची भावुक अन् मिश्कील फटकेबाजी; लढाई भावनिक वळणावर
सभेला डोळ्यासमोर आई, बारामतीत अजित पवारांची भावुक अन् मिश्कील फटकेबाजी; लढाई भावनिक वळणावर
Sharad Pawar : मविआचं सरकार आल्यास रोहित पवारांवर मोठी जबाबदारी; कर्जत-जामखेडच्या सभेत शरद पवारांचे संकेत, नेमकं काय म्हणाले?
मविआचं सरकार आल्यास रोहित पवारांवर मोठी जबाबदारी; कर्जत-जामखेडच्या सभेत शरद पवारांचे संकेत, नेमकं काय म्हणाले?
Shirala Vidhan Sabha constituency : मानसिंगराव नाईक की सत्यजीत देशमुख, शिराळ्यात कोण गुलाल उधळणार? 'असं' आहे विधानसभेचं गणित
मानसिंगराव नाईक की सत्यजीत देशमुख, शिराळ्यात कोण गुलाल उधळणार? 'असं' आहे विधानसभेचं गणित
Embed widget