एक्स्प्लोर

Girish Mahajan : काही लोकांचं वय 85 अन् 90 वर्ष झालं झालं तरी पंतप्रधान व्हावस वाटतंय, गिरीश महाजन यांची गंभीर टीका 

Girish Mahajan : राष्ट्रवादीचे नेते शरद पवार (Sharad Pawar) यांना अनेक जण म्हणत आहेत की आता त्यांनी राजकारणातून (Politics) निवृत्ती घेतली पाहिजे.

नाशिक : राष्ट्रवादीचे नेते शरद पवार (Sharad Pawar) यांना अनेक जण म्हणत आहेत की आता त्यांनी राजकारणातून (Politics) निवृत्ती घेतली पाहिजे. मात्र काही लोकांच वय 85 तसेच 90 वर्ष झालं तरी पंतप्रधान व्हावेसे वाटत असल्याची गंभीर टीका मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनी केली आहे. तत्पूर्वी 'शासनात जे निवृत्तीचं वय असते, तेच राजकरणात असायला हवं, माझी तर राजकारणातील हौस भागली असून शरद पवार यांनी आजपर्यंत अनेक पदे भूषवली आता त्यांनी मार्गदर्शकाच्या भूमिकेत राहावं, असा सल्ला उदयनराजे (Udayanraje Bhosale) यांनी दिला आहे. 

आज गिरीश महाजन जळगावमध्ये (Jalgaon) होते. त्यावेळी ते बोलत होते. गिरीश महाजन यांनी उदयनराजे यांच्या वक्तव्यावर बोलताना शरद पवार यांच्यावर खोचक टीका केली आहे. ते म्हणाले की, गेल्या काही दिवसांपासून राजकारणातील काही लोकांना वय झाल्याचं सांगत निवृत्ती घ्यायला सांगितली जात आहे. अगदी खरं आहे, एक वय झाल्यावर माणसाने राजकारणातून निवृत्ती घेणे गरजेचे असते. मात्र काही लोकांना वय झालं तरीही देशाचे पंतप्रधान (PM) व्हावेसे वाटतं आहे. अशी टीका महाजन यांनी केली आहे. आरक्षणावर बोलताना महाजन म्हणाले की, मराठा आरक्षण प्रश्नी सरकार सकारात्मक असून जरांगे पाटील यांचे प्रश्न आहेत. महाराष्ट्रामध्ये प्रत्येक प्रश्नाला तिढा असतो. त्यांच्याही आरक्षणाचा प्रश्नाचा तिढा सुटेल अशी ग्वाही महाजन यांनी दिली आहे. 

तर ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनी दादा भुसे (Dada Bhuse) यांच्यावर केलेल्या आरोपांवर बोलताना महाजन म्हणाले की, काही लोकांच्या डोक्याचा इलाज करावा लागणार आहे. त्यांना पुन्हा हॉस्पिटलला पाठवून त्यांच्यावर इलाज करावा लागेल, असे सांगत एकनाथ खडसेंवरही अशीच टीका केली आहे. एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांच्या पण डोक्याचा इलाज करावा लागेल. एकनाथ खडसे यांच्या डोक्यावर परिणाम झाला आहे. खडसे चारही बाजूंनी घेरले गेलेले आहेत. त्यामुळे त्यांना दुसरा काही सुचणार नाही, जमीन घोटाळे, दूध संघ घोटाळे आता नवीन एका जमीन उत्खनन करताना त्यांनी रॉयल्टी वाचविल्याचा नवीन घोटाळा समोर येत आहे. त्यामुळे ते वाटेल ते बडबडत असतात. डोक्यावर पडलेल्या माणसाचा असं वक्तव्य असू शकते. आता ते पंधरा दिवस बॉम्बे हॉस्पिटलमध्ये ऍडमिट होते, मात्र त्यांना पुन्हा दाखल करून उपचार करायला हवा, शिवाय शासकीय खर्चाने त्यांच्यावर उपचार करू, अशी खोचक टीका खडसेंवर केली आहे. 

राजकारणातही निवृत्तीचं वय हवं

निवृत्तीबाबत उदयनराजे म्हणाले की, 'शासनात जे निवृत्तीचं वय असते, तेच राजकरणात असायला हवं, माझी तर राजकारणातील हौस भागली असून याबाबतच शरद पवार यांना देखील सल्ला दिला आहे. शरद पवार यांनी आजपर्यंत अनेक पदे भूषवली आता त्यांनी मार्गदर्शकाच्या भूमिकेत राहावं असा सल्ला उदयनराजे यांनी दिला आहे. 

इतर महत्वाची बातमी : 

Udayanraje Bhosale on Election : माझी निवडणुकीची हौस भागली, राजकारणातही निवृत्तीचं वय हवं

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Farmer Success Story : डोळ्यात पाणी आणणाऱ्या कांद्याने चेहऱ्यावर हास्य फुलवले..शेतकऱ्यानं एका एकरात 5 लाखांचं उत्पन्न घेतलं, आमदारांकडून कौतुकाची थाप
शेतकऱ्यानं एका एकरात 5 लाख कमावले, आमदार अभिजीत पाटील यांच्यांकडून कौतुकाची थाप, म्हणाले..
Accident News : चालकाचं नियंत्रण सुटलं अन् बस डिव्हायडर ओलांडून उलटली, जळगावात भीषण अपघात, एक ठार, 15 जखमी
चालकाचं नियंत्रण सुटलं अन् बस डिव्हायडर ओलांडून उलटली, जळगावात भीषण अपघात, एक ठार, 15 जखमी
Uddhav Thackeray : ठाकरेंचा बडा नेता भाजप संकटमोचकांच्या भेटीला; म्हणाला, महाजन साहेब मलाही पक्षात घ्या, उद्धव ठाकरेंना धक्का?
ठाकरेंचा बडा नेता भाजप संकटमोचकांच्या भेटीला; म्हणाला, महाजन साहेब मलाही पक्षात घ्या, उद्धव ठाकरेंना धक्का?
Sanjay Raut : राहुल गांधी परभणीला गेले तर तुमचे पित्त का खवळले? राऊतांचा फडणवीसांवर हल्लाबोल, म्हणाले, भुजबळांना मंत्रिमंडळातून दूर केलं, पण...
राहुल गांधी परभणीला गेले तर तुमचे पित्त का खवळले? राऊतांचा फडणवीसांवर हल्लाबोल, म्हणाले, भुजबळांना मंत्रिमंडळातून दूर केलं, पण...
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines :  12 PM : 24  डिसेंबर 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सSanjay Shirsat visit Hostel : सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांच्याकडून वसतीगृहाची पाहणीManu Bhakar : मनू भाकरने पॅरिस ऑलिम्पिकमध्ये दोन पदकं जिंकूनही शिफारस नाहीABP Majha Headlines :  11 AM : 24  डिसेंबर 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Farmer Success Story : डोळ्यात पाणी आणणाऱ्या कांद्याने चेहऱ्यावर हास्य फुलवले..शेतकऱ्यानं एका एकरात 5 लाखांचं उत्पन्न घेतलं, आमदारांकडून कौतुकाची थाप
शेतकऱ्यानं एका एकरात 5 लाख कमावले, आमदार अभिजीत पाटील यांच्यांकडून कौतुकाची थाप, म्हणाले..
Accident News : चालकाचं नियंत्रण सुटलं अन् बस डिव्हायडर ओलांडून उलटली, जळगावात भीषण अपघात, एक ठार, 15 जखमी
चालकाचं नियंत्रण सुटलं अन् बस डिव्हायडर ओलांडून उलटली, जळगावात भीषण अपघात, एक ठार, 15 जखमी
Uddhav Thackeray : ठाकरेंचा बडा नेता भाजप संकटमोचकांच्या भेटीला; म्हणाला, महाजन साहेब मलाही पक्षात घ्या, उद्धव ठाकरेंना धक्का?
ठाकरेंचा बडा नेता भाजप संकटमोचकांच्या भेटीला; म्हणाला, महाजन साहेब मलाही पक्षात घ्या, उद्धव ठाकरेंना धक्का?
Sanjay Raut : राहुल गांधी परभणीला गेले तर तुमचे पित्त का खवळले? राऊतांचा फडणवीसांवर हल्लाबोल, म्हणाले, भुजबळांना मंत्रिमंडळातून दूर केलं, पण...
राहुल गांधी परभणीला गेले तर तुमचे पित्त का खवळले? राऊतांचा फडणवीसांवर हल्लाबोल, म्हणाले, भुजबळांना मंत्रिमंडळातून दूर केलं, पण...
धनंजय मुंडे आधी असे नव्हते, 'मात्र आता काय होतास तू काय झालास तू'; मस्साजोग सरपंच हत्येवर आमदार सुरेश धस यांची टीका 
धनंजय मुंडे आधी असे नव्हते, 'मात्र आता काय होतास तू काय झालास तू'; मस्साजोग सरपंच हत्येवर आमदार सुरेश धस यांची टीका 
Accident News : जालन्यात भीषण अपघात, स्टेअरिंग रॉड तुटला अन् बस 20 फूट खोल खड्ड्यात कोसळली, 16 प्रवासी जखमी
जालन्यात भीषण अपघात, स्टेअरिंग रॉड तुटला अन् बस 20 फूट खोल खड्ड्यात कोसळली, 16 प्रवासी जखमी
Pune Crime: कोयता गँगचा विध्वंस! रस्त्यावरुन जाणाऱ्या वाहनांवर कोयत्यानं वार करत माजवली दहशत, घटनेचा Video व्हायरल
कोयता गँगचा विध्वंस! रस्त्यावरुन जाणाऱ्या वाहनांवर कोयत्यानं वार करत माजवली दहशत, घटनेचा Video व्हायरल
Egg Price : सर्वसामान्यांना फटका! थंडीत अंडी महागली; आता कॅरेटसाठी किती रुपये मोजावे लागणार?
सर्वसामान्यांना फटका! थंडीत अंडी महागली; आता कॅरेटसाठी किती रुपये मोजावे लागणार?
Embed widget