(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Sharad Pawar : 'राम मंदिराचा आम्हालाही आदर, काम पूर्ण झालं की नक्की जाणार'; शरद पवारांचे अमित शाहांना प्रत्युत्तर
Sharad Pawar : रावेरचे शरद पवार गटाचे उमेदवार श्रीराम पाटील यांच्या प्रचारार्थ भुसावळ येथे सभा आयोजित करण्यात आली. यात शरद पवारांनी पंतप्रधान मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर टीका केलीय.
Sharad Pawar : आज रावेर लोकसभा मतदारसंघाचे (Raver Lok Sabha Constituency) शरद पवार गटाचे उमेदवार श्रीराम पाटील (Shriram Patil) यांच्या प्रचारार्थ महाविकास आघाडीची भुसावळ येथे सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर (PM Narendra Modi) जोरदार टीका केली. तसेच केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांनी राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठेचा उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray), शरद पवार आणि प्रियंका गांधी (Priyanka Gandhi) यांनी बहिष्कार टाकला, या वक्तव्याचा शरद पवार यांनी समाचार घेतला.
शरद पवार म्हणाले की, कार्यकर्त्यांचा आढावा घेण्यासाठी मी आलो. स्वातंत्र्योत्तर काळाची चळवळ झाली त्यात खानदेशाचे मोठे योगदान आहे. फैजपूर येथे काँग्रेसचे अधिवेशन झाले ते ऐतिहासिक होते. या अधिवेशनाला महात्मा गांधी, पंडित जवाहरलाल नेहरू उपस्थित होते. रावेरमध्ये आमच्या लोकांसाठी वेगळी जागा आहे. श्रीराम पाटील यांना मोठा मताधिक्याने तुम्ही विजयी करावं ही विनंती करण्यासाठी मला भुसावळला येण्याची संधी मिळाली.
मोदींनी सांगावे दहा वर्षात काय केलं?
भारताच्या लोकसभेच्या निवडणुकीकडे जगाचे लक्ष आहे. भारतात कोणते सरकार येणार याची उत्सुकता संपूर्ण जगाला लागली आहे. त्यामुळे जनतेनेही त्यादृष्टीने या निवडणुकीकडे पाहणे गरजेचे आहे. मोदी साहेब देशाच्या कानाकोपऱ्यात फिरत आहेत. पण जावून सांगतात काय? या मोदींनी सांगावे दहा वर्षात काय केलं? 2014 पासून यांनी काय केलं? 2014 मध्ये काय भांडण होत होती. तेव्हा आम्ही सत्तेत होतो आणि ते म्हणण्याचे आम्ही महागाई आणली.
मोदींचं राज्य हे वेगळ्या दिशेने चाललंय
मोदी म्हणाले होते की, मला सत्ता द्या मी भाव देतो. मात्र घोषणा उलटली काही झालं नाही. महागाईची झळ ही सर्वसामान्य जनतेला बसत आहे. गॅस सिलेंडरचा भाव काय आहे. 410 वरून आज 1160 किंमत आहे. मोदींनी आश्वासन दिली मात्र ती पाळली नाही. मोदींचे राज्य हे वेगळ्या दिशेने चालले आहे. मोदींना त्यांच्याविरुद्ध टीका केली की आवडत नाही, त्यांना सहन होत नाही. झारखंडच्या मुख्यमंत्र्यांनी टीका केली आणि दिल्लीमध्ये अरविंद केजरीवाल यांनी टीका केली. त्यांना जेलमध्ये टाकण्यात आले. जवाहरलाल नेहरू व गांधींची टिंगल टवाळी करत करायची. आमची टिंगल करायची. माझ्यावर आणि उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करायची, अशी टीका त्यांनी यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर केली आहे.
राम मंदिराचा आम्हालाही आदर
काँग्रेसने राम मंदिराचा विषय 70 वर्ष दोन प्रलंबित ठेवला. मोदींनी मात्र 5 वर्षात राम मंदिर उभारले. मंदिर दर्शनासाठी खुले ही केले. राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठेचा बहिष्कार उद्धव ठाकरे, शरद पवार आणि प्रियंका गांधी यांनी केला, असे वक्तव्य केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी केले होते. यावरून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांनी अमित शाह यांना प्रत्युत्तर दिले आहे. शरद पवार म्हणाले की, अमित शाह म्हणतात, मी अयोध्या राम मंदिरा प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला गेलो नाही. आम्हालाही राम मंदिराचा आदर आहे. राम मंदिराचे काम पूर्ण झालं की,आम्ही नक्की जावू, असे पत्युत्तर त्यांनी दिले आहे.
आणखी वाचा
संजयकाका यावेळी निवडणूक लढा, पुढच्यावेळी महिलेचा नंबर लागू शकतो, अमित शाहांची सांगलीत फटकेबाजी