एक्स्प्लोर

बांगलादेशी अन् रोहिंग्या मुसलमानांना फसव्या कागदपत्रांच्या आधारे अमरावतीत जन्म प्रमाणपत्राचा खेळ! किरीट सोमय्यांचा गंभीर आरोप

Kirit Somaiya: अंजनगाव सुर्जी येथील तहसील कार्यालयातून हजारो बनावट जन्म दाखले दिल्याचा आरोप गंभीर आरोप भाजपा नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी केला आहे. 

अमरावती : अमरावती जिल्ह्यात बांग्लादेशी आणि रोहिंग्यांना जन्म प्रमाणपत्र देण्याचा घोटाळा उघडकीस आला आहे. मालेगावात असाच प्रकार समोर आला होता. त्याप्रकरणी एसआयटी स्थापन झालीय. दरम्यान, अमरावतीतील अंजनगाव सुर्जी प्रकरणी अशीच एसआयटी स्थापन झालीय. अमरावती जिल्ह्याचे आकडे माझ्या हातात आहेत. भारतात जन्म-मृत्यू नोंद कायदा 1969 मध्ये अंमलात आलाय. नव्या कायद्यानुसार जन्म प्रमाणपत्र देण्याचे अधिकार तहसीलदारांना देण्यात आलाय. मात्र यात मोठं षडयंत्र रचण्यात आलंय. यात शेकडो कोटी वापरण्यात आलेय. तसेच काही राजकीय पक्षांचे नेते, काही मुस्लिम नेते आणि काही एनजीओ यांच्या संगनमताने महाराष्ट्रात काही क्षेत्र निवडले. यात मालेगाव आणि अंजनगाव सुर्जीचा समावेश असून अंजनगाव सुर्जी तहसील कार्यालयातून हजारो बनावट जन्म दाखले दिल्याचा आरोप गंभीर आरोप भाजपा नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी केला आहे. 

बांगलादेशी आणि रोहिंग्या यांना प्रमाणपत्र देणारे एक मोठं रॅकेट

अंजनगावात 1184 अर्जापैकी एकही अर्ज फेटाळला गेला नाही. यातील एकानेही कोणत्या ठिकाणावर जन्म झाला याचा दाखला दिला नाही. महापालिका, नगरपालिकेनं नोंद नसल्याचं सांगितलं, यालाही जन्म प्रमाणपत्रासाठी वैध ठरवलं गेलं. अमरावती महानगराची लोकसंख्या 6 लाखांत असून 4638 अर्ज आलेत, हा आकडा देशात सर्वात जास्त आहेत. यातील एकाही अर्जात जन्माचा पुरावा नाही. अचलपुरमध्ये 2657 अर्ज आलेत. यातील 2527 लोकांना प्रमाणपत्र देण्यात आलेत. चांदूरबाजारमध्ये एकही अर्ज फेटाळला गेली नाही. अमरावती जिल्ह्यात यातून आतापर्यंत 14, 643 लोकांना अर्ज आलेत. यातील 8350 लोकांना प्रमाणपत्र दिले गेलेत. यातील 50 टक्के लोकांचे अर्ज डिसेंबरमध्ये आलेत. मी अंजनगाव सुर्जीच्या तहसीलदारांशी 50 मिनिटे चर्चा केली. यावेळी त्यांना माझ्याकडे असलेले सर्व पुरावे आणि तथ्य समजावून सांगितलीत. मी या संदर्भात मुख्यमंत्री आणि गृहमंत्री यासोबतच गृह सचिव आणि पोलिसांतील वरिष्ठ अधिकाऱ्यांना माझ्याकडची संपूर्ण माहिती दिली. त्यानंतरच मी भिवंडी मालेगाव आणि आता अंजनगाव सुर्जीला आलो आहे. अशीही माहिती किरीट सोमय्या यांनी यावेळी दिली. 

केंद्रीय गृह मंत्रालयाकडून देशपातळीवर मोहीम 

बांगलादेशी आणि रोहिंग्या यांनाही प्रमाणपत्र देणारे एक मोठं रॅकेट कार्यरत असल्याची शक्यता आहे. देश पातळीवरही हा प्रश्न अतिशय मोठा आणि महत्त्वाचा आहे. माझी माहिती ऐकून घेतल्यावर या संपूर्ण प्रकरणाची चौकशी दोन पातळीवर होणार आहे. या संदर्भात केंद्रीय गृह मंत्रालयाला अवगत केलं आहे. केंद्रीय गृह मंत्रालय देशपातळीवरही बांगलादेशी आणि रोहिंग्यांना शोधण्याचं काम आणि मोहीम हाती घेणार असल्याचे किरीट सोमय्या म्हणाले.  

अंजनगाव सुर्जी तालुक्यात 1100 हून अधिक बांगलादेशी व रोहिंग्या मुसलमानांना फसव्या कागदपत्रांच्या आधारे जन्म प्रमाणपत्रे दिल्याचा गंभीर आरोप सोमय्यांनी केलाये. त्यांच्या तक्रारीची दखल घेत अमरावती जिल्हा प्रशासनाने 9 जानेवारीला या प्रकरणाच्या सखोल चौकशीसाठी समिती गठित केलीये. सोमय्या यांच्या अंजनगाव सुर्जी आणि अमरावतीच्या दौऱ्यानंतर या प्रकरणी वातावरण आणखी तापण्याची शक्यता वर्तवली जातीये.

हे ही वाचा 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Kolhapur Crime : 5 लाख घेतले, सावकाराने मुलाचं अपहरण करुन 29 लाख वसूल केले, कोल्हापुरात हादरुन सोडणारी कहाणी!
5 लाख घेतले, सावकाराने मुलाचं अपहरण करुन 29 लाख वसूल केले, कोल्हापुरात हादरुन सोडणारी कहाणी!
CIDCO डोमेसाईल अट रद्द करण्याच्या विचारात, शिरसाटांची भावना चांगली, पण फटका मराठी माणसालाच!
CIDCO डोमेसाईल अट रद्द करण्याच्या विचारात, शिरसाटांची भावना चांगली, पण फटका मराठी माणसालाच!
चार मुलांना जन्म दिल्यास एक लाखाचे बक्षीस, इंदूरमध्ये परशुराम कल्याण बोर्डची घोषणा; वक्तव्याची सोशल मीडियावर चर्चा 
चार मुलांना जन्म दिल्यास एक लाखाचे बक्षीस, इंदूरमध्ये परशुराम कल्याण बोर्डाची घोषणा; वक्तव्याची सोशल मीडियावर चर्चा 
सोयाबीन उत्पादकांना दिलासा मिळणार? फडणवीसांचा केंद्रीय कृषीमंत्र्यांना फोन, सोयाबीन खरेदीची मुदत वाढवण्याची मागणी
सोयाबीन उत्पादकांना दिलासा मिळणार? फडणवीसांचा केंद्रीय कृषीमंत्र्यांना फोन, सोयाबीन खरेदीची मुदत वाढवण्याची मागणी
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

100 Headlines |  महाराष्ट्र सुपरफास्ट शंभर बातम्यांचा सुपरफास्ट आढावा एका क्लिकवर ABP majhaABP Majha Marathi News Headlines 430PM TOP Headlines 430PM 13 January 2025Santosh Deshmukh Wife Reaction | एक महिन्याआधी धमकी आली होती, संतोष देशमुखांच्या पत्नीचा खुलासाPriyanka Ingale : महाराष्ट्राची प्रियंका, Kho Kho World Cup 2025 गाजवणार, भारताचं नेतृत्त्व करणार!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kolhapur Crime : 5 लाख घेतले, सावकाराने मुलाचं अपहरण करुन 29 लाख वसूल केले, कोल्हापुरात हादरुन सोडणारी कहाणी!
5 लाख घेतले, सावकाराने मुलाचं अपहरण करुन 29 लाख वसूल केले, कोल्हापुरात हादरुन सोडणारी कहाणी!
CIDCO डोमेसाईल अट रद्द करण्याच्या विचारात, शिरसाटांची भावना चांगली, पण फटका मराठी माणसालाच!
CIDCO डोमेसाईल अट रद्द करण्याच्या विचारात, शिरसाटांची भावना चांगली, पण फटका मराठी माणसालाच!
चार मुलांना जन्म दिल्यास एक लाखाचे बक्षीस, इंदूरमध्ये परशुराम कल्याण बोर्डची घोषणा; वक्तव्याची सोशल मीडियावर चर्चा 
चार मुलांना जन्म दिल्यास एक लाखाचे बक्षीस, इंदूरमध्ये परशुराम कल्याण बोर्डाची घोषणा; वक्तव्याची सोशल मीडियावर चर्चा 
सोयाबीन उत्पादकांना दिलासा मिळणार? फडणवीसांचा केंद्रीय कृषीमंत्र्यांना फोन, सोयाबीन खरेदीची मुदत वाढवण्याची मागणी
सोयाबीन उत्पादकांना दिलासा मिळणार? फडणवीसांचा केंद्रीय कृषीमंत्र्यांना फोन, सोयाबीन खरेदीची मुदत वाढवण्याची मागणी
कुणालाही दयामाया दाखवू नका, एकही आरोपी सुटता कामा नये; मुख्यमंत्र्यांचा बीड SP, CID अधिकाऱ्यांना फोन
कुणालाही दयामाया दाखवू नका, एकही आरोपी सुटता कामा नये; मुख्यमंत्र्यांचा बीड SP, CID अधिकाऱ्यांना फोन
Santosh Deshmukh Case : तसं तुम्ही पुढे येऊन सांगा, वाल्मिक कराड खुनात सहभागी नाही; आव्हाडांनी सगळंच काढलं, खळबळजनक आरोप
तसं तुम्ही पुढे येऊन सांगा, वाल्मिक कराड खुनात सहभागी नाही; आव्हाडांनी सगळंच काढलं, खळबळजनक आरोप
धक्कादायक! 5 वर्षात 834 बेस्टच्या अपघातात 88 नागरिक मृत्युमुखी; अपघातग्रस्तांना 42. 40 कोटींची आर्थिक नुकसानभरपाई
धक्कादायक! 5 वर्षात 834 बेस्टच्या अपघातात 88 नागरिक मृत्युमुखी; अपघातग्रस्तांना 42. 40 कोटींची आर्थिक नुकसानभरपाई
Gold Reserves city of Attock : मराठ्यांनी जिथं अटकेपार झेंडा फडकवला तिथंच पाकिस्तानला सोन्याची खाण सापडली!
मराठ्यांनी जिथं अटकेपार झेंडा फडकवला तिथंच पाकिस्तानला सोन्याची खाण सापडली!
Embed widget