(Source: ECI/ABP News/ABP Majha)
NIRF rankings 2022 : कोल्हापूर जिल्ह्यातील 3 संस्थांचा NIRF रँकिंगमध्ये समावेश
नॅशनल इन्स्टिट्यूट रँकिंग फ्रेमवर्क (NIRF) रँकिंगमध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील 3 शैक्षणिक संस्थांनी स्थान मिळवले आहे. भारती विद्यापीठ कॉलेज ऑफ फार्मसी हे देशातील फार्मसी कॉलेजमध्ये 74 व्या स्थानी आहे.
NIRF rankings 2022 : नॅशनल इन्स्टिट्यूट रँकिंग फ्रेमवर्क (NIRF) रँकिंग 2022 मध्ये कोल्हापूर आणि सातारा जिल्ह्यातील 3 शैक्षणिक संस्थांनी स्थान मिळवले आहे. कोल्हापुरातील भारती विद्यापीठ कॉलेज ऑफ फार्मसी हे देशातील फार्मसी कॉलेजमध्ये 74 व्या क्रमांकावर आहे.
कॉलेजचे प्राचार्य एच एन मोरे यांनी एका इंग्रजी दैनिकाशी बोलताना सांगितले की, “आम्ही गेल्या सात वर्षांपासून या यादीत स्थान मिळवत आहोत. प्रकाशने आणि पेटंटमुळे महाविद्यालयाची कामगिरी चांगली आहे. आम्ही आतापर्यंत 700 हून अधिक शोधनिबंध प्रकाशित केले आहेत आणि 33 पेटंट आहेत. आमच्याकडे दरवर्षी 80 टक्क्यांपेक्षा जास्त प्लेसमेंट असतात.”
सातारा जिल्ह्यातील कराड येथील कृष्णा इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस डीम्ड युनिव्हर्सिटी भारतातील सर्वोच्च विद्यापीठांच्या यादीत 73 क्रमांकावर आहे. साताऱ्यातील यशवंतराव चव्हाण इन्स्टिट्यूट ऑफ सायन्सेसने देशातील 101-150 अव्वल महाविद्यालयांमध्ये स्थान मिळवले आहे. हे महाविद्यालय सध्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील रयत शिक्षण संस्थेद्वारे चालवले जाते.
केंद्रीय मानव संसाधन मंत्रालयाने जाहीर केलेल्या राष्ट्रीय क्रमवारीत नाशिक शहरातील MGV चे कर्मवीर भाऊसाहेब हिरे डेंटल कॉलेज डेंटल कॉलेज श्रेणीमध्ये 37 व्या स्थानावर आहे. कॉलेज आणि हॉस्पिटलची स्थापना 1991 मध्ये झाली. यात बॅचलर ऑफ डेंटल सर्जरी (BDS) साठी 100 जागा आणि मास्टर ऑफ डेंटल सर्जरी (MDS) च्या 29 जागा आहेत, याशिवाय 7 विषयांमध्ये PHD सेंटर आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या
- Free Corona Booster Dose : कोल्हापूर जिल्ह्यात आजपासून मोफत कोरोना लसीचा बुस्टर डोस, घेतला नसेल, तर लगेच घेऊन टाका!
- Kolhapur News : कोल्हापूर जिल्ह्यातील सहकारी संस्थांच्या निवडणूका सुद्धा लांबणीवर, राज्य सरकारचा आदेश
- Vijaydurg Fort : पन्हाळा, विशाळगडानंतर आता विजयदुर्गची तटबंदी धोक्यात, शिवरायांच्या ऐतिहासिक वास्तूंना लागली घरघर
- Kolhapur Rain : कोल्हापूर जिल्ह्यात पावसाचा जोर ओसरला, पंचगंगा नदी लागली उतरणीला, अलमट्टीतून पाण्याचा विसर्ग वाढवला