एक्स्प्लोर

jalgaon News : जिवलग मित्रांवर काळाचा घाला, भरधाव बसच्या धडकेत जळगावमधील दोघे ठार 

jalgaon News : अमळनेरहून शिरपूरकडे जाणाऱ्या बुलेटला भरधाव वेगाने येणाऱ्या बसने जोरदार धडक दिल्याने या भीषण अपघातात बुलेटवरील डॉक्टर असलेल्या दोन्ही मित्रांचा जागीच मृत्यू झालाय.

jalgaon News Update : जळगावमधील जिवलग मित्रांवर काळाने घाला घातलाय. भरधाव बसच्या धडकेत जळगावमधील दोघे ठार झाले आहेत. अमळनेरहून शिरपूरकडे जाणाऱ्या बुलेटला भरधाव वेगाने येणाऱ्या बसने जोरदार धडक दिली.  या भीषण अपघातात बुलेटवरील डॉक्टर असलेल्या दोन्ही मित्रांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी दुपारी अमळनेर बेटावद रस्त्यावरील हॉटेल माधवी जवळ घडली आहे. डॉ. महेंद्र शांतीलाल बोरसे (वय, 39 रा. पाडसे ता. अमळनेर ) आणि डॉ. अरूण नथ्थू साळुंखे (वय, 38 रा. हिंगोण खुर्द ता. अमळनेर ) अशी अपघातात ठार झालेल्या दोघा मित्रांची नावे आहेत.  

याबाबत अधिक माहिती अशी की, डॉ. महेंद्र बोरसे आणि डॉ. अरूण नथ्थू साळुंखे हे शुक्रवारी दुपारी तीन वाजेच्या सुमारास बुलेट ( क्रमांक एमएच 18 एव्ही 311) ने अमळनेर-बेटावद रस्त्याने शिरपूरकडे जात होते. ब्राम्हणे फाट्याजवळील हॉटेल माधवी जवळ समोरून येणारी शिरपूर-अमळनेर बस क्रमांक (एमएच २० बीएल ३९८१) ने बुलेटला जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात बुलेटवरील डॉ. महेंद्र बोरसे आणि डॉ. अरूण साळुंखे हे जागीच ठार झाले.

ही बस दुसऱ्या बसला ओव्हरटेक करत असताना हा भीषण अपघात झाल्याची माहिती मिळाली आहे. अपघातानंतर दोघांचे मृतदेह अमळनेर ग्रामीण रूग्णालयात शवविच्छेदनासाठी आणण्यात आले आहेत. याप्रकरणी रविंद्र जगन्निा मिस्तरी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलीस ठाण्यात बसचालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे आहे. पुढील तपास सहाय्यक फौजदार किशोर पाटील करीत आहे.  दरम्यान पाडसे येथील डॉ. महेंद्र बोरसे हे परिसरात मनमिळाऊ असल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. त्यांच्या पश्चात आई वडील, पत्नी, एक मुलगा, भाऊ तर अरुण साळुंके यांच्या पश्चात आई वडील पत्नी दोन मुली असा परिवार आहे. 

महत्त्वाच्या बातम्या

Jalgaon Crime News : चारित्र्यावर संशय, नवऱ्यानं संतापात पत्नीच्या अंगावर दारू ओतली अन्....; जळगाव जिल्ह्यातील पाचोरा हादरलं!
चारित्र्यावर संशय, नवऱ्यानं संतापात पत्नीच्या अंगावर दारू ओतली अन्....; जळगाव जिल्ह्यातील पाचोरा हादरलं!
Jalgaon Crime News: झोपलेल्या चिमुरड्यांवर जन्मदात्या बापाकडूनच जीवघेणा हल्ला, मुलीचा जागीच अंत, मुलगा गंभीर जखमी; जळगाव हादरलं!
झोपलेल्या चिमुरड्यांवर जन्मदात्या बापाकडूनच जीवघेणा हल्ला, मुलीचा जागीच अंत, मुलगा गंभीर जखमी; जळगाव हादरलं!
Jalgaon Rain: पाच तास झाडावर जीव मुठीत धरून बसले; नाग झाडावर चढताच फांद्या तोडून खाली फेकले; जळगावात पुरात अडकलेल्या नागरिकाने सांगितला थरारक अनुभव
पाच तास झाडावर जीव मुठीत धरून बसले; नाग झाडावर चढताच फांद्या तोडून खाली फेकले; जळगावात पुरात अडकलेल्या नागरिकाने सांगितला थरारक अनुभव
Maharashtra Rain: पावसाचा रौद्रावतार! विदर्भ मराठवाड्यासह निम्म्या महाराष्ट्राला अलर्ट, नाशिक, नंदुरबार जिल्ह्यातील शाळा-महाविद्यालयांना सुट्टी जाहीर, IMDचा राज्यासाठी महत्वाचा इशारा
पावसाचा रौद्रावतार! विदर्भ मराठवाड्यासह निम्म्या महाराष्ट्राला अलर्ट जारी, नाशिक, नंदुरबार जिल्ह्यातील शाळा-महाविद्यालयांना सुट्टी जाहीर, हवामान विभागाचा राज्यासाठी महत्वाचा इशारा

व्हिडीओ

Kunbi Certificate Issues Special Report : मराठा आरक्षणाचा पेच वाढला? कुणबी दाखलेच अवैध? | Special Report
Dharashiv News Special Report : धाराशिव जिल्हा परिषदेच्या दोन तास टीव्ही, मोबाईल बंद उपक्रमाला सुरुवात | Special Report
Analogue paneer Special Report : महाराष्ट्रात ॲनालॉग पनीरवर वर्षभराची बंदी, तुकाराम मुंढेंचा तडाखा
Mumbai Mayor Bungalow Special Report : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग : Ritu Tawade
Gungi Gudiya Special Report : गूंगी गुडिया ते गूंगा गुड्डा, मौनावरून राजकारण की राजकारणासाठी मौन?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Devendra Fadnavis Gen Z: नाराज जेन Z साठी फडणवीस सरकारचा डॅमेज कंट्रोल प्लॅन, 9 महत्त्वाचे निर्णय गेमचेंजर ठरणार
नाराज जेन Z साठी फडणवीस सरकारचा डॅमेज कंट्रोल प्लॅन, 9 महत्त्वाचे निर्णय गेमचेंजर ठरणार
Pune Hinjewadi IT Park: हिंजवडी आयटी पार्कमध्ये अचानक NSG अन् अमेरिकेच्या फोर्स वनचे कमांडो शिरताच सगळेच घाबरले, प्रचंड गुप्तता, नेमकं काय घडलं?
हिंजवडी आयटी पार्कमध्ये अचानक NSG अन् अमेरिकेच्या फोर्स वनचे कमांडो शिरताच सगळेच घाबरले, प्रचंड गुप्तता, नेमकं काय घडलं?
Cockroach Janta Party : 'कॉकरोच जनता पार्टी' च्या बैठकीत सात तास मंथन, CJP कडून पुढचा मास्टरप्लॅन तयार, आज मोठी घोषणा केली जाणार; आशुतोष रांका यांची माहिती
'कॉकरोच जनता पार्टी' च्या बैठकीत सात तास मंथन, CJP कडून पुढचा मास्टरप्लॅन तयार, आज मोठी घोषणा केली जाणार; आशुतोष रांका यांची माहिती
Maharashtra Live blog updates: म्हाडाच्या मुंबईतील 2640 घरांसाठी आज लॉटरी निघणार, अर्जदारांची धाकधूक वाढली
Maharashtra Live blog updates: म्हाडाच्या मुंबईतील 2640 घरांसाठी आज लॉटरी निघणार, अर्जदारांची धाकधूक वाढली
FSSAI Action : Old Monk सह इतर दारू आणि खाद्यपेये FSSAIच्या निशाण्यावर का आहेत? देशभर धडक कारवाई
Old Monk सह इतर दारू आणि खाद्यपेये FSSAIच्या निशाण्यावर का आहेत? देशभर धडक कारवाई
ना सलमान, ना आमीर; मग भारतातला सर्वात महागडा सुपरस्टार कोण? अमिताभ बच्चन, अक्षय कुमार तर टॉप 5 मध्येही नाहीत
ना सलमान, ना आमीर; मग भारतातला सर्वात महागडा सुपरस्टार कोण? अमिताभ बच्चन, अक्षय कुमार तर टॉप 5 मध्येही नाहीत
Sunetra Pawar : म्हाडाच्या प्रलंबित गृहनिर्माण प्रकल्पांना तातडीने गती द्या; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे निर्देश
म्हाडाच्या प्रलंबित गृहनिर्माण प्रकल्पांना तातडीने गती द्या; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे निर्देश
Mumbai Crime Vikhroli Parksite: मुंबईच्या विक्रोळीत तीन भावांमध्ये घरात गाणी लावण्यावरुन वाद, कुटुंबावर धारदार शस्त्राने वार, दोघांचा मृत्यू
मुंबईच्या विक्रोळीत तीन भावांमध्ये गाणी लावण्यावरुन वाद, कुटुंबावर धारदार शस्त्राने वार, दोघांचा मृत्यू
Embed widget