एक्स्प्लोर

Supriya Sule : 'सरकार घाबरल्यानं निवडणुका पुढे ढकलतंय, मात्र...'; सुप्रिया सुळेंचा जळगावात जोरदार हल्लाबोल

Supriya Sule Speech : आज त्यांनी पक्ष फोडला उद्या तुमच्या घरात येऊन नुकसान करतील. सरकार घाबरले असल्यानं निवडणुका पुढे ढकलत आहे, अशी टीका सुप्रिया सुळे यांनी केली आहे.

Supriya Sule : आज त्यांनी पक्ष फोडला उद्या तुमच्या घरात येऊन नुकसान करतील. सरकार घाबरले असल्यानं निवडणुका पुढे ढकलत आहे, अशी टीका खासदार सुप्रिया सुळेंनी (Supriya Sule) सरकारवर केली आहे.  तर जनता हुशार असून निवडणूक पुढे धकलली तरी पुढचे सरकार आमचे येईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षातर्फे (NCP Sharad Pawar Group) जळगावात (Jalgaon) झालेल्या महिला मेळाव्यातून त्या बोलत होत्या. 

सुप्रिया सुळे म्हणाल्या की, जळगाव आणि पवार साहेब यांचे प्रेमाचे संबध राहिले आहेत. वेगळी ओळख जळगावची राहिली आहे. बालवाडीमध्ये महिलांना बोलवले आहे. कार्यक्रमाला आले नाही तर तुम्हाला मदत मिळणार नसल्याचे मेसेज महिलांना आले आहेत, असे महिलांनी सांगितले. महिलांना निधी देता याबाबत आभार मानते. चांगल्या कामाचं आपण नेहमीच कौतुक केले आहे. पण, लाल साड्या घालून यायला सांगितले जात आहे. दडपशाही करत असेल तर ती मोडून काढा, ज्याला पाहिजे त्याला मतदान करा. मात्र दडपशाही सरकार हद्दपार करण्याची ही वेळ आहे, असे म्हणत त्यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केला.

लोकसभेनंतर बहिणी लाडक्या झाल्या

त्या पुढे म्हणाल्या की, मी येथे मत मागण्यासाठी आली आहे. पण दडपशाही करून नाही तर प्रेमाने, कष्ट करणाऱ्याला मदत म्हणजे सेवा आहे. लाडकी बहीण योजना म्हणतात आणि लोकसभेनंतर बहिणी लाडक्या झाल्या. याचा मला चांगला अनुभव आहे. मी नात्यात अडकत नाही. नात वेगळे आणि काम वेगळे आहे. अतिशय शांतपणे आणि संविधानाच्या मार्गाने आपल्याला आपले काम करायचे आहे, असेही त्यांनी म्हटले. 

सुप्रिया सुळेंचे महिलेला आश्वासन 

शेतीवर कर लावला आहे. आपला सरकार येईल त्यावेळी शेतीशी निगडीत ज्या वस्तूंवर कर असेल तो लावण्यात येणार नाही. शेतकरी खड्यात जात आहे, असे बोलत असतानाच उपस्थित महिलेने सुप्रिया सुळे यांच्यापुढे व्यथा मांडल्या. दारू बंदी करा, शेतकरी शून्यात जात आहे. सोयाबीनला भाव द्या, सगळ्या गोष्टी महाग, मात्र शेतकऱ्याच्या उत्पादनाला भाव नाही. पंधराशे रुपयांनी काय पोट भरणार आहे का? असे महिलेने म्हटले. तसेच सोयाबीनला दहा हजार आणि कपाशीला बारा हजार भाव देण्याची मागणी महिलेने सुप्रिया सुळे यांच्याकडे केली. यावर तुमची मागणी लोकसभेत करणार असल्याचं सुप्रिया सुळे यांनी महिलेला आश्वासन दिले. 

सरकार घाबरल्यानं निवडणुका पुढे ढकलतंय

तर महाविकास आघाडीचे सरकार आल्यावर गाव वस्तीवर दारू बंदी कार्यक्रम राबविणार असल्याचं सुप्रिया सुळे यांनी म्हटले. तर अंगणवाडी सेविकांचे मानधन वाढवून मिळाले नाही तर आपण उपोषण करणारही त्यांनी यावेळी सांगितले. हे सरकार फक्त पक्ष फोडणे आणि मतांचे राजकारण करत आहेत. या विरोधात आपण राज्यभर लढाई लढत आहेत. माझ्यावर अन्याय झाला आहे. तुमच्यावरही होत आहे. आज त्यांनी पक्ष फोडला उद्या तुमच्या घरात येऊन नुकसान करतील. सरकार घाबरले असल्यानं निवडणुका पुढे ढकलत आहे. मात्र जनता हुशार आहे. निवडणूक पुढे धकलली तरी पुढचे आमचे सरकार येईल, असा विश्वास सुप्रिया सुळेंनी यावेळी व्यक्त केला. लोकसभेत पूर्ण यश मिळाले नसले तरी पुन्हा एकदा जोमाने कामाला लागा, असे आवाहन सुप्रिया सुळे यांनी पदाधिकाऱ्यांना केले. 

आणखी वाचा 

'एकातरी लाडकी बहिणीचा अर्ज रद्द करुन दाखवा'; सुप्रिया सुळेंचं आव्हान, शेअर केला धक्कादायक फोटो

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Eknath Shinde - Vinod Tawde : आधी कुजबूज, नंतर टाळी दिली! शिंदे-तावडेंमध्ये काय चर्चा?
Eknath Shinde - Vinod Tawde : आधी कुजबूज, नंतर टाळी दिली! शिंदे-तावडेंमध्ये काय चर्चा?
पेट्रोलचा टँकर पलटी झाला, फोंडा घाटाचा रस्ता सरसर वणव्यासारखा पेटत गेला अन्...
पेट्रोलचा टँकर पलटी झाला, फोंडा घाटाचा रस्ता सरसर वणव्यासारखा पेटत गेला अन्...
Devendra Fadnavis Chief Minister : देवेंद्र फडणवीसांची झंझावाती कारकीर्द, कमबॅकची कहाणी माझा वर
Devendra Fadnavis Chief Minister : देवेंद्र फडणवीसांची झंझावाती कारकीर्द, कमबॅकची कहाणी माझा वर
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 04 डिसेंबर 2024 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 04 डिसेंबर 2024 | बुधवार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Zero Hour : शपथविधीआधी देवेंद्र फडणवीसांसमोर सर्वात मोठी आव्हानं, एकनाथ शिंदेच्या नाराजीचा अर्थ काय?Special Report on Devendra Fadnavis : सर्वसमावेशक अनुमोदन, देवेंद्र फडणवीस भाजप विधिमंडळ पक्षनेतेपदीSudhir Mungantiwar on Oath Ceremony : उद्या फक्त 3 जण शपथ घेतील, सुधीर मुनगंटीवारांची मोठी माहितीEknath Shinde - Vinod Tawde : आधी कुजबूज, नंतर टाळी दिली! शिंदे-तावडेंमध्ये काय चर्चा?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Eknath Shinde - Vinod Tawde : आधी कुजबूज, नंतर टाळी दिली! शिंदे-तावडेंमध्ये काय चर्चा?
Eknath Shinde - Vinod Tawde : आधी कुजबूज, नंतर टाळी दिली! शिंदे-तावडेंमध्ये काय चर्चा?
पेट्रोलचा टँकर पलटी झाला, फोंडा घाटाचा रस्ता सरसर वणव्यासारखा पेटत गेला अन्...
पेट्रोलचा टँकर पलटी झाला, फोंडा घाटाचा रस्ता सरसर वणव्यासारखा पेटत गेला अन्...
Devendra Fadnavis Chief Minister : देवेंद्र फडणवीसांची झंझावाती कारकीर्द, कमबॅकची कहाणी माझा वर
Devendra Fadnavis Chief Minister : देवेंद्र फडणवीसांची झंझावाती कारकीर्द, कमबॅकची कहाणी माझा वर
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 04 डिसेंबर 2024 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 04 डिसेंबर 2024 | बुधवार
Maharashtra CM : शपथ विधिबाबत एकनाथ शिंदेंचा सस्पेन्स कायम; समजूत काढण्यासाठी शिवसेनेचे आमदार वर्षावर
शपथ विधिबाबत एकनाथ शिंदेंचा सस्पेन्स कायम; समजूत काढण्यासाठी शिवसेनेचे आमदार वर्षावर
Eknath Shinde : देवेंद्र फडणवीस यांची विनंती अन् उपमुख्यमंत्रिपदाबाबतचा प्रश्न, एकनाथ शिंदे पत्रकार परिषदेत काय म्हणाले?
देवेंद्रजींनी मुख्यमंत्री व्हावं असं पाठिंब्याचं पत्र सेनेनं दिलं, एकनाथ शिंदेंनी सांगितला अडीच वर्षांपूर्वीचा प्रसंग
Devendra Fadnavis : Eknath Shinde मंत्रिमंडळात राहणार नाही? फडणवीसांचं मोठं वक्तव्य
Devendra Fadnavis : Eknath Shinde मंत्रिमंडळात राहणार नाही? फडणवीसांचं मोठं वक्तव्य
Rahul Narwekar : राहुल नार्वेकर पुन्हा विधानसभा अध्यक्ष होणार, सूत्रांची माहिती, विशेष अधिवेशनाच्या तारखा समोर
राहुल नार्वेकर पुन्हा विधानसभा अध्यक्ष होणार, सूत्रांची माहिती, विशेष अधिवेशनाच्या तारखा समोर
Embed widget