महाराष्ट्रातील पीडित कुटुंबीयांशी CM फडणवीसांचा फोनवरून संवाद; सर्वतोपरी मदतीचे आश्वासन, सर्व मृतकांचे पार्थिव आजच राज्यात येणार
पहलगाम येथील भ्याड दहशतवादी हल्ल्यात महाराष्ट्रातील एकूण 6 जणांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. दरम्यान या पीडित कुटुंबीयांशी CM देवेंद्र फडणवीसांचा फोनवरून संवाद साधत सर्वतोपरी मदतीचे आश्वासन दिलेय.

Jammu Kashmir Pahalgam Terror Attack: देशाचे नंदनवन समजल्या जाणाऱ्या काश्मीर मधील पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी भ्याड हल्ला केला आहे. यात अनेक निष्पाप पर्यटकांना आपले प्राण गमवावे लागले आहे. जम्मू काश्मीरच्या पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी (Pahalgam Terror Attack) पर्यटकांवर गोळीबार करत हल्ला केला. या हल्ल्यात आतापर्यंत 28 जणांचा (Terror Attack) मृत्यू झाला आहे. तर 13 हून अधिक लोक जखमी झाले आहेत. पुढे आलेल्या माहितीनुसार यात सर्वाधिक पर्यटक हे कर्नाटक आणि महाराष्ट्रातील असल्याची माहिती आहे.
दरम्यान आपल्या प्रियजणांना गामावल्यानंतर पडीत कुटुंबियांमध्ये एकच आक्रोश झाल्याचे बघायला मिळत आहे. तर आतापर्यंत एकट्या महाराष्ट्रातील 6 पर्यटकांचा दुर्दैवी अंत झाला आहे. या पार्श्वभूमीवर राज्याचे गृहमंत्री आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी (Devendra Fadnavis) महाराष्ट्रातील पीडित कुटुंबीयांशी संवाद साधत धीर दिला आहे. मुख्यमंत्र्यांनी स्वाता: फोनवरून संवाद साधत या कठीण प्रसंगी सरकार सर्वांच्या पाठीशी असून सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन ही त्यांनी दिले आहे. तर दुसरीकडे जम्मू काश्मीर येथे अडकलेल्या नागरिकांच्या सुखरूप सुटकेसाठी ही आम्ही सतत संपर्कात असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली आहे.
महाराष्ट्रातील एकूण 6 जणांचा मृत्यू; सर्व पार्थिव आजच मुंबई- पुण्यात येणार
दरम्यान, पहलगाम येथील भ्याड दहशतवादी हल्ल्यात महाराष्ट्रातील एकूण 6 जणांना आपले प्राण गमवावे लागले. यात संजय लेले आणि दिलीप डिसले यांचे पार्थिव श्रीनगर ते मुंबई या एअर इंडियाच्या विमानाने मुंबईत आणण्यात येणार आहे. हे विमान श्रीनगर येथून दुपारी 12.15 वाजता निघेल. पुण्यातील कौस्तुभ गणवते आणि संतोष जगदाळे यांचे पार्थिव हे सायंकाळी 6 वाजता निघेल आणि पुण्यात आणण्यात येईल. हेमंत जोशी आणि अतुल मोने यांचे पार्थिव घेऊन दुपारी 1.15 वाजता श्रीनगर येथून विमान निघेल आणि ते मुंबईत पोहोचेल. मुंबईत मंत्री आशिष शेलार आणि मंत्री मंगलप्रभात लोढा हे मुंबई विमानतळ येथे समन्वयासाठी असतील, तर पुणे विमानतळावर मंत्री माधुरीताई मिसाळ यांच्याकडे जबाबदारी सोपविण्यात आली आहे. तर मंत्री गिरीश महाजन हे श्रीनगरसाठी रवाना होत आहेत. इतरही पर्यटकांना परत आणण्यासाठी व्यवस्था करण्यात येत आहेत. अशी माहिती मुख्यमंत्री कार्यालयाकडून देण्यात आली आहे.
महाराष्ट्रातील मृतांची नावे-
1) अतुल मोने - डोंबिवली
2) संजय लेले - डोंबिवली
3) हेमंत जोशी- डोंबिवली
4) संतोष जगदाळे- पुणे
5) कौस्तुभ गणबोटे- पुणे
6) दिलीप देसले- पनवेल
जखमींची नावे-
1) एस बालचंद्रू
2) सुबोध पाटील
3) शोबीत पटेल
इतर महत्वाच्या बातम्या
























