एक्स्प्लोर
इंजिनिअरिंग सोडून फोटोग्राफीसाठी घरातून पळालेला तरुण मुंबईत सापडला!

गुहागर: थ्री इडियट्स सिनेमाची कथा तुमच्या लक्षात असेलच. या सिनेमात फरहान कुरेशीची भूमिका साकारणारा आर माधवन तुम्हाला आठवत असेल. असाच फरहान कुरेशी रत्नागिरीत आहे.
थ्री इडियट्समधल्या फरहानपेक्षा वेगळी स्थिती नव्हती केतन वरांडेची. गुहागरच्या नगराध्यक्षांचा स्नेहा वरांडे यांचा मुलगा 27 जून रोजी बेपत्ता झाला. शोधाशोध सुरु झाली आणि समोर आलं... त्याचं बेपत्ता होण्याचं कारण. केतनला व्हायचं होतं वाईल्डलाईफ फोटोग्राफर. पण वडिलांच्या हट्टापायी तो इंजिनिअरिंगची घोकमपट्टी करत होता.
अखेर केतन बेपत्ता झाल्याची तक्रार पोलिसात करण्यात आली. त्यानंतर केतनच्या तपासासाठी पोलिसांनी कंबर कसली. तपासात केतन मुंबईत असल्याचं पोलिसांना समजलं. त्यानंतर गुहागरचे पोलीस मुंबईत पोहोचले. पण केतन घरी परतायला तयार नव्हता. अखेर बऱ्याच समजुतीनंतर केतन घरी परतला. पण तब्बल 10 दिवसांच्या अज्ञातवासानंतर.
थ्री इडियट्समधल्या फरहानच्या वडिलांनी मुलांची आवड पाहून ज्याप्रमाणे शेवटी समजुतदारपणा दाखवला. तसाच समजुतदारपणा प्रत्येक पालकांनी दाखवल्यास पोरं केतनसारखं पाऊल नक्कीच उचलणार नाहीत.
आणखी वाचा
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
विश्व
राजकारण
महाराष्ट्र
सोलापूर
Advertisement
Advertisement



















