Jalna: रात्रभर नाचणाऱ्यांना पोलीस अडवणार नाही; रावसाहेब दानवेंचं बेजबाबदार वक्तव्य
Raosaheb Danve: शुक्रवारी रात्री जालना येथे गणपती विसर्जनाच्या कार्यक्रमात रावसाहेब दानवे यांनी हे विधान केले आहे.
Jalna News: राजकीय नेत्यांनी बेजबाबदार विधान करणं महाराष्ट्रासाठी काही नवीन नाही. आता असेच काही विधान रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी केले आहे. पोलिसांचे काम बंधन घालणं आहे. मात्र एखाद्याला रात्रभर उड्या मारायचे असतील तर, पोलीस त्याला काहीही करणार नाहीत, अडवणार नाहीत असे विधान रावसाहेब दानवे यांनी केली आहे. शुक्रवारी रात्री जालना येथे गणपती विसर्जनाच्या कार्यक्रमात रावसाहेब दानवे यांनी हे विधान केले आहे.
कालपासून सुरू झालेल्या गणपती विसर्जनाच्या मिरवणुका आता कुठेतरी संपल्या आहे. यावेळी पोलिसांकडून गेली 24 तास खडा पाहारा देत कायदा सुव्यवस्था कायम ठेवण्याचा प्रयत्न सुरु आहे. मात्र दुसरीकडे जबाबदार लोकप्रतिनिधींच्या बेजबाबदार वक्तव्यामुळे कायदा सुव्यस्थेच नागरिक खरच पालन करतील का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. कारण केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी चक्क कायदा तोडणाऱ्याला पोलीस काहीच करणार नसल्याचे विधान केले आहे.
काय म्हणाले दानवे...
जालना येथे गणेश विसर्जनाच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमाच्या ठिकाणी बोलतांना दानवे म्हणाले की, आपली सर्वांची इच्छा आहे की,रात्रभर आम्हाला नाचू द्या, उड्या मारू द्या....पोलिसांनी कायद्याप्रमाणे तुम्हाला बंधन घातले आहे. कायदा पाळला पाहिजे. मात्र एखाद्याला रात्रभर उड्या मारायच्या असतील तर पोलीस काहीही करणार नाही, असे विधान दानवे यांनी केले आहे. गणपती आणि गणपतीनंतरचे सर्वच सण हे मुक्त वातावरणात साजरे करता यावे अशाप्रकारचे आदेश मुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री यांनी दिले असल्याचे रावसाहेब दानवे म्हणाले आहेत. त्यामुळे दानवे यांच्या या विधानावरून त्यांच्यावर विरोधकांकडून टीका होण्याची शक्यता आहे.
जालन्याची वेगळी ओळख
आपण सर्वांनी मागील दहा दिवस गणेशोत्सव साजरा केला. या काळात जालना शहराने आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. या दहा दिवसांच्या काळात कोणतेही गालबोट लागू दिले नाही. मी राज्यातील अनेक भागात फिरलो सर्वच ठिकाणी असाच जल्लोष पाहायला मिळाले. तर यापेक्षा अधिक उत्साह पुढच्यावर्षी आपण करणार आहोत.
महत्वाच्या बातम्या...
Jalna Mantha Bank : जालन्यातील 'या' बँकेत 12 कोटी 18 लाखांचा अपहार; 14 जणांवर गुन्हा