(Source: ECI/ABP News/ABP Majha)
पाणी घ्या... पाणी घ्या... जरांगे साहेब पाणी घ्या! जरांगेंची प्रकृती खालावली, आंदोलक चिंतेत, पाणी घेण्याचा आग्रह
Maratha Reservation : मनोज जरांगे यांनी पाणी घ्यावे अशी विनंती आंदोलक करत आहे. त्यामुळे सध्या आंतरवालीत गोंधळाचे वातावरण असून, जोरदार घोषणाबाजी केली जात आहे.
जालना : मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) गेल्या सहा दिवसांपासून उपोषण करणाऱ्या मनोज जरांगे (Manoj Jarange) यांची प्रकृती खालावत आहे. त्यामुळे आंतरवाली सराटीमध्ये सध्या मोठ्या प्रमाणात आंदोलकांनी गर्दी केली आहे. तसेच, मनोज जरांगे यांनी पाणी घ्यावे अशी विनंती आंदोलक करत आहे. त्यामुळे सध्या आंतरवालीत गोंधळाचे वातावरण असून, जोरदार घोषणाबाजी केली जात आहे. पाणी घ्या...पाणी घ्या...जरांगे साहेब पाणी घ्या...अशी जोरदार घोषणाबाजी यावेळी पाहायला मिळत आहे.
मनोज जरांगे यांच्या उपोषणाचा आजचा सहावा दिवस आहे. मागील सहा दिवसांत त्यांनी अन्नाचा कण देखील घेतला नाही. तसेच, त्यांनी पाणी घेणं देखील बंद केले आहे. त्यामुळे त्यांची प्रकृती खालावली आहे. दरम्यान, आज आंतरवाली गावात मोठ्या प्रमाणात आंदोलक दाखल झाले आहे. तसेच, जरांगे यांनी पाणी घ्यावे अशी मागणी आंदोलक करत आहे. यासाठी जोरदार घोषणाबाजी देखील सुरु आहे. पाणी घ्या...पाणी घ्या...जरांगे साहेब पाणी घ्या...अशी जोरदार घोषणाबाजी यावेळी पाहायला मिळत आहे. तर, अनेकजण या ठिकाणी भावूक झाले असल्याचे पाहायला मिळत आहे. काही जणांच्या डोळ्यात अश्रू देखील पाहायला मिळाले. त्यामुळे आंतरवालीत सध्या मोठी गर्दी दिसून येत आहे.
जरांगे यांची प्रकृती खालावली...
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी उपोषण करत असलेल्या मनोज जरांगे यांच्या उपोषणाचा आजचा सहावा दिवस आहे. दुसऱ्या टप्प्यात त्यांचे हे उपोषण सुरु आहे. मात्र, मागील सहा दिवसांत त्यांनी अन्न-पाण्याचा त्याग केला आहे. विशेष म्हणजे मागणीवरून दोन-तीन वेळा त्यांनी पाण्याचा घोट घेतला. पण, आता त्यांनी पाणी घेणार नसल्याचे म्हटले आहे. सोबतच त्यांनी उपचार घेण्यासाठी देखील नकार दिला आहे. त्यामुळे त्यांची प्रकृती दिवसेंदिवस बिघडत आहे.
जरांगेंच्या शिष्टमंडळाला चर्चेसाठी उद्या राज्य सरकारकडून निमंत्रण...
मनोज जरांगे पाटील यांच्या शिष्टमंडळातील काही जणांनी मुंबईत येऊन राज्य सरकारशी चर्चा करावी यासाठी आम्ही त्यांना कळवला आहे. मनोज जरांगे यांच्याशी आम्ही उपोषणाला बसण्याआधी सुद्धा चर्चा केली होती. त्यानंतर सुद्धा आम्ही त्यांना उपोषण करू नका अशी विनंती केली. त्यांच्याकडे जर काही मुद्दे या सगळ्या संदर्भात असतील तर त्यांनी आम्हाला ते मुद्दे चर्चेत सांगावेत. आज निर्णय झाले त्या संदर्भात आम्ही सखोल चर्चा शिष्टमंडळाशी करणार आहे.
आमदाराच्या घरावर तोडफोड होणं जाळपोळ होणं हे योग्य नाही, हे आंदोलन भरकटते आहे. यापूर्वी सुद्धा अशा प्रकारे मराठा आरक्षण भरकटलं होतं, ते होऊ नयेत. तर, कायद्यात टिकणारा आरक्षण आम्ही देणार आहोत, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले आहेत.
इतर महत्वाच्या बातम्या: