एक्स्प्लोर

Jalgaon News : ऐनपूर बारीघाट इथे बारागाड्याखाली येऊन एकाचा मृत्यू, अनेक जण जखमी

Jalgaon News : यंदाही परंपरा कायम ठेऊन जळगावातील ऐनपूर इथल्या बारीघाट इथे बारागाड्या ओढण्यात आल्या. परंतु यात बारगाड्याचा ताबा सुटल्याने एकाचा मृत्यू झाला तर अनेक जण जखमी झाल्याची प्राथमिक माहिती आहे.

Jalgaon News : जळगाव (Jalgaon) जिल्ह्याच्या रावेर तालुक्यातील ऐनपूर इथे वर्षानुवर्षे बारागाड्या ओढण्याची परंपरा आहे. यंदाही परंपरा कायम ठेऊन ऐनपूर इथल्या बारीघाट इथे बारागाड्या ओढण्यात आल्या. परंतु यात बारागाड्याचा ताबा सुटल्याने एकाचा मृत्यू झाला तर अनेक जण जखमी झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. दिनकर रामकृष्ण कोळी (वय 60 वर्षे) असं मृत व्यक्तीचे नाव आहे.

बारागाड्यांचा ताबा सुटला; एकाचा मृत्यू, अनेक जखमी

अक्षय्य तृतीयेच्या (Akshaya Tritiya 2023) दुसऱ्या दिवशी हा उत्सव साजरा करण्यात येत असतो. त्यानुसार रविवारी (23 एप्रिल) ऐनपूर येथील बारीघाट इथे या बारागाड्या ओढण्यात आल्या. बारागाड्या ओढण्याचा कार्यक्रम पाहण्यासाठी पुरुषांप्रमाणे महिलांनाही मोठी गर्दी केली होती. मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात बारागाड्या ओढण्यास सुरुवात झाली. प्रेक्षक उत्स्फूर्तपणे प्रतिसाद देत होते. परंतु बारागाड्या ओढत असताना गाड्यांचा ताबा सुटल्याने प्रेक्षकांमधून दिनकर रामकृष्ण कोळी यांच्यासह भगतीन मंगलाबाई प्रकाश भील, सुभाष भील, ईश्वर भील, नामदेव भील, किशोर हरी, मोहन एकनाथ महाजन, तर बगल्यांमध्ये सुनील राजाराम महाजन तसेच ज्यु ओढणारे नारायण शामराव महाजन, ईश्वर रुपा भील हे जखमी झाले आहेत.

दरम्यान अपघातात दिनकर रामकृष्ण कोळी यांना जास्त मार लागल्याने त्यांना रावेर ग्रामीण रुग्णालयात तात्काळ दाखल केले असता त्यांना डॉक्टरांनी मृत घोषित केले. तर इतर जखमींवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

गेल्या वर्षीही बारागाड्या ओढण्याच्या कार्यक्रमात दुर्घटना

मागील वर्षी नोव्हेंबर महिन्यात जळगावातीलच एरंडोल तालुक्यातील तळई गावात बारागाड्या ओढण्याच्या कार्यक्रमात अशाच प्रकारची घटना घडली होती. या दुर्घटनेत एकाचा मृत्यू झाला होता. चंपाषष्ठीनिमित्त आयोजित बारागाड्या ओढण्याच्या कार्यक्रमात गर्दीमध्ये पळताना पायात पाय अडकल्याने तरुण बारागाड्यांच्या समोर आला. यावेळी त्याच्या पोटावरुन चाक गेल्याने गंभीर जखमी झाला होता. त्याच्यावर जळगाव जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचार सुरु होते. परंतु उपचारादरम्यान त्याची प्राणज्योत मालवली. राहुल पंडीत पाटील (वय 30 वर्षे रा. तळई ता. एरंडोल) असं मृत तरुणाचं नाव होतं. याप्रकरणी जळगाव शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली होती. राहुल पाटील हा एरंडोल तालुक्यातील निपाणे येथील जिल्हा बँकेच्या शाखेत लिपिक म्हणून नोकरी करत होता. राहुलच्या पश्चात वडील पंडित मिठाराम पाटील, आई सरला, पत्नी अश्विनी तर लहान भाऊ महेंद्र आणि मुलगा असा परिवार आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Abhijit Dipke and Gulabrao Patil: अभिजीत दिपकेंचा सरकारी शाळांवरुन सरकारवर निशाणा, गुलाबराव पाटील म्हणाले, 'कुठेही राजकारण आणू नका'
अभिजीत दिपकेंचा सरकारी शाळांवरुन सरकारवर निशाणा, गुलाबराव पाटील म्हणाले, 'कुठेही राजकारण आणू नका'
Nashik Crime News: कुंभमेळ्याच्या बनावट वर्कऑर्डर प्रकरणात मोठी कारवाई; जामनेरमधून आणखी तिघे पोलिसांच्या ताब्यात, नेमकं प्रकरण काय?
कुंभमेळ्याच्या बनावट वर्कऑर्डर प्रकरणात मोठी कारवाई; जामनेरमधून आणखी तिघे पोलिसांच्या ताब्यात, नेमकं प्रकरण काय?
कुंभमेळा बनावट वर्क ऑर्डर, 70 कोटींचे कंत्राट; गिरीश महाजन म्हणाले, आरोपी नातेवाईक असला तरी कडक कारवाई
कुंभमेळा बनावट वर्क ऑर्डर, 70 कोटींचे कंत्राट; गिरीश महाजन म्हणाले, आरोपी नातेवाईक असला तरी कडक कारवाई
देवदर्शनाहून परतणाऱ्या भाविकांच्या बोलेरोला अपघात, स्विफ्ट कारची जोरदार धडक; 12 जखमी, 6 गंभीर
देवदर्शनाहून परतणाऱ्या भाविकांच्या बोलेरोला अपघात, स्विफ्ट कारची जोरदार धडक; 12 जखमी, 6 गंभीर

व्हिडीओ

Dhananjay Munde Speech : बहिणीचे आभार मानू कसे, पंकजा मुंडेंसाठी धनूभाऊंचे भाषण
Sunil Kendrekar Majha Katta : आएएस अधिकारी सुनील केंद्रेकर शेतीकडे कसे वळवले?
Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी
Pm Modi Speech Highlites : मोदींच्या लाल किल्ल्यावरील भाषणातले टॉप 10 मुद्दे
Sanjay Raut Mumbai : १५०० रुपये देऊन मते विकत घेतली अन् ईव्हीएमचा घोटाळा केला- संजय राऊत

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ambernath MNS-BJP Clash : अंबरनाथमधील भाजप-मनसे राडा प्रकरणी भाजप नगरसेवकासह सहा जणांविरोधात अखेर गुन्हा दाखल; मनसेचा मोर्चा तूर्तास स्थगित
अंबरनाथमधील भाजप-मनसे राडा प्रकरणी भाजप नगरसेवकासह सहा जणांविरोधात अखेर गुन्हा दाखल; मनसेचा मोर्चा तूर्तास स्थगित
Nalasopara Crime Cake Shop: चामुंडा डेअरीतून वाढदिवसाचा केक घेतला, खाताना मेलेली पाल दिसली अन् ज्याची भीती होती तेच घडलं, नालासोपाऱ्यातील धक्कादायक घटना
चामुंडा डेअरीतून वाढदिवसाचा केक घेतला, खाताना मेलेली पाल दिसली अन् ज्याची भीती होती तेच घडलं, नालासोपाऱ्यातील धक्कादायक घटना
Dombivli Crime Train Accident: डोंबिवलीत लोकल ट्रेनच्या धडकेत अल्पवयीन मुलीचा मृत्यू, पण पोस्टमार्टेम रिपोर्ट पाहून सगळेच हादरले
डोंबिवलीत लोकल ट्रेनच्या धडकेत अल्पवयीन मुलीचा मृत्यू, पण पोस्टमार्टेम रिपोर्ट पाहून सगळेच हादरले
Ind vs Sl 1st Test Day-2 : गॉल कसोटीत क्रिकेट बोर्डाचा अचानक मोठा निर्णय; भारत-श्रीलंका सामन्याची वेळ बदलली, जाणून घ्या नवं टाइमिंग, किती वाजता सुरू होणार मॅच?
गॉल कसोटीत क्रिकेट बोर्डाचा अचानक मोठा निर्णय; भारत-श्रीलंका सामन्याची वेळ बदलली, जाणून घ्या नवं टाइमिंग, किती वाजता सुरू होणार मॅच?
Vijay Thalapathi Independence Day speech: 'जेव्हा जाणीव होते गुलामगिरीत ठेवलं जातंय..' थलपती विजय यांचं मुख्यमंत्री म्हणून पहिलंच भाषण; म्हणाले, 'भ्रष्टाचार, लाचखोरी...'
'जेव्हा जाणीव होते गुलामगिरीत ठेवलं जातंय..' थलपती विजय यांचं मुख्यमंत्री म्हणून पहिलंच भाषण; म्हणाले, 'भ्रष्टाचार, लाचखोरी...'
Chakan MIDC: उदय सामंत चाकण MIDC मध्ये येणार कळताच यंत्रणा खडबडून जाग्या, एका रात्रीत रस्त्यावरील खड्ड्यांची डागडुजी
उदय सामंत चाकण MIDC मध्ये येणार कळताच यंत्रणा खडबडून जाग्या, एका रात्रीत रस्त्यावरील खड्ड्यांची डागडुजी
Toxic Fame Yash: एका चित्रपटासाठी 50 कोटींपेक्षा जास्त मानधन; कधीकाळी थिएटरमध्ये फरशी पुसायचा अभिनेता, चहा विकून केलेली कमाई
एका चित्रपटासाठी 50 कोटींपेक्षा जास्त मानधन; कधीकाळी थिएटरमध्ये फरशी पुसायचा अभिनेता, चहा विकून केलेली कमाई
Akola Abhay Patil and Shinde Camp: एकनाथ शिंदेंचा खास माणूस रात्री अकोल्यात पोहोचला, अभय पाटलांसोबत दोन तास गुप्त खलबतं, महत्त्वाच्या घडामोडींचे संकेत
एकनाथ शिंदेंचा खास माणूस रात्री अकोल्यात पोहोचला, अभय पाटलांसोबत दोन तास गुप्त खलबतं, महत्त्वाच्या घडामोडींचे संकेत
Embed widget