एक्स्प्लोर

Karnataka Bypoll Election Result | कर्नाटक निकालानंतर सिद्धारमैयांचा राजीनामा तर पंतप्रधान मोदींची काँग्रेसवर टीका, म्हणाले...

मोठा पराभव झाल्यानंतर विरोधी पक्षनेते सिद्धारामैया यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. जनतेने दिलेल्या या कौलाचा आम्ही स्वीकार करतो, मी माझा राजीनामा काँग्रेस अध्यक्षांना पाठवला आहे, असे ते म्हणाले. तर निकालानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर निशाणा साधला आहे.

बंगळुरु : कर्नाटक पोटनिवडणूक निकालामध्ये मोठा पराभव झाल्यानंतर विरोधी पक्षनेते सिद्धारामैया यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. जनतेने दिलेल्या या कौलाचा आम्ही स्वीकार करतो, मी माझा राजीनामा काँग्रेस अध्यक्षांना पाठवला आहे, असे ते म्हणाले. तर निकालानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर निशाणा साधला आहे. कर्नाटकमध्ये काँग्रेसने मागच्या दाराने जनादेश चोरला होता. मात्र आता जनतेने त्यांना त्यांची जागा दाखवून दिली आहे. झारखंडच्या बरहीमध्ये एका सभेला संबोधित करताना पीएम मोदी म्हणाले की, काही लोकं म्हणायचे की, दक्षिण भारतात भाजपचा प्रभाव कमी आहे. मात्र त्या लोकांना कर्नाटक पोटनिवडणुकीच्या निकालाने लोकशाही पद्धतीने धडा शिकवला आहे. मोदी पुढे म्हणाले की, काँग्रेस आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी कर्नाटकात जनादेशाचे उल्लंघन केले आणि जनतेच्या पाठीत वार केला. आता या पक्षांना पराभवाचे तोंड पाहावे लागले आहे. कर्नाटकचा हा निकाल या लोकांनी लक्षात ठेवणं गरजेचं आहे, असेही मोदी म्हणाले. कर्नाटकात विधानसभेच्या पोटनिवडणुकीत 15 पैकी 12 जागांवर भाजपने विजय मिळवला आहे. येडियुरप्पा सरकारला बहुमतासाठी 15 किमान सहा जागांवर विजय मिळवणं आवश्यक होतं. भाजपनं अखेर 12 जागांवर विजय मिळवत आपली सत्ता कायम ठेवण्यात यश मिळवलं आहे.
Karnataka ByPoll Result | कर्नाटक पोटनिवडणुकीत भाजपचा डंका, 15 पैकी 12 जागांवर विजय मिळवत सत्ता काबीज
या 12 जागांवर विजय मिळाल्याने येदियुरप्पा सरकारला पूर्ण बहुमत मिळाले आहे. यामुळे विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेस आणि जेडीएसला मोठा धक्का बसला आहे. आधी झालेल्या निवडणुकांमध्ये या 15 पैकी 12 जागांवर काँग्रेसने विजय मिळवला होता. मात्र या निवडणुकीत काँग्रेसला केवळ दोन जागांवर समाधान मानावे लागले आहे. तर जेडीएसला एकही जागा जिंकता आलेली नाही. या 15 पैकी तीन जागा जेडीएसने जिंकल्या होत्या. कर्नाटकमध्ये 17 आमदारांच्या बंडामुळे काँग्रेस-जेडीएसचं सरकार पडलं होतं. या आमदारांनी राजीनामे देत या सरकारचा पाठिंबा काढून घेतला. या आमदारांना तत्कालीन विधानसभा अध्यक्षांनी अपात्र ठरवलं होते. आमदार अपात्र ठरल्याने रिक्त झालेल्या 15 मतदारसंघांमध्ये पोटनिवडणूक झाली होती. कर्नाटक पोटनिवडणुकीत अठानी, कगवाड, गोकाक, येलापूर, हिरेकेरुर, रानीबेन्नूर, विजयनगर, चिकबेलापुर, के.आर. पुरम यशवंतपुरा, महालक्ष्मी ले आऊट, शिवाजीनगर, होसाकोटे, के.आर. पेटे, हुनसूर जागांवर मतदान झालं होतं. कर्नाटकमध्ये 6 डिसेंबर रोजी 15 विधानसभा पोटनिवडणुकीसाठी मतदान झालं होतं. 61 टक्क्यांपेक्षा अधिक मतदारांनी मतदान प्रक्रियेत सहभाग नोंदवला होता.

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live News Updates: नाशिकमध्ये पुन्हा 3.4 रिश्टर स्केलचा भूकंप, नागरिक भयभीत
Maharashtra Live News Updates: नाशिकमध्ये पुन्हा 3.4 रिश्टर स्केलचा भूकंप, नागरिक भयभीत
Ashram School Student Deaths: आदिवासी आश्रमशाळा की 'मृत्यूचा सापळा'? दोन वर्षांत राज्यात तब्बल 584 विद्यार्थ्यांचा मृत्यू; धक्कादायक आकडेवारी समोर
आदिवासी आश्रमशाळा की 'मृत्यूचा सापळा'? दोन वर्षांत राज्यात तब्बल 584 विद्यार्थ्यांचा मृत्यू; धक्कादायक आकडेवारी समोर
Shravan Shukravar: श्रावण शुक्रवारपासून वैभवलक्ष्मी व्रत कसे करावे? किती शुक्रवार हे व्रत करावे? 'या' व्रतकथेशिवाय पूजा अपूर्ण पूजा पद्धत, नैवैद्य, उद्यापन, महत्त्व...
श्रावण शुक्रवारपासून वैभवलक्ष्मी व्रत कसे करावे? किती शुक्रवार हे व्रत करावे? 'या' व्रतकथेशिवाय पूजा अपूर्ण पूजा पद्धत, नैवैद्य, उद्यापन, महत्त्व...
Sukhbir Singh Badal Nanded News: सुखबीर सिंह बादल यांना एअरलिफ्ट करण्यात येणार; नांदेडमध्ये गुरद्वाराजवळ झालेला हल्ला, नेमकं काय घडलं?
सुखबीर सिंह बादल यांना एअरलिफ्ट करण्यात येणार; नांदेडमध्ये गुरद्वाराजवळ झालेला हल्ला, नेमकं काय घडलं?

व्हिडीओ

Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?
Buldhana Khamgaon Ajji on FDA : तुकाराम मुंढेंना विनंती करणाऱ्या खामगावातील व्हायरल आजी 'माझा'वर
Sanjay Raut on Amit Shah: अमित शाहांना तातडीने उपपंतप्रधान व्हायचंय, पण मोदींनी नकार दिलाय
Manoj Jarange Patil: आआथातू अरअरअर...अ‍ॅक्शन केली, डायलॉग बोलले; जरांगेंनी बावनकुळेंची बाहुबलीमधील कालकेयशी केली तुलना

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nagpur SIR News: सव्वादोन लाख मतदार मृत, साडेचार लाख कायमस्वरूपी स्थलांतरित; नागपुरमध्ये मतदार यादीच्या SIR प्रक्रियेत धक्कादायक माहिती
सव्वादोन लाख मतदार मृत, साडेचार लाख कायमस्वरूपी स्थलांतरित; नागपुरमध्ये मतदार यादीच्या SIR प्रक्रियेत धक्कादायक माहिती
Share Market: निफ्टी 50 सलग तिसऱ्या सत्रात घसरला; सेन्सेक्स 0.15 टक्के वाढीसह बंद
Share Market: निफ्टी 50 सलग तिसऱ्या सत्रात घसरला; सेन्सेक्स 0.15 टक्के वाढीसह बंद
Solapur Crime News : झोपेतून उठवल्याचा राग, बिहारी साथिदाराला हातोड्याने वार करुन संपवलं, करमाळ्यातील धक्कादायक घटना
झोपेतून उठवल्याचा राग, बिहारी साथिदाराला हातोड्याने वार करुन संपवलं, करमाळ्यातील धक्कादायक घटना
BAN vs AUS : बांगलादेशचा बलाढ्य ऑस्ट्रेलियाला दणका,  पहिल्या डावात 200 धावांच्या आत गुंडाळलं, कसोटीचा पहिला दिवस गाजवला 
बांगलादेशचा बलाढ्य ऑस्ट्रेलियाला दणका, पहिल्या डावात 200 धावांच्या आत गुंडाळलं, कसोटीचा पहिला दिवस गाजवला
Bar Council : बार काऊन्सिलनं निर्णय फिरवला, सरन्यायाधीशांना विरोध करणाऱ्या हैदराबाद येथील कायदा पदवीधर विद्यार्थ्यांच्या नोंदणीवरील स्थगिती मागे
बार काऊन्सिलनं निर्णय बदलला, सरन्यायाधीशांना विरोध विद्यार्थ्यांना दिलासा, कायदा पदवीधरांच्या वकील म्हणून नोंदणीचा मार्ग मोकळा 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 ऑगस्ट 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 ऑगस्ट 2026 | गुरुवार
Shiv Sena Symbol Case : चंद्रचूड यांच्या घटनापीठाने दिलेल्या शिवसेनेच्या निकालाचा फेरविचार व्हावा, ठाकरेंच्या वकिलांची मोठी मागणी
चंद्रचूड यांच्या घटनापीठाने दिलेल्या शिवसेनेच्या निकालाचा फेरविचार व्हावा, ठाकरेंच्या वकिलांची मोठी मागणी
Sukhbir Badal News:मोठी बातमी, पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री सुखबीर सिंह बादल यांच्यावर नांदेडमध्ये हल्ला, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे चौकशीचे आदेश 
सुखबीर सिंह बादल यांच्यावर नांदेडमध्ये हल्ला, आरोपीला अटक; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे चौकशीचे आदेश 
Embed widget