![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
Chhagan Bhujbal: अब जंग लगी तलवार पर धार लगानी होगी, कुछ लोग अपनी औकाद भुल गए है, शायद अपनी याद दिलानी होगी; छगन भुजबळांचं घणाघाती भाषण
Maharashtra Politics: सरकार कुणावरही अन्याय करणार नाही. लोकशक्ती एकत्र आली तर धनशक्तीचा पराभव होईल. मनोज जरांगे काय बोलते, हे त्यांना सुद्धा कळत नाही, असे छगन भुजबळ यांनी म्हटले.
![Chhagan Bhujbal: अब जंग लगी तलवार पर धार लगानी होगी, कुछ लोग अपनी औकाद भुल गए है, शायद अपनी याद दिलानी होगी; छगन भुजबळांचं घणाघाती भाषण Chhagan Bhujbal fiery speech at wadigodri Jalna in front of Laxman Hake obc reservation agitators Chhagan Bhujbal: अब जंग लगी तलवार पर धार लगानी होगी, कुछ लोग अपनी औकाद भुल गए है, शायद अपनी याद दिलानी होगी; छगन भुजबळांचं घणाघाती भाषण](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/22/5dca2de04351257a47c24bdfd20457771719053191784954_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
जालना: आपण सगळे एकत्र राहिलो तर ओबीसी समाजाचे आरक्षण वाचेल. आपल्या ओबीसी आरक्षणाच्या लढ्यात अनेक सहकारी आपले हात बळकट करण्यासाठी सज्ज आहेत. आम्ही ओबीसी (OBC Reservation) शांत बसलो आहोत याचा अर्थ आम्ही गरीब आहोत, असा नाही. तुम्ही आम्हाला कुठेही न्यायला आम्ही जनावर नाही, अशा शब्दांत छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी ओबीसी आरक्षणाची बाजू ठामपणे मांडली. ते शनिवारी जालन्यातली वडगोद्री येथे लक्ष्मण हाके यांच्या उपोषणस्थळी व्यासपीठावरुन बोलत होते.
यावेळी छगन भुजबळ यांनी मनोज जरांगे पाटील यांच्यासह ओबीसी आरक्षणात घुसखोरी करणाऱ्यांना आक्रमक भाषेत प्रत्युत्तर दिले. छगन भुजबळ यांनी वडीगोद्री येथील आपल्या तासभराच्या घणाघाती भाषणात विरोधकांचा समाचार घेतला. त्यांनी आपल्या नेहमीच्या शैलीत शेरोशायरी करत ओबीसी आंदोलकांमध्ये ऊर्जा फुंकली. या भाषणात त्यांनी म्हटले की, आता एकच सांगतो. अब जंग लगी तलवार पर अब धार लगानी होगी, कुछ लोग अपनी औकाद भुल गए, शायद अपनी याद उनको दिलानी होगी, असे भुजबळ यांनी म्हणताच ओबीसी आंदोलकांनी एकच गलका केला. काही लोकं आपली औकात विसरलेत. औकातीमध्ये राहा बेट्याहो, आम्ही शांत बसलो आहोत, याचा अर्थ आम्ही गरीब नाही, असे छगन भुजबळ यांनी ठणकावून सांगितले.
आम्ही यापूर्वीच सांगितलं आहे, आम्हाला कोणाशीही लढाई करायची नाही. पण तुम्ही सांगाल तेच करायचं, ही दादागिरी थांबवा. लक्षात ठेवा कोणी म्हणेल, आम्ही ओनर आहोत. सरकारमध्ये आणि विधानसभेत आम्ही जास्त आहोत, म्हणजे यांना दाबू, असे काहींना वाट त असेल. पण संबंधितांनी हा गैरसमज मनातून काढून टाकावा, असा इशारा छगन भुजबळ यांनी दिला.
तर ओबीसी लोकसभा आणि विधानसभेतही आरक्षण मागतील, भुजबळांचा इशारा
छगन भुजबळ यांनी बीड लोकसभेतील पंकजा मुंडे यांच्या पराभवाबाबत भाष्य केले. पंकजाताईंनी समाजात तेढ नको म्हणून कोणाला विरोध केला नाही. तरीही काही लोकांनी त्यांना विरोध केला. सगळ्यांनी मिळून त्यांच्या पराभवाचे कारस्थान रचले, असा आरोप भुजबळ यांनी केला. आम्ही लोकसभेवर जायचे नाही, विधानसभेवर जायचे नाही. अधिकारक्षेत्रात तुमचे 10-20 जण आणि आमचा एकही नको. असंच जर चालू राहिलं तर विधानसभा आणि लोकसभेतही आम्हाला आरक्षण हवं, अशी मागणी करावी लागेल. लढाई अजून संपलेली नाही, तर ती सुरु झाली आहे. त्यामुळे आता घरी बसून चालणार नाही. आपल्या हक्कांसाठी वणवा पेटवावा लागेल, असे छगन भुजबळ यांनी सांगितले.
भुजबळांची जरांगेंवर टीका
आपल्या भाषणात छगन भुजबळ यांनी मनोज जरांगे पाटील यांच्यावर शेलक्या भाषेत टीका केली. ते माकड म्हणतंय भुजबळांना जनावराचं इंजेक्शन द्या. त्याला काय टीका करायची ते कळत नाही. यापुढे मी त्याला काही बोलणार नाही. आधी लक्ष्मण हाकेशी चर्चा कर मग माझ्याकडे ये, असे मी म्हणेन, असे भुजबळ यांनी म्हटले.
राज्य सरकारच्या आश्वासनानंतर लक्ष्मण हाकेंचे उपोषण स्थगित
गेल्या दहा दिवसांपासून वडगोद्री येथे लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे यांचे आमरण उपोषण सुरु होते. राज्य सरकारच्या आश्वासनानंतर लक्ष्मण हाके यांनी आपले उपोषण स्थगित केले. ओबीसी आरक्षणासंबंधी लक्ष्मण हाके यांच्या मागणीवर राज्य सरकार सकारात्मक असल्याचं आश्वासन मिळाल्यानंतर त्यांनी हे आंदोलन मागे घेतलं आहे.
आणखी वाचा
'जमाना जानता है, हम किसी के बाप से नहीं डरते'; ओबीसींच्या उपोषणस्थळी भुजबळांची तुफान फटकेबाजी
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)