Manoj Jarange : मनोज जरांगे नार्को टेस्टसाठी तयार, धनंजय मुंडे यांना खुलं आव्हान, अडीच कोटींची सुपारी कोण दिली?
Manoj Jarange Vs Dhananjay Munde : मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणाऱ्या मनोज जरांगे यांना मारण्यासाठी अडीच कोटींची सुपारी देण्यात आल्याच्या बातमीने खळबळ उडाली. या प्रकरणात दोघांना अटक करण्यात आली आहे.

जालना : माजी मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी दिलेले आव्हान मनोज जरांगे (Manoj Jarange) यांनी स्वीकारलं आहे. जरांगे यांना मारण्याची सुपारी दिली की नाही या प्रकरणी आरोपी, आपली आणि जरांगे यांची नार्को टेस्ट करा अशी मागणी धनंजय मुंडे यांनी केली. त्यावर मनोज जरांगे यांनी आपल्या शिष्टमंडळाच्या माध्यमातून जालना पोलीस अधीक्षकांची भेट घेतली आणि आपण नार्को टेस्टसाठी तयार असल्याचं सांगितलं. या प्रकरणातील सर्वांची नार्को टेस्ट आजच करा अशी मागणी त्यांच्या शिष्टमंडळाने केली आहे.
अंतरवाली सराटीचे सरपंच पांडुरंग तारक यांच्यासह मनोज जरांगे यांच्या सहकाऱ्यांनी जालना पोलीस अधीक्षकांना निवेदन दिले. मनोज जरांगे हे नार्को टेस्टसाठी तयार असून या प्रकरणातील सर्वांचीच नार्को टेस्ट करा अशी मागणी या निवेदनातून करण्यात आली आहे.
Conspiracy To Kill Manoj Jarange Patil : जरांगेंना मारण्यासाठी अडीच कोटींची सुपारी
मनोज जरांगे पाटलांच्या हत्येचा कट रचण्यात आल्याच्या बातम्या समोर आल्या आहेत. जरांगे पाटलांनी पत्रकार परिषद घेत आपल्या हत्येची सुपारी धनंजय मुंडेंनी दिली असा खळबळजनक आरोप केला होता. त्यानंतर धनंजय मुंडेंनीही याला उत्तर देत हे आरोप फेटाळले होते. त्यावर पुन्हा मनोज जरांगे पाटलांनी भाष्य केले. यावेळी त्यांनी धनंजय मुंडे आणि आरोपीची ऑडिओ क्लिप ऐकवली.
मनोज जरांगे पाटलांनी सुरुवातीला अटक करण्यात आलेल्या दोन आरोपींची ऑडिओ क्लिप ऐकवली. नंतर त्यांनी धनंजय मुंडे आणि आणखी एका आरोपीची ऑडिओ क्लिप ऐकवली. दरम्यान आपण सीबीआय चौकशीसाठी तयार असल्याचं जरांगेंनी म्हटलं होतं. तसंच नार्को टेस्टसाठी पहिला अर्ज करणार असल्याचा दावाही त्यांनी केला होता. त्यानुसार आता त्यांनी तसा अर्जही केला आहे.
Narco Test : नार्को टेस्ट करण्याची धनंजय मुंडे यांची मागणी
मनोज जरांगेंच्या या आरोपांनंतर धनंजय मुंडेंनीही पत्रकार परिषद घेत सर्व आरोप फेटाळले. तसंच या संपूर्ण प्रकरणाची सीबीआय चौकशी करा, अशी मागणी धनंजय मुंडेंनी मुख्यमंत्री फडणवीसांकडे केली. यासोबतच आरोपींसह आपली आणि मनोज जरांगेंची नार्को टेस्ट करण्याची मागणीही धनंजय मुंडेंनी केली.
Manoj Jarange News : हत्येच्या कटाप्रकरणी दोन आरोपींना अटक
मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटलांना यांना जीवे मारण्याचा कट रचल्याप्रकरणी, गोंदी पोलिसांनी गेवराईतून अमोल खुणे आणि विवेक उर्फ दादा गरुड या दोघांना अटक केली. कोर्टाने या दोन्ही आरोपींना 5 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. या दोन आरोपींपैकी अमोल खुणे हा मनोज जरांगेंचा समर्थक असल्याचं सांगितलं जातं आहे.
खुणे कुटुंबीयांनी जरांगेंनी केलेले आरोप फेटाळत, दारुच्या नशेत त्याच्या तोंडून हे बोलून घेतल्याचा दावा केला. मनोज जरांगेंचं स्टेटस ठेवणाऱ्या माझ्या पतीला अडकवलं जात असल्याचाही आरोप अमोल खुणेच्या पत्नीने केला.
Suresh Dhas Meets Manoj Jarange : सुरेश धस- मनोज जरांगे भेट
भाजप आमदार सुरेश धस यांनी यांनी मनोज जरांगे यांची अंतरवाली सराटीमध्ये भेट घेतली. संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर धनंजय मुंडे आणि सुरेश धस यांच्यात झालेल्या भेटीवर जरांगेंनी जोरदार टीका केली होती. या टीकेनंतर धस पहिल्यांदाच जरांगेंच्या भेटीसाठी दाखल झाले. मनोज जरांगेंनी धनंजय मुंडेंवर हत्येचा कट रचल्याचे आरोप केले. त्यानंतर काही वेळातच धस जरांगेंच्या भेटीसाठी दाखल झाले. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा रंगली.
ही बातमी वाचा:
























