(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Chitra Wagh : 'एक आई म्हणून मला विचाराल तर, अशा'... भडगाव प्रकरणावर भाजप नेत्या चित्रा वाघ संतापल्या, म्हणाल्या...
Chitra Wagh : 'एक आई म्हणून मला विचाराल तर मी नक्की हे सांगेन की, अशा नराधमांना भर चौकामध्ये फाशी द्यायला पाहिजे.
Chitra Wagh : 'एक आई म्हणून मला विचाराल तर मी नक्की हे सांगेन की, अशा नराधमांना भर चौकामध्ये फाशी द्यायला पाहिजे. मुलीवर अत्याचार करुन तिची हत्या करणाऱ्या या नराधमाला भर चौकात फाशी शिक्षा द्यायला पाहिजे, असे कृत्य त्याने केले आहे. मात्र कायद्याच्या चौकटीत राहून त्याला फाशीची शिक्षा मिळेल, असा विश्वास भाजप महिला प्रदेश अध्यक्ष चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी व्यक्त केला आहे.
जळगाव (Jalgaon) जिल्ह्यातील भडगाव (Bhadgaon) तालुक्यातील गोंड गाव येथे एका आठ वर्षीय मुलीवर अत्याचार (Girl Murder) करुन तिची हत्या करण्यात आल्याची घटना नुकतीच घडली होती. या घटनेनंतर भाजप प्रदेश महिला मोर्चाच्या अध्यक्ष चित्रा वाघ यांनी पीडित मुलीच्या परिवाराची आज सांत्वनपर भेट घेतली. त्यांची सहानुभूतीपूर्वक चौकशी करुन मुलीच्या आरोपीस कठोर शिक्षा केली जाईल, कोणत्याही परिस्थितीमध्ये त्याला सोडले जाणार नाही, असं आश्वासन त्यांनी दिलं. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी पीडित परिवारासाठी दिलेली आर्थिक मदत परिवाराच्या स्वाधीन केली. भविष्यात अशा घटनांची पुनरावृत्ती टाळायची असेल तर शासन, पोलीस यंत्रणेसोबत समाजानेही सजग राहण्याची आवश्यकता असल्याचं चित्रा वाघ यांनी म्हटल आहे. शासन पातळीवर महिलांच्या सुरक्षेसाठी कायदे सक्षम आहेत. त्याची प्रभावी अंमलबजावणी होण्यासाठी लक्ष देणे महत्वाचे असल्याचं वाघ यांनी म्हटलं आहे.
समाजात अशा विकृती वाढत असून अशा विकृती ठेचण्यासाठी आपण समाज म्हणून सगळ्यांनी एकत्र येणं गरजेचं आहे. ती फक्त या गावची मुलगी नाही किंवा त्या आई-वडिलांची मुलगी नव्हती, तर राज्याची मुलगी होती आणि अशा हजारो मुली वाचवण्यासाठी जे जे काही करता येईल, तेथे निश्चितपणे सरकार म्हणून उभे राहत आहोत. सरकार, पोलीस दक्ष असून समाज म्हणून आपण कुठे कमी पडतोय का, हे पाहणं फार गरजेचे आहे. सगळ्यांनी एकत्रित येऊन या मुलीच्या रक्षणाची जबाबदारी घेणं गरजेचं असल्याचे चित्रा वाघ म्हणाल्या. पुण्याच्या घटनेत दोन सजग मुलांनी मुलीचा जीव वाचवला, अशी सजगता प्रत्येकाने दाखवणे गरजेचे आहे. एक आई म्हणून झालेल्या घटनांची पुनरावृत्ती होऊ नये, म्हणून जे जे काही करता येईल, त्या त्या खबरदारी घेणे आवश्यक असल्याचे चित्रा वाघ म्हणाल्या.
समाज म्हणून सजग असणं आवश्यक
गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी फूल ना फुलाची पाकळी म्हणून परिवारासाठी पाठवली, ती आमचे आमदार मंगेश चव्हाण यांच्या हस्ते परिवाराला दिली. अशा घटनेमध्ये परिवाराला आर्थिक स्थैर देणे सुद्धा असणं गरजेचं असतं. त्यामुळे त्या भावनेतून ही मदत केली आहे. या घटनेची पुनरावृत्ती होऊ नये, यासाठी शासन आणि पोलीस तर सजग आहेत, परंतु समाज म्हणून आपल्यालाही आपली भूमिका आणि आपलं कर्तव्य निभावले पाहिजे, असे आवाहन चित्रा वाघ यांनी यावेळी केले.
आश्रमशाळांची तपासणी महत्वाची
नाशिकच्या घटनेनंतर आश्रमशाळांचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. अशा शाळा नियमानुसार चालतात का? त्याची तपासणी कोण करतं? हे तपासणे महत्वाचे आहे. महाराष्ट्रातील जेवढे काही आधार आश्रम, आश्रम शाळा असतील, अशा आश्रम शाळांचे सरसकट ऑडिट होणं गरजेचं आहे, अशी मागणी आम्ही सरकारकडे केलेली होती, त्याचं काम चालू झालेलं आहे. येणाऱ्या काही दिवसांमध्ये त्याचा अहवालही समोर येतील. ज्या अशा अनधिकृत आश्रमशाळा आहेत, त्या ताबडतोड बंद व्हायला पाहिजे. त्याचं ऑडिट होणं गरजेचे असल्याचे त्या म्हणाल्या.
इतर संबंधित बातम्या :