एक्स्प्लोर

विखेंच्या भेटीनंतर मनोज जरांगेंचा फडणवीसांना टोला, 'त्यांचा मालकच भरकटलाय, आता चर्चेचा काय उपयोग?'

Manoj Jarange Patil on Devendra Fadnavis : महायुतीचा सुपडा साफ करणार, असा इशारा दिल्यानंतर राधाकृष्ण विखे पाटील यांनी मनोज जरांगेंची अंतरवाली सराटीत भेट घेतली होती.

जालना : महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीचे (Maharashtra Assembly Elections 2024) बिगुल वाजल्यानंतर मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी पत्रकार परिषद घेत महायुतीचा (Mahayuti) सुपडा साफ करणार, असा इशारा दिला आहे. यानंतर राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) यांनी अंतरवाली सराटीत काल मध्यरात्री मनोज जरांगेंची भेट घेतली. या भेटीनंतर मनोज जरांगे पाटील यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर निशाणा साधलाय.  

मनोज जरांगे म्हणाले की, इच्छुक उमेदवार यांच्या सोबत चर्चा आहे. मुलाखत होणार नाही. ज्यावेळी पाडायचं की लढायच हे ठरेल, तेव्हा बाकीच्या बाबी ठरतील. आज फक्त चर्चा होणे आवश्यक आहे. इथे येणारे इच्छुक उद्याचे भविष्य आहेत. माझ्या समाजासाठी आजची चर्चा होणे आवश्यक असल्याचे त्यांनी म्हटले आहे. तर 20 तारखेला इथे 9 वाजल्यापासून 4 पर्यंत बैठक होईल. 20 तारखेला संयमात या. 20 तारखेची बैठक व्यापक आणि निर्णायक आहे. आता कोणाला शक्ती दाखवायची गरज नाही, असेही मनोज जरांगे म्हणाले. 

आपल्याला सर्वांना मिळून काम करायचंय 

मराठा आरक्षण मागतो म्हणून, मी जातियवादी नाही. जात आम्हाला कधी शिवली नाही. कारण आम्हाला  शेतकरी, मुस्लिम, गोरगरीब ओबीसींचे, अलुतेदार बलुतेदार यांचे सर्वांचे काम करायचे आहे. हे राज्य कोणा एका जातीचे नाही, आपल्याला सर्वांना मिळून काम करायचे आहे. सर्व समाज आपल्यासोबत असल्याचेही मनोज जरांगे पाटील यांनी यावेळी सांगितले. 

मनोज जरांगेंचा देवेंद्र फडणवीसांवर निशाणा

विखे पाटील यांनी मनोज जरांगे यांची मध्यरात्री भेट घेतली. याबाबत विचारले असता मनोज जरांगे म्हणाले की, कशाच काय, चर्चा करून काय उपयोग, सरकार नाही येऊन तरी काय करायचं, निर्णय घेता ही येत नाही. ज्या वेळी करायचं होतं तेव्हा केलं नाही, त्यांना दोष देऊन काय उपयोग? त्यांचा मालकच (फडणवीस) भरकटला आहे, असे म्हणत त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला. आता मैदान वेगळं आहे, ते जिंकायचं की पाडायच ठरेल. नारायणगडाची सभा झाल्यापासून इच्छुक उमेदवार वाढल्याचे वाटत आहे. एससी, एसटीचे उमेदवार देखील आमच्याकडे येत आहेत. 20 तारखेला जाहीर झाल्यानंतरही एससी एसटीचे उमेदवार दिसतील. जेव्हा ठरेल जो कोणत्याही पक्षाचा असेल तो आमच्या विचाराचा असेल तर मराठे त्याच्यामागे त्याच्या मागे उभे राहणार आहेत. 'माझे ऐक नाहीतर खतम करू' अशी जी रचना सूडबुद्धीची चालू आहे. त्यांचा शेवट राजकीय अंतात असेल, असा इशारा देखील मनोज जरांगेंनी दिला आहे. 

आणखी वाचा

मनोज जरांगेंच्या इशाऱ्यानंतर भाजपचा नेता उत्तररात्री पावणेदोनला अंतरवाली सराटीत, गुप्त खलबतं, भाजपकडून मनधरणीच्या हालचाली?

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

लॉरेन्स बिश्नोई गँगस्टरचा हाफ एन्काऊंटर; हत्याप्रकरणातील आरोपीला पोलिसांकडून अटक
लॉरेन्स बिश्नोई गँगस्टरचा हाफ एन्काऊंटर; हत्याप्रकरणातील आरोपीला पोलिसांकडून अटक
Suresh Halvankar : निष्ठेला हाच का न्याय? इचलकरंजीत भाजप प्रदेश उपाध्यक्ष सुरेश हाळवणकर समर्थकांची खदखद समोर! थेट वाजपेयींच्या 'त्या' वक्तव्याची करुन दिली आठवण
निष्ठेला हाच का न्याय? इचलकरंजीत भाजप प्रदेश उपाध्यक्ष सुरेश हाळवणकर समर्थकांची खदखद समोर! थेट वाजपेयींच्या 'त्या' वक्तव्याची करुन दिली आठवण
Sameer Bhujbal : नांदगावच्या जागेवरून महायुतीत खडाजंगी? समीर भुजबळांनी विधानसभेसाठी ठोकला शड्डू, शिंदे गट माघार घेणार?
नांदगावच्या जागेवरून महायुतीत खडाजंगी? समीर भुजबळांनी विधानसभेसाठी ठोकला शड्डू, शिंदे गट माघार घेणार?
Varun Sardesai: झिशान सिद्दीकींविरोधात ठाकरे गटाचा उमेदवार ठरला, वांद्रे पूर्व विधानसभेतून वरुण सरदेसाईंच्या उमेदवारीची घोषणा
झिशान सिद्दीकींविरोधात ठाकरे गटाचा उमेदवार ठरला, वांद्रे पूर्व विधानसभेतून वरुण सरदेसाईंच्या उमेदवारीची घोषणा
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Top 100 : टॉप 100 : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा : 2 PM : 17 ऑक्टोबर 2024 : ABP MajhaManoj Jarange Antarwali : अंतरवालीत शेकडो इच्छुक जरांगेंच्या भेटीलाMNS Vidhansabha Election : ठाण्यात मनसे चारही मतदारसंघात निवडणूक लढवणारTop 25 : टॉप 25 न्यूज : 2 PM : 17 ऑक्टोबर  2024 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
लॉरेन्स बिश्नोई गँगस्टरचा हाफ एन्काऊंटर; हत्याप्रकरणातील आरोपीला पोलिसांकडून अटक
लॉरेन्स बिश्नोई गँगस्टरचा हाफ एन्काऊंटर; हत्याप्रकरणातील आरोपीला पोलिसांकडून अटक
Suresh Halvankar : निष्ठेला हाच का न्याय? इचलकरंजीत भाजप प्रदेश उपाध्यक्ष सुरेश हाळवणकर समर्थकांची खदखद समोर! थेट वाजपेयींच्या 'त्या' वक्तव्याची करुन दिली आठवण
निष्ठेला हाच का न्याय? इचलकरंजीत भाजप प्रदेश उपाध्यक्ष सुरेश हाळवणकर समर्थकांची खदखद समोर! थेट वाजपेयींच्या 'त्या' वक्तव्याची करुन दिली आठवण
Sameer Bhujbal : नांदगावच्या जागेवरून महायुतीत खडाजंगी? समीर भुजबळांनी विधानसभेसाठी ठोकला शड्डू, शिंदे गट माघार घेणार?
नांदगावच्या जागेवरून महायुतीत खडाजंगी? समीर भुजबळांनी विधानसभेसाठी ठोकला शड्डू, शिंदे गट माघार घेणार?
Varun Sardesai: झिशान सिद्दीकींविरोधात ठाकरे गटाचा उमेदवार ठरला, वांद्रे पूर्व विधानसभेतून वरुण सरदेसाईंच्या उमेदवारीची घोषणा
झिशान सिद्दीकींविरोधात ठाकरे गटाचा उमेदवार ठरला, वांद्रे पूर्व विधानसभेतून वरुण सरदेसाईंच्या उमेदवारीची घोषणा
Bank of Baroda : बँक ऑफ बडोदाचा दिवाळीनिमित्त धमाका, विशेष ठेव योजना जाहीर, आकर्षक व्याज दराची घोषणा
बँक ऑफ बडोदाचा दिवाळीनिमित्त धमाका, विशेष ठेव योजना जाहीर, आकर्षक व्याज दराची घोषणा
Salman Khan Security : सलमान खानला Y+ दर्जाची सुरक्षा, सुपरस्टारासाठी सरकार किती कोटी खर्च करणार?
सलमान खानला Y+ दर्जाची सुरक्षा, सुपरस्टारासाठी सरकार किती कोटी खर्च करणार?
Parli vidhan sabha: धनंजय मुंडेविरोधात शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, परळी मतदारसंघात भगवान सेनेचे फुलचंद कराड रिंगणात?
धनंजय मुंडेविरोधात शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, परळी मतदारसंघात भगवान सेनेचे फुलचंद कराड रिंगणात?
24 तास अजित पवारांसोबत म्हणणाऱ्या दीपक मानकरांना रुपाली चाकणकरांचे सडेतोड प्रत्युत्तर
24 तास अजित पवारांसोबत म्हणणाऱ्या दीपक मानकरांना रुपाली चाकणकरांचे सडेतोड प्रत्युत्तर
Embed widget