(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Eknath Khadse : एक काम करा, मंत्रिमंडळ कंत्राटी पद्धतीने चालवायला घ्या, पाच वर्षांची गरजच काय? एकनाथ खडसेंचा सवाल
Jalgaon News : सरकारी कार्यालयामध्ये कंत्राटी पद्धतीने भरती केली जाणार आहार, तर मंत्री मंडळही कंत्राटी पद्धतीने चालवायला हरकत काय आहे : एकनाथ खडसे
जळगाव : शासकीय आणि निमशासकीय जागामध्ये पन्नास टक्के जागा रिक्त आहेत, या जागा कायमस्वरुपी भरण्यासाठी सरकारकडे पैसे नाहीत, कारण सरकार दिवाळखोरीत गेले आहे. उद्याच्या काळात मंत्रीमंडळही आता कंत्राटी पद्धतीने (Contract Basis) चालवावे आणि दर महिन्याला नवीन नवीन भरती करावी, कायम स्वरुपी मंत्री मंडळाची पाच वर्षे आणि तीन वर्षांसाठी गरजच काय? असा सवाल करून एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी शिंदे सरकारवर टीका केली आहे.
अलीकडेच राज्य सरकारने (Maharashtra Government) सरकारी कार्यालयांमध्ये कंत्राटी पद्धतीने भरती प्रक्रिया (Bharti) राबविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे विरोधकांकडून जोरदार टीका करण्यात येत आहे. राज्यातील सरकारी कार्यालयांमध्ये मोठ्या प्रमाणात पदे रिक्त असून उपलब्ध असलेल्या अधिकाऱ्यांवर कामाचा ताण येत असल्याचे वारंवार तक्रारीवरून निदर्शनास आले आहे. या पार्श्वभूमीवरच सरकारकडून कंत्राटी पद्धतीने पद भरतीचा निर्णय घेण्यात आलं आहे.. यावर राष्ट्रवादीचे आमदार एकनाथ खडसे यांनी जोरदार टीका केली आहे. सरकारने या जागा कंत्राटी पद्धतीने भरण्याचा निर्णय घेतला, मात्र कंत्राटी पद्धतीने जागा भरताना अनेक मर्यादा असतात. हे लोक कायम नसल्याने बंधन नसल्याने ते मन लाऊन काम ही करत नाही, त्यामुळे काही ठिकाणी कंत्राटे पद्धतीने काम देणं ठीक असले तरी सर्वत्र मात्र कंत्राटी पद्धतीने काम देणे आणि त्यावर जबाबदारी देणे योग्य नसल्याचे एकनाथ खडसे म्हणाले आहेत.
एकनाथ खडसे पुढे म्हणाले की, शासकीय आणि निमशासकीय जागामध्ये पन्नास टक्के जागा रिक्त असून या जागा कायमस्वरुपी भरण्यासाठी सरकारकडे पैसे नाहीत, कारण सरकार दिवाळं खोरीत निघाले आहे. आगामी काळात मंत्रीमंडळही कंत्राटी पद्धतीने सुरु झाले तर आश्चर्य वाटणार नाही, मग मंत्रिमंडळातही दर महिन्याला नवीन नवीन भरती करावी, कायम स्वरुपी मंत्री मंडळाची पाच वर्षे आणि तीन वर्षांसाठी गरजच काय? असा सवाल करून एकनाथ खडसे यांनी शिंदे सरकारवर (Eknath Shinde) टीका केली आहे. राज्यातील अधिकाऱ्यासह कार्यालयातील सर्वच महत्त्वाची पदे आता कंत्राटी पद्धतीने (Contract recruitment) भरली जातील. या कर्मचाऱ्यांच्या नियुक्तीसाठी नऊ कंपन्यांना ठेका देण्यात आला आहे. यातील काही कंपन्या राज्याबाहेरील असल्याचे सांगण्यात येत आहे.
भरती आता कंत्राटी पद्धतीने होणार
सरकारी कार्यालयात काम करण्यासाठी आत्तापर्यंत विविध परीक्षांच्या माध्यमातून कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली जात होती. पण सहा वर्षापासून कंत्राटी पद्धतीने कामगार घेण्यात येत होते. दोन कंपन्याना हे काम देण्यात आले होते. शिपाई, सफाई कामगार अशा किरकोळ पदांचा यामध्ये समावेश होता. आता मात्र याची व्यापकता वाढवली आहे. यामध्ये अतिकुशल, कुशल, अर्धकुशल व अकुशल कर्मचाऱ्यांची भरती होणार आहे. प्रत्येक पदाचा पगार निश्चित करण्यात आला आहे. यासाठी नऊ कंपन्यांना अधिकार देण्यात आले आहेत. सध्या राज्यांमध्ये मराठा आरक्षणाच्या विषयी जोरदार वातावरण तयार झाले असताना राज्य सरकारने मात्र सर्व महत्त्वाचे जे काही पदे आहेत ते आता कंत्राटी पद्धतीने भरण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाचा फटका हा विविध परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना देखील बसण्याची शक्यता आहे.
इतर महत्वाची बातमी :