Kalicharan Maharaj : सर्व आनंद संपून जाईल, मात्र ईश्वराचा आनंद संपणार नाही : कालीचरण महाराज
Kalicharan Maharaj : नाशिकमध्ये स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जयंती निमित्ताने कालीचरण महाराजांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. या व्याख्यानात कालीचरण महाराजांनी वादग्रस्त वक्तव्य केले आहे.
नाशिक : जगातील सर्व सुंदर बाया भोगून घ्या, सर्व भोगून घ्या, चांगल्या फुलाचा वास घ्या, नाकाचा सुगंध घ्या, हा सर्व आनंद संपून जाईल. मात्र ईश्वराचा आनंद संपणार नाही, असे वादग्रस्त वक्तव्य कालीचरण महाराज (Kalicharan Maharaj) यांनी केले आहे. नाशिकमध्ये (Nashik News) भद्रकाली परिसरातील साक्षी गणेश मंदिर परिसरात स्वातंत्र्यवीर सावरकर (Veer Savarkar Jayanti 2024) यांच्या जयंती निमित्ताने कालीचरण महाराजांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी कालिचरण महाराजांनी हे वादग्रस्त वक्तव्य केले. यामुळे आता वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.
कालीचरण महाराज म्हणाले की, मी मराठी हिंदी इंग्रजी भाषेत बोलतो. पण माझे शिक्षण झालेले नाही. मी शाळा शिकलेलो नाही, अंगुठा छाप आहे. मला एक पत्रकार भेटले आणि बोलले आपण माणूस म्हणून जगू शकत नाही. ज्यात धर्म नाही तो ढोर आहे. खाणे, पिणे, झोपणे हे पशुचे लक्षण आहे. पशू करतो तेच माणूसही करतो. भारत हिंदू राष्ट्र झाले काय? आपले मंदिर फोडले ते पुन्हा झाले पाहिजे का? लव्ह जिहाद बंद झाले पाहिजे का? त्यावर कठोर कायदा झाला पाहिजे का? 88 हजार महर्षी लोक आहे. त्यामध्ये एक माझे गुरू आहे. त्यांनीच श्रीरामाला धनुष्य दिले होते, असे त्यांनी म्हटले.
धर्म म्हणजे काय हे समजून घेतले पाहिजे
ते पुढे म्हणाले की, रूममध्ये अगस्त ऋषी ब्रम्हा मुहूर्तावर प्रगट झाले होते. त्यांनी जे मला सांगितले ते तुम्हाला मी आज सांगणार आहे. जे मी तुम्हाला सांगतो आहे ते तुमच्या मुलांना सांगा, तुमच्या पुढील पिढ्यांना सांगू शकता. चांगले संस्कार केले नाही तर तुमच्या मृत्यूनंतर तुमचे पिंडदान करायला देखील कोणी उरणार नाही. कालीचरण महाराज वाईट बोलण्यासाठी प्रसिद्ध आहेत.धर्म म्हणजे काय हे समजून घेतले पाहिजे. ज्याची निष्ठा नसते त्याला कुठेच किंमत नसते.
जगातील सर्व सुंदर बाया भोगून घ्या
प्रत्येकाचे धर्माची व्याख्या वेगळी आहे. ईश्वराच्या प्राप्तीच सायन्स जीवनात धारण करणे म्हणजे धर्म होय. ईश्वराकडे सर्वाधिक श्रेष्ठ वस्तू मागितली पाहिजे. अनंत सुखानंद म्हणजेच ईश्वर सच्चिदानंद परमात्मा आहे. सगळ्या दुःखांचा पर्मनंट नाश होणार आहे. आपण शरीर नव्हे तर आत्मा आहे.असा आनंद पाहिजे की, ज्याने दुःख झाले नाही पाहिजे. आपण आत्मा आहोत, शरीर नाही. जगातील सर्व सुंदर बाया भोगून घ्या, सर्व भोगून घ्या, चांगल्या फुलाचा वास घ्या. नाकाचा सुगंध घ्या. हा सर्व आनंद संपून जाईल. मात्र ईश्वराचा आनंद संपणार नाही”, असं कालीचरण महाराज म्हटले आहे.
जे केले ते भोगावेच लागणार
अनंत ब्रम्हांडनायकात एकच धर्म आहे तो म्हणजे सनातनी हिंदू धर्म. त्यात सहा मार्ग आहेत. शैव, वैष्णव, शांत, जैन, बौद्ध, शीख हे सहा प्रमुख सत्यायाचे धर्म आहेत. ईश्वर उद्देश असला पाहिजे. कर्म फल सिद्ध पाहिजे. जे केले ते भोगावेच लागणार आहे. माफी ही ब्रम्हांडात नाहीच. ईश्वर आहे तो न्याय करतो, त्याला आस्तिक म्हणता. हे ब्रम्हांड ईश्वराची कृती आहे. ईश्वराला सुपर नॅचरल पॉवर म्हणता, असेही यावेळी कालीचरण महाराज म्हणाले.
आणखी वाचा