एक्स्प्लोर

Jharkhand Exit Poll | झारखंडमध्ये काँग्रेस आघाडीचं सरकार बनणार, एक्झिट पोलचा अंदाज

झारखंडमध्ये काँग्रेस, झारखंड मुक्ती मोर्चा आणि आरजेडी यांनी सोबत निवडणूक लढवली होती. राज्यात एकूण 81 जागांसाठी पाच टप्प्यात निवडणूक झाली होती. बहुमतासाठी कुठल्याही पक्षाला 41 चा आकडा पार करायचा आहे. या निवडणुकीचा निकाल 23 डिसेंबर रोजी लागणार आहे.

JharkhandExitPoll: झारखंडमध्ये निवडणुकीत काँग्रेस आघाडीचं सरकार बनणार असल्याचा अंदाज एक्झिट पोलच्या अंदाजानुसार व्यक्त केला आहे. एबीपी न्यूज सी व्होटर, टाइम्स नाऊ आणि इंडिया टुडे- एक्सिस माय इंडिया यांच्या सर्व्हेक्षणानुसार झारखंडमध्ये भाजप सरकार जाऊन काँग्रेस आघाडीचं सरकार येणार असल्याचा अंदाज व्यक्त केला आहे. झारखंडमध्ये काँग्रेस, झारखंड मुक्ती मोर्चा आणि आरजेडी यांनी सोबत निवडणूक लढवली होती. राज्यात एकूण  81 जागांसाठी पाच टप्प्यात निवडणूक झाली होती. बहुमतासाठी कुठल्याही पक्षाला 41 चा आकडा पार करायचा आहे. या निवडणुकीचा निकाल 23 डिसेंबर रोजी लागणार आहे. टाइम्स नाऊच्या सर्व्हेत भाजपला 28 जागा  टाइम्स नाऊच्या सर्व्हेनुसार झारखंडमध्ये काँग्रेस आघाडीला 44 जागा मिळू शकतात तर भाजपला  28 जागांवर विजय मिळू शकतो. इतरांना सहा जागा तर  झारखंड विकास मोर्चाला तीन जागा मिळू शकतात , असा अंदाज आहे. AJSU ला आपले खाते उघडता येणार नाही, असा अंदाज आहे. इंडिया टुडे-एक्सिस माय इंडिया इंडिया टुडे-एक्सिस माय इंडियाच्या एक्झिट पोलमध्ये देखील काँग्रेस आघाडीकडेच सत्तेची चावी राहणार असल्याचा अंदाज होईल.  इंडिया टुडे-एक्सिस माय इंडियाच्या अंदाजानुसार काँग्रेस आघाडीला 43 जागांवर विजय मिळणार असल्याचा अंदाज आहे. तर भाजपच्या खात्यात 27 जागा जाण्याचा अंदाज आहे. या अंदाजानुसार मागील निवडणुकीतील आकड्यांपेक्षा दहा जागांचे नुकसान होणार असल्याचा अंदाज आहे. एबीपी न्यूज आणि सी व्होटरच्या सर्वेनुसार कोणत्या पक्षाला किती जागा मिळणार  भाजप - 32 काँग्रेस+ - 35 झारखंड विकास मोर्चा- 03 ऑल झारखंड स्टुडंट युनियन - 05 इतर - 06 भाजप यावेळी राज्यात एकट्याने मैदानात उतरली आहे. सर्व्हेमध्ये भाजपला 32 जागा मिळण्याचा अंदाज आहे. तर काँग्रेसला दहा आणि काँग्रेसच्या सोबत असलेल्या झारखंड मुक्ती मोर्चाला 23 जागा मिळण्याचा अंदाज आहे. तसेच या आघाडीमध्येच असलेल्या  आरजेडीच्या खात्यात दोन जागा येण्याची शक्यता आहे. राज्यात काँग्रेस, जेएमएम आणि आरजेडी एकत्रित निवडणूक लढत आहेत. हेही वाचा - Jharkhand Exit Poll | झारखंडमध्ये भाजपला दणका तर काँग्रेस आघाडीला फायदा होण्याची शक्यता 2014 मध्ये कुणी किती जागा जिंकल्या होत्या ? 2014 च्या निवडणुकांमध्ये भाजपने ३७ जागा जिंकत  ऑल झारखंड स्टुडन्ट यूनियन (AJSU) सोबत सरकार स्थापन केलं होतं.  AJSU ने पाच जागा जिंकल्या होत्या. तर निवडणुकीनंतर झारखंड विकास मोर्चाच्या आठमधील सहा आमदारांनी भाजपला पाठिंबा दिला होता. तर झारखंड मुक्ती मोर्चा (जेएमएम) 19, काँग्रेस 6 आणि इतर पक्षांनी सहा जागा जिंकल्या होत्या. 2014 च्या तुलनेत भाजपला पाच जागांचे नुकसान होणार असल्याचे चित्र आहे. तर जेव्हीएमला देखील पाच जागांचे नुकसान होणार असल्याचा अंदाज आहे.  AJSU ला मात्र आपल्या पाच जागा मिळतील असा अंदाज आहे. तर मागील वेळी सहा जागा जिंकणाऱ्या काँग्रेसला यावेळी दहा जागा मिळतील असा अंदाज आहे. काँग्रेसला चार आणि जेएमएमला चार जागांचा फायदा होणार असल्याचा अंदाज आहे. कसा झाला आहे हा सर्व्हे? या सर्व्हेसाठी झारखंड विधानसभेच्या सर्व  81 जागांवर एक्झिट पोळ घेण्यात आला होता. या अंतर्गत 405 पोलिंग बूथवर अभ्यास सर्व्हे करण्यात आला होता. या सर्व्हेसाठी जवळपास  37,000 लोकांशी संवाद केला होता.

महत्त्वाच्या बातम्या

Congress : जनगणनेतील ओबीसींच्या कॉलमच्या मुद्यावर काँग्रेस आक्रमक, राहुल गांधींच्या उपस्थितीत बैठक, 300 जिल्हाप्रमुखांची दिल्लीत बैठक
जनगणनेत ओबीसी कॉलम नसल्याच्या मुद्यावर काँग्रेस आक्रमक, दिल्लीत बैठक बोलावली, राहुल गांधी उपस्थित राहणार
Navy Nagar Case : नेव्ही नगर प्रकरणाला धक्कादायक वळण; जवानाच्या पत्नी आणि मुलाचा घातपात, नंतर स्वत:लाही संपवलं
नेव्ही नगर प्रकरणाला धक्कादायक वळण; जवानाच्या पत्नी आणि मुलाचा घातपात, नंतर स्वत:लाही संपवलं
Tukaram Mundhe : तुकाराम मुंढेंच्या FDAला धक्का, मिठाईचं दुकान 34 दिवस बंद राहिल्याने उच्च न्यायालयाकडून पाच लाखांचा दंड
तुकाराम मुंढेंच्या FDAला धक्का, मिठाईचं दुकान 34 दिवस बंद राहिल्याने उच्च न्यायालयाकडून पाच लाखांचा दंड
Ranchi Protest : मोठी बातमी, JSSC CGL परीक्षा रद्द, हेमंत सोरेन सरकारचा निर्णय, देवेंद्र महतोंची उपोषण सोडण्याची घोषणा
JSSC CGL परीक्षा रद्द, हेमंत सोरेन सरकारचा मोठा निर्णय, देवेंद्र महतोंची उपोषण सोडण्याची घोषणा

व्हिडीओ

Nashik Potholes Special Report:नाशिकच्या खड्ड्यांवरुन राजकारण तापलं, राऊतांची टीका, महाजनांचा पलटवार
Railway Stations : रेल्वे स्टेशनवरचं पाणी 'ई-कोलाय'ची कहाणी Special Report
NET Exam Paper Leak :  NET ची वाट, फेरपरीक्षेचा घाट Special Report
Celebrity vs Politicians Cricket Match Sangli: सिद्धार्थ जाधवची फटकेबाजी, विशाल पाटलांची जबरदस्त फिल्डिंग
Sanjay Raut Nashik Speech : खड्डे वेळेत न बुजवल्यास पालिकेचे गेट तोडून आत घुसू! प्रशासनाला अल्टिमेटम

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Congress : जनगणनेतील ओबीसींच्या कॉलमच्या मुद्यावर काँग्रेस आक्रमक, राहुल गांधींच्या उपस्थितीत बैठक, 300 जिल्हाप्रमुखांची दिल्लीत बैठक
जनगणनेत ओबीसी कॉलम नसल्याच्या मुद्यावर काँग्रेस आक्रमक, दिल्लीत बैठक बोलावली, राहुल गांधी उपस्थित राहणार
Navy Nagar Case : नेव्ही नगर प्रकरणाला धक्कादायक वळण; जवानाच्या पत्नी आणि मुलाचा घातपात, नंतर स्वत:लाही संपवलं
नेव्ही नगर प्रकरणाला धक्कादायक वळण; जवानाच्या पत्नी आणि मुलाचा घातपात, नंतर स्वत:लाही संपवलं
Congress : मल्लिकार्जुन खरगेंच्या गोवा दौऱ्यापूर्वी काँग्रेसला मोठा धक्का; अनेक बूथ लेव्हल एजंट्सचे राजीनामे
मल्लिकार्जुन खरगेंच्या गोवा दौऱ्यापूर्वी काँग्रेसला मोठा धक्का; अनेक बूथ लेव्हल एजंट्सचे राजीनामे
Beed : फलटणमधील मृत डॉ. संपदा मुंडेंच्या कुटुंबाच्या मदतीसाठी साहित्यिकांचा पुढाकार, वडिलांच्या डोक्यावरील कर्ज फेडलं
फलटणमधील मृत डॉ. संपदा मुंडेंच्या कुटुंबाच्या मदतीसाठी साहित्यिकांचा पुढाकार, वडिलांच्या डोक्यावरील कर्ज फेडलं
Deepak Mhaskey Replace Amit Malviya : भाजपकडून सोशल मीडियाची जबाबदारी नव्या नेत्याकडे, अमित मालवीय यांच्या जागेवर निवड, कोण आहेत दीपक म्हस्के?
भाजपचा सोशल मीडिया छत्तीसगडचा नेता सांभाळणार, अमित मालवीय यांच्या जागी संधी, कोण आहेत दीपक म्हस्के?
Pankaja Munde : कोणीतरी बातमी दिली, ताई रिटायर होणार; काही रिटायर होत नाही, चांगली खमकी आहे : पंकजा मुंडे
‘दोन-चार लोकांना रिटायर्ड केल्यानंतर आपण रिटायर व्हायचं, आधी नाही', पंकजा मुंडेंचं ‘रिटायरमेंट’च्या चर्चेवर थेट भाष्य
Sanjiv Goenka: संजीव गोएंकांच्या संघाने अखेर पहिल्यांदाच विजेतेपद पटकावलं, लखनौ सुपर जायंट्सनं इतिहास रचला!
संजीव गोएंकांच्या संघाने अखेर पहिल्यांदाच विजेतेपद पटकावलं, लखनौ सुपर जायंट्सनं इतिहास रचला!
BJP : भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये मुस्लीम नेत्याची राष्ट्रीय उपाध्यक्षपदी निवड, नितीन नवीन यांच्या टीममधील नेता नेमका कोण? 
भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये मुस्लीम नेत्याची राष्ट्रीय उपाध्यक्षपदी निवड, कोणत्या राज्यातील नेत्याला संधी?
Embed widget