एक्स्प्लोर

मोठी बातमी! मराठा आरक्षणाचे पडसाद पोलीस दलात, आरक्षणासाठी पोलीस कर्मचाऱ्याचा राजीनामा

Maratha Reservation : जालना पोलीस अधीक्षक कार्यालयात कार्यरत असलेल्या एका पोलीस कर्मचाऱ्याने राजीनामा दिला आहे. शिवाजी सटवाजी भागडे असे या पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे.

जालना : मराठा आरक्षणाचा (Maratha Reservation) मुद्दा तापला असून, याचे पडसाद वेगवेगळ्या ठिकाणी उमटताना पाहायला मिळत आहे. अनेक राजकीय नेत्यांनी राजीनामे देण्याचा निर्णय घेतला असतानाच आता,  मराठा आरक्षणाचे पडसाद पोलीस दलात देखील उमटताना पाहायला मिळत आहे. मराठा आरक्षणाचा मुद्दा लागत नसल्याने एका पोलीस कर्मचाऱ्याने थेट राजीनामा दिला असल्याचे समोर येत आहे. जालना पोलीस अधीक्षक कार्यालयात कार्यरत असलेल्या एका पोलीस कर्मचाऱ्याने राजीनामा दिला आहे. शिवाजी सटवाजी भागडे असे या पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे. 

भागडे यांनी जालना पोलीस अधीक्षक यांच्याकडे आपला राजीनामा देतांना म्हटले आहे की, "मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी संपुर्ण महाराष्ट्रात मराठा समाज उपोषण करीत आहे. तरी सुद्धा मराठा समाजाला आरक्षण देण्यात आलेले नाही. मी सुद्धा मराठा समाजाचा आहे, माझे सुद्धा समाजाप्रती काही तरी देणे लागते म्हणून मी पोलीस कॉन्स्टेबल पदाचा राजीनाम देत आहे. शासनाने लवकरात लवकर मराठा समाजाला आरक्षण द्यावे. माननीय पोलीस अधिक्षक साहेब यांनी माझा राजीनामा मंजुर करावा हि नम्र विनंती, असे भागडे यांनी आपल्या राजीनामा पत्रात लिहले आहे. 

कोण आहेत शिवाजी भागडे? 

मराठा आरक्षणासाठी पोलीस दलाच्या नोकरीचा राजीनामा देणारे शिवाजी भागडे हे जालना पोलीस दलात कार्यरत आहे. भागडे यांच्यावर अगोदरच गुन्हेगारी कारवायामध्ये सहभाग आणि मदत केल्याप्रकरणी बडतर्फ करण्याची कारवाई झाली होती. न्यायालयाच्या आदेशाने पुन्हा रुजू झाले. तसेच इतर काही कारवाईमध्ये चौकशी देखील  सुरू आहे. 

जरांगे यांच्या उपोषणाचा चौथा दिवस...

सरकारला देण्यात आलेली 40 दिवसांची मुदत संपल्याने मनोज जरांगे यांनी पुन्हा एकदा जालना येथील आंतरवाली सराटी गावात उपोषण सुरु केले आहे. त्यांच्या उपोषणाचा आजचा चौथा दिवस आहे. विशेष म्हणजे मागील तीन दिवसांपासून जरांगे यांनी पाण्याचा थेंब देखील घेतला नाही. त्यामुळे त्यांची प्रकृती खालावली आहे. तर, वैद्यकीय तपासणीसाठी आलेल्या पथकाला देखील जरांगे यांनी परत पाठवले असून, उपचार घेण्यास नकार दिला आहे. तसेच यापुढे राज्यातील गावागावात आमरण उपोषण करण्याचे आवाहन जरांगे यांनी मराठा समाजाला केले आहे. तर, कोणालाही काहीही झाल्यास यासाठी सरकार जबाबदार असणार असल्याचे जरांगे म्हणाले. त्यामुळे मराठा आरक्षणासाठी सुरु असलेले आंदोलन आणखी आक्रमक होण्याची शक्यता आहे. 

इतर महत्वाच्या बातम्या: 

मराठा आरक्षण! मराठवाड्यातील आत्महत्या सत्र सुरूच; धाराशिव जिल्ह्यात एकाने गळफास घेऊन संपवलं जीवन

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

निवडणुकीत जात-धर्म आणला जातो, सिल्लोडची पुढची विधानसभा लढणार नाही; अब्दुल सत्तारांची मोठी घोषणा
निवडणुकीत जात-धर्म आणला जातो, सिल्लोडची पुढची विधानसभा लढणार नाही; अब्दुल सत्तारांची मोठी घोषणा
Makar Sankranti 2025 Wishes : मकर संक्रांतीच्या प्रियजनांना द्या 'या' खास शुभेच्छा; वाढवा सणाचा गोडवा, पाठवा 'हे' हटके शुभेच्छा संदेश
मकर संक्रांतीच्या प्रियजनांना द्या 'या' खास शुभेच्छा; वाढवा सणाचा गोडवा, पाठवा 'हे' हटके शुभेच्छा संदेश
मोठी बातमी ! UGC-NET ची 15 जानेवारीला होणारी परीक्षा रद्द; लवकरच जाहीर होईल नवी तारीख
मोठी बातमी ! UGC-NET ची 15 जानेवारीला होणारी परीक्षा रद्द; लवकरच जाहीर होईल नवी तारीख
सीमा लढ्यातील ज्येष्ठ सत्याग्रही, साहित्यिक व पत्रकार कॉम्रेड कृष्णा मेणसे यांचे निधन
सीमा लढ्यातील ज्येष्ठ सत्याग्रही, साहित्यिक व पत्रकार कॉम्रेड कृष्णा मेणसे यांचे निधन
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 10 PM TOP Headlines 10 PM 13 January 2025Sanjay  Raut Meet Sharad Pawar | मिशन पालिका इलेक्शन! संजय राऊतांनी घेतली शरद पवारांची भेटCity Sixty | सिटी 60 बातम्यांचा वेगवान आढावा एका क्लिकवर सुपरफास्ट ABP MajhaSantosh Deshmukh Case | धनंजय देशमुखांचं 'शोले' स्टाईल आंदोलन, सरकारला अल्टिमेटम Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
निवडणुकीत जात-धर्म आणला जातो, सिल्लोडची पुढची विधानसभा लढणार नाही; अब्दुल सत्तारांची मोठी घोषणा
निवडणुकीत जात-धर्म आणला जातो, सिल्लोडची पुढची विधानसभा लढणार नाही; अब्दुल सत्तारांची मोठी घोषणा
Makar Sankranti 2025 Wishes : मकर संक्रांतीच्या प्रियजनांना द्या 'या' खास शुभेच्छा; वाढवा सणाचा गोडवा, पाठवा 'हे' हटके शुभेच्छा संदेश
मकर संक्रांतीच्या प्रियजनांना द्या 'या' खास शुभेच्छा; वाढवा सणाचा गोडवा, पाठवा 'हे' हटके शुभेच्छा संदेश
मोठी बातमी ! UGC-NET ची 15 जानेवारीला होणारी परीक्षा रद्द; लवकरच जाहीर होईल नवी तारीख
मोठी बातमी ! UGC-NET ची 15 जानेवारीला होणारी परीक्षा रद्द; लवकरच जाहीर होईल नवी तारीख
सीमा लढ्यातील ज्येष्ठ सत्याग्रही, साहित्यिक व पत्रकार कॉम्रेड कृष्णा मेणसे यांचे निधन
सीमा लढ्यातील ज्येष्ठ सत्याग्रही, साहित्यिक व पत्रकार कॉम्रेड कृष्णा मेणसे यांचे निधन
मंत्रालयातील ती काळी लम्बोर्गिनी कोणाची; रोहित पवारांनी नावासह कुंडलीच काढली, 700 कोटी, मुंडेंचाही संदर्भ
मंत्रालयातील ती काळी लम्बोर्गिनी कोणाची; रोहित पवारांनी नावासह कुंडलीच काढली, 700 कोटी, मुंडेंचाही संदर्भ
Education : शालेय शिक्षणामध्ये महाराष्ट्र पुन्हा नंबर 1 होणार; मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला विश्वास
शालेय शिक्षणामध्ये महाराष्ट्र पुन्हा नंबर 1 होणार; मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला विश्वास
नायलॉन मांजाने पतंग उडवाल तर तुमच्यावर येणार संक्रात; विक्रेत्यांसह पालक, मुलांवर थेट 'सदोष मनुष्यवधाच्या प्रयत्नाचा' गुन्हा
नायलॉन मांजाने पतंग उडवाल तर येणार संक्रात; विक्रेत्यांसह पालक, मुलांवर थेट 'सदोष मनुष्यवधाच्या प्रयत्नाचा' गुन्हा
OBC विद्यार्थ्यांसाठी पुण्यासह 5 शहरात उत्कृष्ठता केंद्र स्थापन होणार; मुख्यमंत्र्यांकडून महाज्योतीचा आढावा
OBC विद्यार्थ्यांसाठी पुण्यासह 5 शहरात उत्कृष्ठता केंद्र स्थापन होणार; मुख्यमंत्र्यांकडून महाज्योतीचा आढावा
Embed widget