एक्स्प्लोर

Jalna News : सणासुदीच्या पार्श्वभूमीवर जालन्यात उद्यापासून जमावबंदी; अप्पर जिल्हाधिकाऱ्यांनी काढले आदेश

Jalna News : संपूर्ण जिल्ह्यासाठी 19 जुनच्या 6 वाजेपासून ते 3 जुलै रोजीचे 12 वाजेपर्यंत जिल्ह्यात जमावबंदी असणार आहे.

Jalna News : गेल्या काही दिवसांपासून राज्यातील हिंसाचाराच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर आगामी सणासुदीच्या काळात जिल्ह्यातील कायदा सुव्यवस्था कायम राहण्यासाठी जिल्हा प्रशासनाने उद्यापासून जालना जिल्ह्यात (Jalna District) जमावबंदी (Prohibition) लागू केली आहे. त्यामुळे या आदेशानुसार संपूर्ण जिल्ह्यासाठी 19 जून 2023 रोजीचे 6 वाजेपासून ते 3 जुलै रोजीचे 12 वाजेपर्यंत जिल्ह्यात जमावबंदी असणार आहे. त्यामुळे नागरिकांना सार्वजनिक ठिकाणी एकाचवेळी पाच लोकांना एकत्र जमता येणार नाही. 
 
29 जून रोजी मु‍स्लिम बांधवांच्या बकरी ईद उत्सव तसेच हिंदू धर्मियांचा आषाढी एकादशी, आनंदस्वामी यात्रा व 3 जुलै रोजी गुरुपौर्णिमा असल्याने विविध मिरवणुका व विविध कार्यक्रम आयोजित करण्यात येतात. त्यामुळे महाराष्ट्र पोलिस अधिनियम 1951 चे कलम 37 (1) अन्वये प्रतिबंध करण्यात आलेला आहे, असे आदेश अप्पर जिल्हादंडाधिकारी केशव नेटके यांनी निर्गमित केले आहेत.

अप्पर जिल्हादंडाधिकारी यांनी काढलेल्या आदेशात म्हटले आहे की, सध्या महाराष्ट्रात राजकीयदृष्ट्या सत्ताधारी आणि विरोधकात एकमेकांविरुध्द विविध कारणावरुन आरोप प्रत्यारोप सुरु आहेत. तसेच मराठा आरक्षण मिळावे या मागणीसाठी आणि शेतकऱ्यांच्य विविध मागण्यांसाठी विविध संघटनांकडून आत्मदहन, उपोषण, धरणे, सध्या महाराष्ट्रात राजकीयदृष्ट्या सत्ताधारी व विरोधकात एकमेकांविरुध्द विविध कारणावरून आरोप प्रत्यारोप मोर्चे, निदर्शने, रास्तारोको इत्यादी सर्व प्रकारची आंदोलनात्मक कार्यक्रम घेण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37 (1) अन्वये अधिकाराचा वापर करुन जिल्ह्यात जमावबंदी आदेश लागू करण्यात आले आहे. 

आदेशात काय म्हटले आहे? 

  • शासकीय कर्तव्य पार पाडणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या व्यतिरिक्त इतर कोणतीही व्यक्ती सार्वजनिक ठिकाणी किंवा त्या आसपास शस्त्रे, लाठ्या, सोटे, बंदुके, तलवारी, भाले, चाकू व इतर शरीरास इजा अथवा अपाय करणाऱ्या वस्तु जवळ बाळगणार नाही. 
  • तीक्ष्ण पदार्थ अथवा स्फोटके सहज हाताळता येतील अशी घातक वस्तु जवळ बाळगणार नाही.
  • दगड किंवा इतर उपकरणे किंवा प्रवर्तक शस्त्रे गोळा करुन ठेवणार नाही किंवा जवळ बाळगणार नाही.
  • व्यक्तींच्या किंवा समुहाच्या भावना जाणूनबुजून दुखविण्याचे उद्देशाने असभ्यतेने भाषण म्हणणार नाही, वाद्य वाजविणार नाही आणि गाणे म्हणणार नाही.
  • व्यक्तींचे किंवा शवाचे किंवा त्याच्या प्रतिकृतीचे प्रदर्शन करणार नाही.
  • आवेषी भाषण, अंगविक्षेप, विडंबनापर नकला करणार नाही आणि सभ्यता किंवा नितिमत्ता यास बाधा येईल किंवा ज्यामुळे राज्याची सुरक्षितता धोक्यात येईल किंवा अराजक माजेल अशी चित्रे, निशाणी, घोषणापत्रे किंवा कोणतीही वस्तु बाळगणार नाही.
  • हा आदेश संपूर्ण जिल्ह्यासाठी19 जुन 2023 रोजीचे 6 वाजेपासून ते 3 जुलै रोजीचे 12 वाजेपर्यंत अंमलात राहील. असे आदेशात म्हटले आहे.

इतर महत्वाच्या बातम्या: 

Jalna News : दारू विक्रेत्यांवर दोनपेक्षा अधिक गुन्हे दाखल असतील तर कारागृहात रवानगी होणार; 'हातभट्टीमुक्त गाव मोहीम'

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

संघाच्या मुख्यालयात महायुतीच्या आमदारांचं बौद्धिक, कोण-कोण पोहचलं? शिंदेंच्या आमदारांना रेशीम बाग भलतंच आवडलं
संघाच्या मुख्यालयात महायुतीच्या आमदारांचं बौद्धिक, कोण-कोण पोहचलं? शिंदेंच्या आमदारांना रेशीम बाग भलतंच आवडलं
अकोला पश्चिमच्या काँग्रेस आमदाराच्या अडचणी वाढणार? दाऊद, हसीना पारकरशी संबंध असल्याच्या महिलेच्या दाव्यावरुन तक्रार दाखल
दाऊद, हसीना पारकरशी काँग्रेस आमदार साजिद खान पठाण यांचे संबंध? पोलिसांत तक्रार दाखल
Jitendra Awhad : कमीत कमी 10 मर्डर दाखवतो, गँग्ज ऑफ वासेपूर पेक्षा भयंकर स्थिती, संतोष देशमुख हत्या प्रकरणी जितेंद्र आव्हाड आक्रमक
कमीत कमी 10 मर्डर दाखवतो, गँग्ज ऑफ वासेपूर पेक्षा भयंकर स्थिती, आका कोण तुम्हाला माहिती नाही : जितेंद्र आव्हाड
MSRTC : एसटीची भाडेवाढ होणार, महामंडळाकडून 14.95 टक्के भाडेवाढ करण्याचा प्रस्ताव, राज्य सरकार अंतिम निर्णय घेणार
एसटीची भाडेवाढ होणार, महामंडळाकडून 14.95 टक्के भाडेवाढ करण्याचा प्रस्ताव, राज्य सरकार अंतिम निर्णय घेणार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines :  8 AM : 19 डिसेंबर 2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सMajha Gaon Majha Jilha : माझं गाव माझा जिल्हा: 8 AM :  19 डिसेंबर 2024 : ABP MajhaTOP 70 : सकाळच्या 7 च्या 70 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 70 न्यूज :19 डिसेंबर 2024 : ABP MajhaGateway of India Mumbai : मुंबई- एलिफंटाकडे निघालेली प्रवासी बोट बुडाली, मृतांचा आकडा 13वर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
संघाच्या मुख्यालयात महायुतीच्या आमदारांचं बौद्धिक, कोण-कोण पोहचलं? शिंदेंच्या आमदारांना रेशीम बाग भलतंच आवडलं
संघाच्या मुख्यालयात महायुतीच्या आमदारांचं बौद्धिक, कोण-कोण पोहचलं? शिंदेंच्या आमदारांना रेशीम बाग भलतंच आवडलं
अकोला पश्चिमच्या काँग्रेस आमदाराच्या अडचणी वाढणार? दाऊद, हसीना पारकरशी संबंध असल्याच्या महिलेच्या दाव्यावरुन तक्रार दाखल
दाऊद, हसीना पारकरशी काँग्रेस आमदार साजिद खान पठाण यांचे संबंध? पोलिसांत तक्रार दाखल
Jitendra Awhad : कमीत कमी 10 मर्डर दाखवतो, गँग्ज ऑफ वासेपूर पेक्षा भयंकर स्थिती, संतोष देशमुख हत्या प्रकरणी जितेंद्र आव्हाड आक्रमक
कमीत कमी 10 मर्डर दाखवतो, गँग्ज ऑफ वासेपूर पेक्षा भयंकर स्थिती, आका कोण तुम्हाला माहिती नाही : जितेंद्र आव्हाड
MSRTC : एसटीची भाडेवाढ होणार, महामंडळाकडून 14.95 टक्के भाडेवाढ करण्याचा प्रस्ताव, राज्य सरकार अंतिम निर्णय घेणार
एसटीची भाडेवाढ होणार, महामंडळाकडून 14.95 टक्के भाडेवाढ करण्याचा प्रस्ताव, राज्य सरकार अंतिम निर्णय घेणार
Amit Shah : आंबेडकरांबद्दल केलेल्या वक्तव्याचा विपर्यास, काँग्रेसने तोडून-मोडून दाखवलं; अमित शाहांचा आरोप
आंबेडकरांबद्दल केलेल्या वक्तव्याचा विपर्यास, काँग्रेसने तोडून-मोडून दाखवलं; अमित शाहांचा आरोप
Mumbai Boat Accident: लहान बाळ बुडू नये म्हणून एका हातात उचलून धरलं; बोट समुद्रात बुडाल्यावर नेमकं काय घडलं?
लहान बाळ बुडू नये म्हणून एका हातात उचलून धरलं, बोटीच्या फळीला पकडून तरंगत राहिला; बोट समुद्रात बुडाल्यावर नेमकं काय घडलं?
Mumbai Boat Accident : मुंबई गेट वे बोट अपघातातील ‘ती’ स्पीड बोट कुणाची? A टू Z माहिती
Mumbai Boat Accident : मुंबई गेट वे बोट अपघातातील ‘ती’ स्पीड बोट कुणाची? A टू Z माहिती
Mumbai Gate Way Of India Boat Accident : गेट वे ऑफ इंडियाकडून एलिफंटाकडे जाणारी प्रवासी बोट उलटली
Mumbai Gate Way Of India Boat Accident : गेट वे ऑफ इंडियाकडून एलिफंटाकडे जाणारी प्रवासी बोट उलटली
Embed widget