एक्स्प्लोर

Jalgaon APMC Election : जळगाव जिल्ह्यातील बाजार समितींवर कुणाची सत्ता, पाहा कुणी- कुणी भाकरी फिरवली 

Jalgaon APMC Election : जळगाव जिल्ह्यातील बाजार समितींवर महाविकास आघाडीचा बोलबाला पाहायला मिळत आहे.

Jalgaon APMC Election : जळगाव जिल्ह्यातील (Jalgaon) अनेक बाजार समिती निवडणुकांचा निकाल हाती येत असून अमळनेर (Amalner), पाचोरा, बोदवड, धरणगाव बाजार समितीचा निकाल लागला आहे. त्यानुसार महाविकास आघाडीचा (Mahavikas Aghadi) बोलबाला असून धरणगाव बाजार समितीवर मात्र भाजप शिंदे गटाने मुसंडी मारल्याचे चित्र आहे. या बाजार समितीसाठी पालकमंत्री गुलाबराव पाटील मैदानात उतरत पॅनलला उभारी दिली होती. 

दरम्यान अमळनेर बाजार समितीचा (Amalner Bajar Samiti) निकाल पाहता राष्ट्रवादीचे विद्यमान आमदार अनिल भाईदास पाटील यांच्या शेतकरी सहकार पॅनल एकहाती सत्ता मिळवल्याचे पाहायला मिळत आहे. या ठिकाणी 18 पैकी 12  जागांवर महाविकास आघाडीचे सहकार पॅनलचे उमेदवार विजयी झाले आहेत. तर भाजप शिंदे गटाच्या शेतकरी पॅनलने केवळ 4 जागांवर विजय मिळवला आहे. तर दोन जागांवर अपक्ष विजयी झाले आहेत. राष्ट्रवादीचे विद्यमान आमदार अनिल भाईदास पाटील आणि माजी आमदार साहेबराव पाटील तर दुसरीकडे भाजपच्या माजी आमदार स्मिता वाघ यांच्या पॅनलमध्ये सरळ लढत होती. यात 12 जागांवर विजय मिळवत अमळनेर बाजार समितीवर एकहाती सत्ता स्थापन केली आहे. भाजपच्या विधान परिषदेच्या माजी आमदार स्मिता वाघ तसेच भाजप शिंदे गटासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.

पाचोऱ्यात भावाकडून बहिणीच्या पॅनलचा पराभव 

तर पाचोरा बाजार समितीवर शिंदे गटाचे आमदार किशोर पाटील यांच्या भाजप शिंदे गटाच्या शेतकरी विकास पॅनलने 18 पैकी नऊ जागांवर विजय मिळवत वर्चस्व सिद्ध केल आहे. या ठिकाणी आमदार किशोर पाटील यांनी त्यांच्या बहीण तथा महाविकास आघाडीतील ठाकरे गटाच्या नेत्या वैशाली सूर्यवंशी यांना मोठा धक्का दिला आहे. पाचोरा बाजार समिती येथे शिंदे गटाचे आमदार किशोर पाटील यांच्या नेतृत्वात भाजप शिंदे गटाचे शेतकरी विकास पॅनल, ठाकरे गटाच्या नेत्या वैशाली सूर्यवंशी राष्ट्रवादीचे आमदार दिलीप वाघ यांच्या नेतृत्वात महाविकास आघाडीचे महाविकास पॅनल तर भाजपचे नेते अमोल शिंदे यांचे भाजप पुरस्कृत शेतकरी सहकार पॅनल शेतकरी लढत या ठिकाणी पाहायला मिळाले. आमदार किशोर पाटील यांना त्यांच्या ठाकरे गटातील बहीण वैशाली सूर्यवंशी, राष्ट्रवादीचे माजी आमदार दिलीप वाघ यांनी महाविकास आघाडीच्या माध्यमातून आव्हान दिलं होतं. बाजार समितीचे मतमोजणी शेवटपर्यंत अटीतटीचा सामना पाहायला मिळाला. 

मॅजिक फिगरने महाविकास आघाडीचा फायदा... 

यात भाजप शिंदे गटाच्या शेतकरी विकास पॅनलने नऊ जागांवर विजय मिळवलां तर महाविकास आघाडीच्या महाविकास आघाडीच्या पॅनलला सात जागांवर उमेदवार विजयी झाले. तर भाजप पुरस्कृत अमोल शिंदे यांच्या शेतकरी सहकारी पॅनलला दोन जागांवर विजय मिळाला. भाजप शिंदे गटाला नऊ जागा मिळाल्या असल्या तरी त्यांना बहुमताचा आकडा मिळवण्यासाठी अजून एका जागेची आवश्यकता आहे. तर दुसरीकडे महाविकास आघाडीला सात जागा मिळाल्याने व त्यांच्यासोबत अमोल शिंदे यांचे भाजप पुरस्कृत शेतकरी सहकारी पॅनलच्या दोन जागा सोबत आल्या तर  महाविकास आघाडीच्या नऊ जागा होतील. त्यामुळे आता नेमकं महाविकास आघाडी मॅजिक फिगरचा आकडा जुळवतो की भाजप शिंदे गट मॅजिक फिगर गाठतात. हे पाहणं महत्वाचं असणार आहे.

धरणगाव बाजार समितीवर भाजप शिंदे गट 

मंत्री गुलाबराव पाटील यांच्यासाठी प्रतिष्ठेच्या ठरलेल्या धरणगाव बाजार समितीवर मंत्री गुलाबराव पाटील यांच्या भाजप शिंदे गटाला अटीतटीच्या लढतीनंतर एकहाती सत्ता मिळविण्यात यश मिळाले आहे. धरणगाव बाजार समितीवर शिंदे गटाचे मंत्री गुलाबराव पाटील यांच्या सहकार पॅनलने 18 पैकी 12 जागांवर विजय मिळवत एकहाती सत्ता मिळवली आहे. तर राष्ट्रवादीच्या माजी मंत्री गुलाबराव देवकर यांच्या महाविकास आघाडीच्या शेतकरी विकास पॅनलला केवळ सहा जागांवर विजय मिळवता आला आहे. धरणगाव बाजार समिती ताब्यात घेण्यासाठी राष्ट्रवादीचे माजी मंत्री गुलाबराव देवकर ठाकरे गटाचे संपर्कप्रमुख गुलाबराव वाघ तसेच ठाकरे गटाची युवा सेनेचे जिल्हाप्रमुख निलेश चौधरी, राष्ट्रवादी काँग्रेसचा एक गट या पद्धतीने बाजार समिती ताब्यात घेण्यासाठी महाविकास आघाडीने जोरदार ताकद लावली होती.

राष्ट्रवादीचं सहकार्य मिळालं... 

धरणगाव बाजार समितीवर शिंदे गटाचे मंत्री गुलाबराव पाटील यांच्या  भाजप शिंदे गटाच्या सहकार सहकार पॅनलने वर्चस्व प्रस्थापित केला आहे. भाजप शिंदे गटाला या ठिकाणी राष्ट्रवादीचे बंडखोर संजय पवार यांच्या गटाचाही पाठिंबा मिळाला होता. याच राष्ट्रवादीच्या पाठिंब्यावर धरणगाव बाजार समितीवर भाजप शिंदे गटाने सत्ता प्रस्थापित केली आहे. एक हाती विजय मिळवल्यानंतर या ठिकाणी भाजप शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी जोरदार जल्लोष केला तर पाहायला मिळालं ढोलताशाच्या गजरावर तसेच गुलाबाची उधळण करत कार्यकर्त्यांनी आनंद व्यक्त केल्याचं या ठिकाणी पाहायला मिळालं. धरणगावातील बाजार समितीवर विजयानंतर शिंदे गटाचे मंत्री गुलाबराव पाटील यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. धरणगाव बाजार समितीवर जरी एक हाती सत्य मिळाले असले तरी जळगाव बाजार समितीवर मात्र मंत्री गुलाबराव पाटील यांनी मान्य केले आहे. जनतेने दिलेला कौल आम्हाला मान्य आहे. राष्ट्रवादीच्या एका गटाचे हे आम्हाला सहकार्य मिळाल्याचे यावेळी मंत्री गुलाबराव पाटील यांनी केलं आहे.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मुंडे भगिनींनी जमीन लाटल्याप्रकरणात नवा ट्विस्ट; महाजनांचे आरोप फेटाळले, मध्यस्थीच आला समोर
मुंडे भगिनींनी जमीन लाटल्याप्रकरणात नवा ट्विस्ट; महाजनांचे आरोप फेटाळले, मध्यस्थीच आला समोर
Video: तुम्ही माझ्या नादी लागू नका, फडणवीसांचं ऐकून ह्या लफड्यात पडू नका; जरांगेंचा राज ठाकरेंवर हल्लाबोल
Video: तुम्ही माझ्या नादी लागू नका, फडणवीसांचं ऐकून ह्या लफड्यात पडू नका; जरांगेंचा राज ठाकरेंवर हल्लाबोल
पैजेचा विडा... अब्दुल सत्तारांच्या मतदारसंघात लागली शर्यत, 500 च्या बाँण्डवर लेखी; जिंकणाऱ्याला बुलेट मिळणार
पैजेचा विडा... अब्दुल सत्तारांच्या मतदारसंघात लागली शर्यत, 500 च्या बाँण्डवर लेखी; जिंकणाऱ्याला बुलेट मिळणार
एकदा राज ठाकरेला संधी द्या,अपयशी ठरलो तर दुकान बंद करून टाकेन; मनसे अध्यक्षांचं भावनिक आवाहन
एकदा राज ठाकरेला संधी द्या,अपयशी ठरलो तर दुकान बंद करून टाकेन; मनसे अध्यक्षांचं भावनिक आवाहन
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Zero Hour Full | राज्याच्या राजकारणाची पातळी आणखी किती घसरणार? खोतांचं पवारांविषयी वादग्रस्त वक्तव्यZero Hour | अजितदादांचा नबाव मलिकांसाठी प्रचार, महायुतीतल्या मतभेदाची दरी वाढवणार का?Zero Hour | राज्याचं राजकारण कुठे चाललंय? राजकारणाची ही संस्कृती नाही? ABP MajhaLaxman Hake Car Vandalized : मराठा आंदोलकांनी फोडली लक्ष्मण हाकेंची कार, वातावरण तापलं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मुंडे भगिनींनी जमीन लाटल्याप्रकरणात नवा ट्विस्ट; महाजनांचे आरोप फेटाळले, मध्यस्थीच आला समोर
मुंडे भगिनींनी जमीन लाटल्याप्रकरणात नवा ट्विस्ट; महाजनांचे आरोप फेटाळले, मध्यस्थीच आला समोर
Video: तुम्ही माझ्या नादी लागू नका, फडणवीसांचं ऐकून ह्या लफड्यात पडू नका; जरांगेंचा राज ठाकरेंवर हल्लाबोल
Video: तुम्ही माझ्या नादी लागू नका, फडणवीसांचं ऐकून ह्या लफड्यात पडू नका; जरांगेंचा राज ठाकरेंवर हल्लाबोल
पैजेचा विडा... अब्दुल सत्तारांच्या मतदारसंघात लागली शर्यत, 500 च्या बाँण्डवर लेखी; जिंकणाऱ्याला बुलेट मिळणार
पैजेचा विडा... अब्दुल सत्तारांच्या मतदारसंघात लागली शर्यत, 500 च्या बाँण्डवर लेखी; जिंकणाऱ्याला बुलेट मिळणार
एकदा राज ठाकरेला संधी द्या,अपयशी ठरलो तर दुकान बंद करून टाकेन; मनसे अध्यक्षांचं भावनिक आवाहन
एकदा राज ठाकरेला संधी द्या,अपयशी ठरलो तर दुकान बंद करून टाकेन; मनसे अध्यक्षांचं भावनिक आवाहन
मविआच्या जाहिरातीमधून अजित पवारांची बदनामी, खोटं वृत्त; राष्ट्रवादीच पोलीस आयुक्तांकडे तक्रार
मविआच्या जाहिरातीमधून अजित पवारांची बदनामी, खोटं वृत्त; राष्ट्रवादीच पोलीस आयुक्तांकडे तक्रार
Ajit Pawar: अजित पवारांनी घेतली प्रकाश आंबेडकरांची भेट; कारणही सांगितलं, नेमकं काय म्हणाले?
अजित पवारांनी घेतली प्रकाश आंबेडकरांची भेट; कारणही सांगितलं, नेमकं काय म्हणाले?
मोठं घबाड जप्त, साडे तीन कोटींसह ATM व्हॅन पोलिसांच्या ताब्यात; पैशांच्या भरलेल्या बॅगा ठाण्यात
मोठं घबाड जप्त, साडे तीन कोटींसह ATM व्हॅन पोलिसांच्या ताब्यात; पैशांच्या भरलेल्या बॅगा ठाण्यात
Supreme Court on Government JOB : भरतीचे नियम मध्येच बदलता येणार नाहीत, सरकारी नोकऱ्यांबाबत सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय
भरतीचे नियम मध्येच बदलता येणार नाहीत, सरकारी नोकऱ्यांबाबत सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय
Embed widget