(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Jalgaon News : पारोळ्यात गोंडगावची पुनरावृत्ती! जळगाव जिल्हा सुन्न, मंत्री गुलाबराव पाटील यांच्याकडून कठोर कारवाईचे आदेश
Jalgaon News : एका पाठोपाठ घडलेल्या अल्पवयीन मुलीवर (Girl Molestation) अत्याचाराच्या घटनेने जळगाव जिल्हा सुन्न झाल्याचे पहायला मिळत आहे.
जळगाव : पारोळा (Parola) तालुक्यातील घटनेसंदर्भात पोलीस अधीक्षकांशी बोलून माहिती घेतली आहे, या घटनेत सुरुवातील प्राणघातक हल्ल्याचे कलम 307 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे, पुढील कारवाई करण्यासंदर्भात पोलिसांना आदेश देण्यात आल्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांनी सांगितले. तसेच घटना अतिशय दुर्दैवी असून अशा नराधमांवर कठोर कारवाईचे आदेश देण्यात आले असल्याचं गुलाबराव पाटील यांनी सांगितलं.
एरंडोल, भडगाव (Bhadgaon) तालुक्यातील गोंडगाव पाठोपाठ पारोळा तालुक्यातील धुळपिंप्री (Dhulpimpri) या गावात अल्पवयीन मुलीवर अत्याचार करत तिच्यावर जीवघेणा हल्ला केल्याची घटना घडली आहे. या पार्श्वभूमीवर आज मंत्री गुलाबराव यांनी प्रतिक्रिया दिली आहे. एकापाठोपाठ घडलेल्या या घटना जळगाव जिल्ह्यासाठी अत्यंत दुर्देवी असल्याची प्रतिक्रिया जळगाव (Jalgaon) जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी पारोळा तालुक्यातील घटनेवर बोलताना दिली आहे. पारोळा तालुक्यातील घटनेसंदर्भात पोलीस अधीक्षकांशी बोलून माहिती घेतली आहे, या घटनेत सुरुवातील प्राणघातक हल्ल्याचे कलम 307 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे, पुढील कारवाई करण्यासंदर्भात पोलिसांना आदेश देण्यात आले आहेत. दोषींवर कठोरातील कठोर कारवाई करण्यासंदर्भात शासन प्रयत्न करणार असल्याची ग्वाही यावेळी मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिली.
जळगाव जिल्ह्यातील एका पाठोपाठ घडलेल्या अल्पवयीन मुलीवर (Girl Molestation) अत्याचाराच्या घटनेने जळगाव जिल्हा सुन्न झाल्याचे पहायला मिळत आहे. संपूर्ण समाजमनातून संबंधित गुन्हेगारांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे. या विषयावर मंत्री गुलाबराव पाटील यांनी त्यांची प्रतिक्रिया दिली आहे.
गोंडगाव येथील घटनेला आठ दिवस होत नाही, तोवर पारोळा तालुक्यातील धुळपिंप्री येथे एका चौदा वर्षीय मुलीवर अत्याचार करून जिवे मारण्याचा प्रयत्न झाला. ही बाब चिंतनीय असून, अशा नराधमांवर अंकुश लावण्यासाठी राज्य सरकारने गंभीर होणे गरजेचे असून कायदा व सुव्यवस्थेबाबत राज्य सरकारने लक्ष घालावे, अशी मागणी माजी पालकमंत्री सतीश पाटील यांनी केली आहे.
मुलीवर अत्याचारासह मारहाण
पारोळा तालुक्यातील धुळपिंप्री येथील अल्पवयीन मुलीवर अमानुष अत्याचार करत डोक्यावर दगडाने मारून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना गुरुवारी सायंकाळी पाचच्या सुमारास घडली. तक्रारदार आणि पीडित मुलीची आई शेतात काम करीत होते. यावेळी पीडित मुलगी ही घरी होती. दरम्यान, पीडित मुलगी ही सायंकाळी पाच ते साडेपाचच्या सुमारास शौचालयास गेली असता परिसरातील नदीपात्राजवळ संशयित बारक्या उर्फ अशोक मंगा भिल याने मुलीशी बळजबरी करत डोक्यावर दगडाने मारून व दोरीने गळा आवळून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली. याबाबत पोलिसांनी संशयितास ताब्यात घेतले असून पुढील कार्यवाही सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले.
इतर संबंधित बातमी :